AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजीबाईचा बटवा, चमकदार त्वचा आणि केसांसाठी ‘या’ 5 टिप्स एकदा करा ट्राय

आपल्या आजीकडे आरोग्याच्या समस्यांपासून मुक्तता मिळविण्यासाठी अनेक उपाय असतात. त्यातच त्वचा आणि केस निरोगी ठेवण्यासाठी खूप प्रभावी घरगूती उपाय देखील माहित आहेत. तर आजच्या या लेखात आपण अशा पाच उपायांबद्दल जाणून घेऊ जे केसांपासून त्वचेपर्यंतच्या समस्या आणि किरकोळ आरोग्य समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आश्चर्यकारकपणे काम करतात.

आजीबाईचा बटवा, चमकदार त्वचा आणि केसांसाठी 'या' 5 टिप्स एकदा करा ट्राय
केस होतील काळेभोर आणि लांबसडकImage Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: May 21, 2025 | 3:25 PM
Share

आजकाल आपण बदलत्या वातारणामुळे त्वचेच्या आणि केसांच्या समस्या मोठ्या प्रमाणात उद्भवू लागले आहेत. साधारणपणे लोकं त्वचा आणि केसांशी संबंधित समस्यांबद्दल तक्रार करताना दिसतात. अशातच अनेकजण या समस्यापासुन सुटका मिळवण्यासाठी बाजारात अनेक महागडे स्किन केअर तसेच हेअर केअर प्रॉडक्ट उपलब्ध आहेत, परंतु या प्रॉडक्टचा फारसा फरक जाणवत नाही. त्यात तुम्ही जर घरगुती उपचार केले तर ते खूप प्रभावी आहेत आणि रसायनमुक्त असल्याने दुष्परिणामांची भीती वाटत नाही. कारण घरगुती उपायांवर अवलंबून असल्याने ते खूप प्रभावी असतात. या लेखात आपण अशा पाच उपायांबद्दल जाणून घेऊ जे तुम्हाला सर्दी, खोकला, पचनाशी संबंधित समस्यांपासून आराम देतील आणि त्वचेसह तुमचे केस निरोगी ठेवतील.

पूर्वीच्या काळात लोकं कमी आजारी पडत असत आणि त्यांना त्वचा आणि केसांशी संबंधित समस्या कमी असायचे. यामागील कारण म्हणजे निरोगी रसायनमुक्त अन्न आणि सक्रिय दिनचर्या. तसेच लोकं सामान्य समस्यांवर औषधांऐवजी नैसर्गिक गोष्टींनी उपचार करायचे. तर मग अशा पाच टिप्स जाणून घेऊया ज्या गरज पडल्यास तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतील.

काळे आणि घनदाट केसांसाठी उपाय

पूर्वीच्या काळात लोकं शाम्पू वापरत नव्हते. यासाठी, आजी मुलतानी माती किंवा आवळा-शिककाई वापरून केस केस धुवायच्या. यामुळे केस मजबूत राहतात आणि काळे आणि जाड देखील होतात. शिककाई, आवळा आणि रेठा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. सकाळी ते चांगले मॅश करा आणि गाळून घ्या. या मिश्रणाने केस धुवा. काही दिवसांतच तुम्हाला तुमच्या केसांमध्ये चांगले परिणाम दिसू लागतील.

निरोगी त्वचेसाठी फेस पॅक

त्वचा निरोगी ठेवण्यासाठी आजी नेहमीच नैसर्गिक गोष्टी वापरत असत. टॅनिंग काढून टाकण्यापासून ते पिंपल्स काढून टाकण्यापर्यंत आणि रंग सुधारण्यापर्यंत, तुम्ही एक साधा फेस पॅक लावू शकता. हे करण्यासाठी आवश्यकतेनुसार एक चिमूटभर हळद, दोन चमचे दही, एक चमचा मध आणि बेसन मिक्स करा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे चेहऱ्यावर लावा. जर तुम्हाला ते रोज लावायचे असेल तर बेसन न टाकता हा फेसपॅक लावा. काही दिवसातच तुम्हाला या फेसपॅकचा आश्चर्यकारक परिणाम दिसेल.

पेटके आणि जुलाब यापासून आराम मिळविण्यासाठी

बऱ्याच वेळा बदलत्या हवामानामुळे किंवा खाण्याच्या सवयींमध्ये बदल झाल्यामुळे, पोटात पेटके किंवा जुलाब सारख्या समस्या उद्भवतात ज्यामुळे खूप त्रास होतो. यापासून सुटका मिळवण्यासाठी आजी काळ्या चहामध्ये लिंबाचा रस मिक्स करून पिण्याचा सल्ला देत असत. यामुळे खूप आराम मिळतो. तसेच याने इतरही अनेक आरोग्यास फायदे होतात.

झटपट खोकला सिरप तयार करा

सर्दी आणि खोकल्यासाठीही घरांमध्ये बहुतेकदा देशी उपाय वापरले जात होते. तुम्ही घरी इन्स्टंट कफ सिरप देखील बनवू शकता. यासाठी आले, दालचिनी, काळी मिरी, तुळशीची पाने पाण्यात उकळा, त्यात मध टाकून काढा तयार करा. हा काढा दिवसातून दोन ते तीन वेळा थोडे थोडे सेवन करा. यामुळे तुम्हाला सर्दीपासूनही आराम मिळतो. जर घसा खवखवत असेल तर मिठाच्या पाण्याने गुळण्या कराव्यात.

दातदुखीवर घरगुती उपचार

तुम्हाला जर अचानक दातदुखी सुरू झाली तर घरी लवंगाचे तेल असल्यास ते खूप उपयुक्त ठरते. या तेलात कापूस भिजवून दाताखाली दाबून ठेवल्याने आराम मिळतो. जर तेल नसेल तर लवंग बारीक करून दातांमध्ये ठेवा किंवा कापूर बारीक करून दुखणाऱ्या भागावर ठेवा आणि त्यावर थोडा कापूस ठेवून दाबा. यामुळे वेदनांपासूनही आराम मिळतो.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.