अभिजीत दिपके काढेनात ज्ञानेश कुमार यांचे नाव, थेट बाळगले माैन, 9 नोव्हेंबरला..
अभिजीत दिपके यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा वळवला. दिल्लीत त्यांनी आंदोलन सुरू केले. मात्र, या आंदोलनाला फार यश मिळाले नाही. त्यातच आता सीजेपीच्या भूमिकेबद्दल प्रश्न उपस्थित केली जात आहेत.

कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजीत दिपके गेल्या काही दिवसांपासून शांत आहेत. अभिजीत दिपके यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मोर्चा काढला होता. त्यांनी दिल्लीतील जंतरमंतर येथे मोठ्या आंदोलनाची घोषणा केली. अभिजीत दिपके यांचे टार्गेट 1 ज्ञानेश कुमार होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात अभिजीत दिपके यांनी माैन बाळगले. मागच्या काही दिवसांपासून ते सोशल मीडियावर पूर्णपणे शांत आहेत. अभिजीत दिपके यांच्या या भूमिकेने अनेक प्रश्न उपस्थित केली जात आहेत. नीट पेपरफुटीच्या मुद्द्यात सीजेपीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याविरोधात आंदोलन पुकारले. त्यांच्या या आंदोलनाला मोठे यश मिळाले. धर्मेंद्र प्रधान यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. हा सर्वात मोठा विजय सीजेपीचा होता.
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर सीजेपीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा वळवला. पण त्यांना यश मिळाले नाही. दिल्ली पोलिसांनी अगोदरच या आंदोलनातील हवा काढली. सीजेपीने काही दिवसांपूर्वीच जाहीर केले होते की, जोपर्यंत ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा होणार नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत. मात्र, दिल्ली पोलिसांना त्यांना कायद्याच्या कचाट्यात अडकून त्यांच्या आंदोलनाला ब्रेक दिला.
दिवाळीनंतर पुन्हा आंदोलनाची दिशा ठरू असे अभिजीत दिपके यांनी जाहीर केले. पण दिवाळी होऊन काही दिवस झाले पण सीजेपीच्या आंदोलनाची पुढची दिशा पुढे आली नाही. ज्ञानेश कुमार यांच्यावर सतत टीका करणारे अभिजीत दिपके आता शांत झाले आहेत. ज्ञानेश कुमार यांचे नाव घेत शेवटची पोस्ट अभिजीत दिपके यांनी 9 नोव्हेंबर रोजी सोशल मीडियावर शेअर केली.
त्यानंतर ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कोणत्याही प्रकारची पोस्ट शेअर करण्यात आली नाही. गोकुळ दूध संघाच्या मुद्द्यातही अभिजीत दिपके यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. अभिजीत दिपके आणि सीजेपी पुन्हा ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करणार का? असा सवास यादरम्यान उपस्थित केला जात आहे.
