तुम्हालाही आवडतात High Heels? वाचा हाय हील्स घालण्याचे तोटे

काही मुली त्यांच्या लहान उंचीमुळे देखील याचा वापर करतात. कितीही आधुनिक हाय हील्स दिसत असल्या तरी त्या आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगल्या नसतात, कारण यामुळे तळव्याची स्थिती बदलते आणि मग हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया अशी पादत्राणे का घालू नयेत

तुम्हालाही आवडतात High Heels? वाचा हाय हील्स घालण्याचे तोटे
do not wear high heels
| Updated on: Jun 04, 2023 | 3:53 PM

मुंबई: हाय हील्सची फॅशन नवीन नाही, प्रत्येक युगातील महिलांसाठी हा एक उत्तम फॅशन ट्रेंड आहे, हे पादत्राणे त्यांना स्टायलिश लुक देतात, ज्यामुळे त्या इतरांपेक्षा वेगळ्या दिसतात. काही मुली त्यांच्या लहान उंचीमुळे देखील याचा वापर करतात. कितीही आधुनिक हाय हील्स दिसत असल्या तरी त्या आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगल्या नसतात, कारण यामुळे तळव्याची स्थिती बदलते आणि मग हाडांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. चला तर मग जाणून घेऊया अशी पादत्राणे का घालू नयेत

हाय हील्स घालण्याचे तोटे

  1. पाय दुखणे: महिला सहसा हाय हील्स घालून पार्ट्यांमध्ये जातात, परंतु जास्त वेळ ते परिधान केल्याने पाय दुखू शकतात. खरं तर या पादत्राणामुळे पायाच्या स्नायूंमध्ये ताण निर्माण होतो. यामुळे गुडघ्यांवर दबाव देखील वाढतो, म्हणून फ्लॅट शूज किंवा सॅंडल घाला.
  2. बहुतेक आरोग्य तज्ञांचे मत आहे की जर तुम्ही जास्त वेळ हिल्स घातल्या तर कमरेची हाडे कमकुवत होतील, पाय आणि नितंबाच्या हाडावर अतिरिक्त दबावामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे अशी पादत्राणे टाळा.
  3. अनेक स्त्रिया नियमितपणे हाय हील्स घालतात, त्यांना अनेकदा गुडघेदुखीला सामोरे जावे लागते कारण या पादत्राण्यांमुळे आपल्या सांध्यावर खूप दबाव पडतो, ज्यामुळे समस्या वाढते.
  4. हाय हील्स घालणे हे सर्वार्थाने हानिकारक ठरते, त्यामुळे हा छंद तुम्ही जितक्या लवकर सोडाल तेवढे चांगले. हिल्समुळे तुमच्या शरीराच्या वजनाची योग्य विभागणी होत नाही आणि मग तुमची बॉडी पोश्चर बिघडू शकते

(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)