AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माला झालं तरी काय? 18 चेंडू खेळला आणि…

T20 World Cup Warm up Match: टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात सराव सामना सुरू आहे. या सामन्यात भारताने 240 धावा केल्या. यात इशान किशनचा झंझावात पाहायला मिळाला. पण अभिषेक शर्माची बॅट मात्र शांत राहिली.

टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माला झालं तरी काय? 18 चेंडू खेळला आणि...
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी अभिषेक शर्माला झालं तरी काय? 18 चेंडू खेळला आणि...Image Credit source: PTI
| Updated on: Feb 04, 2026 | 9:52 PM
Share

India vs South Africa: टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वीची चाचणी परीक्षा पास झाल्यानंतर टीम इंडिया सराव सामने खेळत आहे. या सराव सामन्यात भारतीय फलंदाजांनी आपली क्षमता पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवली. पण अभिषेक शर्माच्या फलंदाजीने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळी करणारा अभिषेक शर्माची बॅट सराव सामन्यात शांत होती. अभिषेक शर्माने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 18 चेंडूत फक्त 24 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट हा 133.33 चा होता. त्याच्या तुलनेत ही फलंदाजी म्हणजे खूपच संथ होती. त्याने या डावात त्याने 3 चौकार आणि एक षटकार मारला. त्याने या खेळीदरम्यान बरेच निर्धाव चेंडू घालवले. खरं तर या समन्यात तसं काही प्रेशर नव्हतं. तरीही धीमी फलंदाजी केल्याने क्रीडाप्रेमी आश्चर्य व्यक्त करत आहे.

अभिषेक शर्मा फलंदाजीला आला तेव्हा चेंडू काही बॅटवर आला नाही. त्याला फलंदाजी करताना अडचणीचा सामना करावा लागला. पहिल्या 7 चेंडूत त्याला फक्त एक धाव काढता आली. पावरप्लेमध्ये सुरुवातीचे 6 चेंडू निर्धाव गेले. पण चौथ्या षटकात त्याचा सामना कॉर्बिन बॉशशी झाला आणि त्याच्या षटकात सलग तीन चौकार मारले. पाचव्या षटकात नॉर्खियाच्या गोलंदाजीवर षटकार मारला. पावर प्ले संपल्यानंतर अभिषेक शर्माला पुन्हा अडणीत आल्यासारखा वाटला. 15 चेंडू खेळल्यानंतर सलग 3 चेंडू निर्धाव गेले. त्यामुळे डगआऊटमधून अभिषेक शर्माला रिटायर्ड आऊटचा कॉल आला. 8 षटक संपल्यानंतर अभिषेक शर्मा तंबूत परतला.

अभिषेक शर्मा प्रत्येक सामन्यात वेगाने धावा करतो. यात आता नवं काही राहिलं नाही. पण त्याची संथ फलंदाजी पाहून क्रीडाप्रेमींचा चिंता वाटू लागली आहे. कारण त्याने पाटा विकेटवर संथ फलंदाजी केली. दुसरीकडे, इशान किशनने 265 च्या स्ट्राईक रेटने 53 धावा केल्या. तर तिलक वर्माने 236 च्या स्ट्राईक रेटने 45 धावांची खेळी. त्यामुळे अभिषेक शर्मा संथ का खेळला हा विषय चर्चेत आहे. रिटायर्ड आऊट झाल्यानंतर अभिषेक शर्मा थोडा नाराज दिसला. कदाचित झाल्या वेगाने धावा करायच्या होत्या.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...