Corona update : देशात गेल्या 24 तासांत 20 हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे नवे रुग्ण, राज्यात काय स्थिती जाणून घ्या

देशात पुन्हा एकदा कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढत असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 20,408 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकूण 54 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

Corona update : देशात गेल्या 24 तासांत 20 हजारांपेक्षा अधिक कोरोनाचे नवे रुग्ण, राज्यात काय स्थिती जाणून घ्या
Follow us
| Updated on: Jul 30, 2022 | 11:57 AM

नवी दिल्ली : देशात पुन्हा एकदा कोरोनाचे (Corona) रुग्ण वाढत असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 20,408  नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकूण 54 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची (patient) संख्या देखील मोठी आहे.शुक्रवारी दिवसभरात 20,958 रुग्णांनी कोरोनावर (Corona update) मात केलीये. सध्या देशात एकूण 143 384 इतके सक्रिय रुग्ण आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण हे 98.48 टक्क्यांवर पोहोचले आहे. आतापर्यंत एकूण 4.33 कोटी रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर आतापर्यंत एकूण 87.48 कोटी चाचण्या केल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे. दुसरीकडे भारतात सध्या लसीकरणाच्या मोहिमेला देखील वेग आला आहे. आतापर्यंत एकूण 203.94 कोटी लसींच्या मात्रा देण्यात आल्या आहेत.यासोबतच 12 ते 14 वयोगटातील मुलांचे देखील लसीकरण सुरू असून, या गटात एकूण 3.89 कोटी लसींच्या मात्र देण्यात आल्या आहेत.

राज्यात काय स्थिती?

राज्यात परभणी आणि नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढताना आढळून येत आहेत. गेल्या 7 दिवसांत परभणी जिल्ह्यात 43 ऍक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे परभणीत दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसून येत आहे. गुरुवारी एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल 10 रुग्ण आढळलेत. तर शुक्रवारी 9 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात 22 ते 28 जुलैदरम्यान एकूण 578 तपासण्या करण्यात आल्या होत्या. त्यात 43 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.तर दुसरीकडे नांदेड जिल्हयात देखील गेल्या 24 तासांत सतरा व्यक्ती कोरोनाबाधित आढळले आहेत, सध्या नांदेडमध्ये कोरोनाचे 44 रुग्ण उपचार घेत आहेत. राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये देखील कमी अधिक प्रमाणात अशी स्थिती आहे.

हे सुद्धा वाचा

नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन

देशभरात गेल्या 24 तासांमध्ये 20,408 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर एकूण 54 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाचे संकट ओसरले होते, मात्र आता हळूहळू पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन आरोग्य मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच लसीकरण मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हवे असे देखील आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.