Health : थंडीच्या दिवसांमध्ये कोणतं पाणी प्यावं, ही चूक टाळाच

थंडीच्या दिवसांमध्ये चालून आल्यानंतर तुम्ही जे पाणी पिता त्याचा तुमच्या शरीरावर व्यापक प्रभाव पडत असतो. तर आता आपण थंडीच्या या दिवसांमध्ये चालून आल्यानंतर कोणतं पाणी प्यावं याबाबत जाणून घेणार आहोत.

Health : थंडीच्या दिवसांमध्ये कोणतं पाणी प्यावं, ही चूक टाळाच
Follow us
| Updated on: Dec 28, 2023 | 3:30 PM

मुंबई : डॉक्टर नेहमी प्रत्येकाला सकाळी उठल्यानंतर चालण्याचा सल्ला देतात. दररोज सकाळी चालल्यामुळे आपलं अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण होतं. चालल्यामुळे रक्ताभिसरण सुधारते, शुगर नियंत्रणात राहते, शरीरातील चरबी कमी होते. त्यामुळे चालणं हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतं. पण चालल्यानंतर गरम पाणी प्यावं की थंड पाणी प्यावं असा प्रश्न बहुतेक लोकांना पडतो.

आपण सकाळी चालून आल्यानंतर आपल्या शरीरातील बीपी वाढतो. त्यामुळे प्रत्येकाने चालल्यानंतर थंड पाणी पिणं फायदेशीर ठरतं. पण थंडीच्या दिवसांमध्ये चालल्यानंतर थंड पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील तापमानात अचानक बदल होतो. त्यामुळे आपल्याला ताप, सर्दी, खोकला अशा अनेक आजारांचा सामना करावा लागतो. तसंच थंड पाणी पिल्यामुळे आपल्या हृदयाच्या कार्यावरही दबाव येऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत कोमट पाणी पिणे गरजेचे आहे. हिवाळ्यात कोमट पाणी पिल्यामुळे आपलं अनेक आजारांपासून संरक्षण होतं आणि ते शरीरासाठी फायदेशीर ठरतं.

सकाळी चालल्यानंतर कोमट पाणी पिल्यामुळे रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. कोमट पाणी हे आपल्या हृदयासाठी फायदेशीर आहे. हे पाणी हृदयाचे कार्य सुधारण्यास मदत करते. तर कोमट पाणी हे आपल्या रक्तात मिसळते त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. तसंच आपला रक्तदाब संतुलित करण्यास मदत करते.

कोमट पाणी हे आपल्या पोटासाठी देखील फायदेशीर आहे. सकाळी चालल्यानंतर प्रत्येकानं दररोज कोमट पाणी पिणं गरजेचं आहे. कोमट पाणी पिल्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते, पचनाशी संबंधित सर्व समस्या कमी करते. तसंच कोमट पाणी पिल्यामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब या समस्यांपासून देखील आपला बचाव होते. तर हे पाणी पिल्यामुळे आपल्या शरीरातील चरबी देखील कमी करण्यास मदत होते.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.