AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Suffer from PCOS | तुम्हालाही PCOS चा त्रास आहे का? मग प्या हे हर्बल टी; हार्मोन्स होतील संतुलित! 

Suffer from PCOS | महिलांमध्ये पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम किंवा पीसीओएसची समस्या झपाट्याने वाढत आहे. सध्या बहुतांश महिलांना याचा त्रास होत आहे. PCOS ही हार्मोन्सशी संबंधित एक गंभीर समस्या आहे. जाणून घ्या, या समस्येला सामोरे जाण्यासाठी गुणकारी हर्बल चहाविषयी

Suffer from PCOS | तुम्हालाही PCOS चा त्रास आहे का? मग प्या हे हर्बल टी; हार्मोन्स होतील संतुलित! 
गुणकारी चहा देईल दिलासाImage Credit source: सोशल मीडिया
| Updated on: Jul 30, 2022 | 3:05 PM
Share

Suffer from PCOS | महिलांच्या शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडते तेव्हा पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (Polycystic ovary syndrome) किंवा पीसीओएसची समस्या झपाट्याने वाढते. या स्थितीत, महिलांमध्ये पुरुष हार्मोन टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते आणि इस्ट्रोजेनचे उत्पादन कमी होते. PCOS मुळे महिलांना शरीरावर नको असलेले केस, अनियमित मासिक पाळी, गालावर पिंपल्स, हर्सुटिझम, मूड स्विंग (Mood swings) तसेच चिंता, तणाव आणि पोटाच्या खालची चरबी यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. तसेच, यामुळे गरोदरपणात समस्या निर्माण होतात. म्हणूनच PCOS चे व्यवस्थापन करणे खूप महत्वाचे आहे. या समस्येवर मात करण्यासाठी, आपण विशिष्ट हर्बल टीचे (Certain herbal tea) सेवन करू शकतो.  उच्च टेस्टोस्टेरॉन, हर्सुटिझम आणि ओव्हुलेशनच्या समस्येचा सामना करण्यासाठी, हार्मोन्सचे नियमन करण्यासाठी आणि PCOS चे व्यवस्थापन करण्यासाठी खूप काही हर्बल टी खूप फायदेशीर ठरू शकतात. तुम्हालाही PCOS चा त्रास असेल तर, या नैसर्गिक चहामुळे तुमचे जीवन सुसह्य होऊ शकते.

पुदिना चहा(Mint Tea)

जर तुम्ही उच्च टेस्टोस्टेरॉन, हर्सुटिझम आणि ओव्हुलेशनच्या समस्येचा सामना करत असाल तर, सुपरमिंट चहा तुमच्या दिनचर्येत चांगली भर घालू शकतो. हे ओव्हुलेशनला प्रोत्साहन देते आणि एन्ड्रोजन कमी करते. हे रोज सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने अनेक फायदे होतात.

आल्याचा चहा(Ginger Tea)

अदरक महिलांच्या शरीरात उपस्थित हार्मोन्सचे नियमन करण्याचे काम करते. आल्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे PCOS मुळे पायाला गोळे येणे(पेटके), मूड स्विंग आणि डोकेदुखी यांसारख्या लक्षणांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते. तुम्ही ते सकाळी किंवा संध्याकाळी कधीही पिऊ शकता. याशिवाय अतिरिक्त फायद्यासाठी तुम्ही त्यात लिंबू किंवा मधही घालू शकता.

हिरवा चहा (GREEN Tea)

हे पीसीओएसने ग्रस्त असलेल्या जादा वजन आणि लठ्ठ महिलांमध्ये इन्सुलिन प्रतिरोधकता आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी कमी करण्यात योगदान देते. अशा परिस्थितीत, सामान्य चहाऐवजी, तुम्ही या आरोग्यदायी चहाला तुमच्या आहाराचा भाग बनवू शकता.

दालचिनी चहा (Cinnamon Tea)

दालचिनी तुमची वाढलेली रक्तातील साखर आणि इन्सुलिनची पातळी कमी करण्यासाठी कार्य करते (जे PCOS मध्ये सर्वात सामान्य आहेत). यासोबतच हे वजन कमी करण्यास आणि मासिक पाळी नियमित करण्यास मदत करते. कॅफीन मुक्त असल्यामुळे, तुम्ही दिवसभरात कधीही त्याचा एक कप पिऊ शकता आणि त्याचे चमत्कारीक फायदे अनुभव शकता.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.