AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Zaheer Khan: भावाच्या लग्नात सागरिका घाटगेचा शाही लूक, फेटा बांधून दिसला नवरा जहीर खान

Zaheer Khan: अभिनेत्री सागरिका घाटगेचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ती एका लग्नसोहळ्यात शाही लूकमध्ये दिसली. तिचा पती जहीर खान देखील डोक्याला फेटा बांधून दिसला.

Zaheer Khan: भावाच्या लग्नात सागरिका घाटगेचा शाही लूक, फेटा बांधून दिसला नवरा जहीर खान
Sagarika GhatgeImage Credit source: tv9 Marathi
| Updated on: Nov 17, 2026 | 3:29 PM
Share

कोल्हापूरच्या राजघराण्यातील कन्या आणि अभिनेत्री सागरिका घाटगे माजी भारतीय क्रिकेटपटू जहीर खानसोबतच्या विवाहानंतर विशेष चर्चेत आली होती. आता ती पुन्हा एकदा आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे आणि कौटुंबिक सोहळ्यामुळे प्रकाशझोतात आली आहे. सागरिका तिचा भाऊ शिवजीत घाटगे याच्या शाही विवाहसोहळ्यात सहभागी झाली होती. यावेळी तिच्यासोबत पती जहीर खान आणि त्यांचा चिमुकला मुलगा फतेह देखील उपस्थित होता.

या शाही लग्नसोहळ्याला मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. या सोहळ्यातील विविध विधींचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. या लग्नात सागरिकाचा अस्सल ‘घाटगे स्टाइल’ राजेशाही अंदाज पाहायला मिळाला. विशेष म्हणजे, तिने या लग्नात ‘करवली’ म्हणून मिरवत सर्व विधींचा मनमुराद आनंद लुटला. सागरिका आणि जहीर यांच्या शाही लूकने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले आहे.

या सोहळ्यात जहीर खानच्या पेहरावाची विशेष चर्चा रंगली आहे. त्याने क्लासिक शेरवानी परिधान केली असून डोक्यावर गुलाबी रंगाचा फेटा बांधला होता. आपल्या चिमुकल्या लेकाला, फतेहला कडेवर घेऊन लग्नसोहळ्यात वावरणारा जहीर सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता. आई-वडिलांप्रमाणेच पारंपरिक वेशभूषेत सजलेला फतेह अत्यंत गोंडस दिसत होता. भावाच्या लग्नासाठी सागरिकानेही खास पारंपरिक साज केला होता. सुंदर साडी, त्यावर भारदस्त नेकलेस, त्याला साजेसे कानातले, कपाळावर टिकली आणि मांगटिका अशा पेहरावात तिचे राजेशाही सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. भावाच्या लग्नातील प्रत्येक विधीमध्ये ती अत्यंत उत्साहाने सहभागी झाली होती.

केवळ सागरिकाच नाही, तर जहीर खाननेही सासरच्या मंडळींसोबत या सोहळ्याचा पुरेपूर आनंद घेतला. सासरच्या नातेवाइकांसोबत मनसोक्त डान्स करतानाचे जहीरचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

२०१७ मध्ये जहीर आणि सागरिका यांनी अत्यंत साधेपणाने विवाहबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता. भिन्न धार्मिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी असूनही, या दोघांनी नेहमीच एकमेकांच्या भावनांचा आणि संस्कृतीचा आदर केला आहे. त्यांच्या नात्यातील प्रेम, विश्वास आणि समजूतदारपणा अनेकदा पाहायला मिळतो. आता शिवजीतच्या शाही लग्नसोहळ्यातील या कुटुंबाचे हे गोड क्षण पुन्हा एकदा चाहत्यांची मने जिंकत आहेत.

Follow Us
मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुळेंची प्रतिक्रिया
Supriya Sule : मी रोहित पवारांशी बोलणार, हा विषय...; मफलर मॅनवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात
Shivsena Hearing Update : धनुष्यबाण कुणाचा? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तीवाद, थेट... कोर्टात नेमकं काय घडतंय?
प्रश्नांची उत्तरं नेत्यांनी द्यावीत, भक्तांनी नाही...; रोहित पवारांचा
Rohit Pawar : प्रश्नांची उत्तरं नेत्यांनी द्यावीत, भक्तांनी नाही...; रोहित पवारांचा कोणाला अप्रत्यक्ष टोला
माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? प्रदीप पुर्णेकरांच्या मुलाची पोलीस..
Pradeep Purnekar : माझ्या पप्पांना न्याय कधी मिळणार? प्रदीप पुर्णेकरांच्या मुलाची पोलीस ठाण्याबाहेर बॅनरबाजी; तपासावर प्रश्नचिन्ह
महिलांच्या शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे का?
Dipali Sayyad On Rupali Chakankar : महिलांच्या शोषणाविरोधातील चित्रपटाला पाठिंबा देण्याऐवजी अडथळे का? दिपाली सय्यदांचा रुपाली चाकणकरांना सवाल
अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर; थेट म्हणाले, माफी मागायला हवी...
अमित शाहांच्या टीकेला ठाकरेंचं उत्तर; थेट म्हणाले, माफी मागायला हवी होती, कारण...
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंकडून शक्तीस्थळी अभिवादन
Uddhav Thackeray : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी उद्धव ठाकरेंनी शक्तीस्थळी जाऊन केले अभिवादन!
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून...
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी एकनाथ शिंदेंकडून अभिवाद; त्यांनी दिलेल्या मुलमंत्राचं स्मरण करत म्हणाले...
बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने
Amitabh Bachchan Safety : बच्चन बाप-बेट्याला बुलेटप्रूफमध्येही मारु! गोल्डी ढिल्लोच्या दाव्याने खळबळ
मोठी बातमी! महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज...
महाराष्ट्रातील आणखी 18 तालुके दुष्काळग्रस्त होणार? आज मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक!