AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरात्रीत 9 दिवस उपवास करताय? दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक राहण्यासाठी करा ‘या’ गोष्टी

Navratri Fasting Tips: नवरात्रीत अनेकजण नऊ दिवस उपवास करतात. मात्र अनेक वेळा काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याने थकवा जाणवतो. तुम्हाला उपवास दरम्यान दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक रहायचं असेल तर कोणत्या गोष्टी कराव्या हे जाणून घ्या..

नवरात्रीत 9 दिवस उपवास करताय? दिवसभर फ्रेश आणि एनर्जेटिक राहण्यासाठी करा 'या' गोष्टी
DietImage Credit source: tv9 Marathi
| Edited By: | Updated on: Oct 12, 2026 | 2:27 PM
Share

नवरात्रीच्या 9 दिवसांत अनेक जण श्रद्धेने उपवास करतात. मात्र, उपवास करताना दिवसभर एनर्जेटिक राहणं आणि शरीराची ऊर्जा टिकवणंही तितकंच महत्त्वाचं आहे. खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यामुळे काहींना थकवा, अशक्तपणा जाणवू शकतो. अशा वेळी उपवासाचा उत्साह कायम ठेवण्यासाठी आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे जाणून घेऊया.

शरीर हायड्रेट ठेवा

उपवास दरम्यान शरीर हायड्रेट ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दिवसभर पुरेसं पाणी प्या. उपवासाच्या नियमांमध्ये बसत असेल, तर नारळ पाणी, ताक आणि लिंबू पाणी यांचाही आहारात समावेश करा. शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास थकवा आणि अशक्तपणा जाणवू शकतो.

आहाराची विशेष काळजी घ्या

उपवासात केवळ बटाटे किंवा तळलेले पदार्थ खाऊ नका. त्याऐवजी साबुदाणा, मखाणे, दही आणि ड्राय फ्रूट्स यासारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा. यामुळे शरीराला ऊर्जा आणि आवश्यक पोषक घटक मिळण्यास मदत होते.

फळं खायला विसरू नका

केळी, सफरचंद, डाळिंब, पपई आणि पेरू यांसारखी फळं उपवासात खाऊ शकता. फळांमधून शरीराला जीवनसत्त्वं, खनिजं आणि फायबर मिळतं. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. भूक लागल्यावर फळं खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळू शकते.

तेलकट आणि मसालेदार पदार्थ टाळा

उपवास म्हटलं की अनेक जण साबुदाणा वडा, बटाट्याचे तळलेले पदार्थ किंवा जास्त तेलकट पदार्थ खातात. मात्र, अशा पदार्थांचं अतिप्रमाण टाळणं गरजेचं आहे. जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थांमुळे गॅस, अपचन किंवा पोटाच्या समस्या होऊ शकतात.

घराबाहेर असतानाही आहाराकडे लक्ष द्या

नोकरी, शिक्षण किंवा इतर कामांसाठी दिवसभर घराबाहेर असाल, तर दोन वेळच्या खाण्यामध्ये खूप अंतर ठेवू नका. सोबत फळं, मखाणे किंवा ड्राय फ्रूट्स ठेवा. भूक लागल्यावर हे पदार्थ खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होईल. मधुमेह असणाऱ्यांनी उपवास करताना रक्तातील साखरेच्या पातळीवर विशेष लक्ष द्यावं.

पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या

उपवास सोबत कामाची धावपळ आणि अपुरी झोप यामुळे शरीर थकू शकतं. त्यामुळे दररोज सात ते आठ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा. पुरेशी झोप मिळाल्याने शरीर आणि मन फ्रेश राहण्यास मदत होते. उपवासाच्या काळात शरीराला विश्रांती देणंही आवश्यक आहे.

आरोग्याच्या समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा इतर गंभीर आजार असणाऱ्यांनी उपवास सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. उपवास दरम्यान औषधं आणि आहारात बदल करण्याची गरज असल्यास ते डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखालीच करा. डॉक्टरांना विचारल्याशिवाय औषधं बंद करू नका किंवा त्यांचं प्रमाण बदलू नका.

Follow Us
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
Shivsena Ubt : ड्रेनेज लाईनच्या पाहणीदरम्यान ठाकरे सेनेचे नगरसेवक आणि स्थानिकांमध्ये हाणामारी; नेमकं काय घडलं?
ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल
Rahul Gnadhi : ज्ञानेश कुमारांना सरकार का वाचवतंय? राहुल गांधींचा मोदी सरकारला सवाल; २०० अधिकारी...
भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश... आंदोलनावरून राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut : भाडोत्री गुंडांना पोलिसांचा गणवेश अन्... दिल्लीतील आंदोलनावरून संजय राऊतांचा गंभीर आरोप
संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा..
Devendra Fadnavis : संविधानाची गोष्ट करता, पण… सरन्यायाधीशांच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा विरोधकांना सवाल
सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
CJP Protest : सीजेपी आंदोलन भोवलं; आदित्य-अमित ठाकरेसह संदीप देशपांडे यांच्यावर.....
राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार....
Raj Thackeray : MNS : राज ठाकरे स्वतः स्वाक्षरी मोहिमेत सहभागी होणार! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसेचा पुढाकार
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...