How to Lose Weight: वजन कमी करण्यासाठी फॉलो करा या 10 स्टेप्स, झपाट्याने होईल वजन कमी !

| Updated on: Sep 17, 2022 | 5:15 PM

प्रत्येक व्यक्तीचे निरोगी वजन असणे खूप गरजेचे असते. निरोगी वजन हे वय, जेंडर यावर अवलंबून असते. एका संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे की, ज्या व्यक्तीचे वजन नियंत्रणात असते त्या व्यक्तीला स्ट्रोक किंवा हृदयासंबंधित आजार आणि कॅन्सरचा धोका कमी असतो.

How to Lose Weight: वजन कमी करण्यासाठी फॉलो करा या 10 स्टेप्स, झपाट्याने होईल वजन कमी !
Weight loss
Image Credit source: Tv9
Follow us on

प्रत्येक व्यक्तीचे निरोगी वजन असणे खूप गरजेचे असते. निरोगी वजन हे वय, जेंडर यावर अवलंबून असते. एका संशोधनातून अशी माहिती समोर आली आहे की, ज्या व्यक्तीचे वजन (weight) नियंत्रणात असते त्या व्यक्तीला स्ट्रोक किंवा हृदयासंबंधित आजार आणि कॅन्सरचा (Cancer) धोका कमी असतो. कोरोना महामारीच्या काळात अनेक लोकांचे वजन खूप वाढले होते व त्या व्यक्ती आता वजन कमी (Weight Loss)करण्याचा प्रयत्न करत आहेत. नॅशनल हेल्थ सर्व्हिस नुसार, कोणतीही व्यक्ती 12 आठवड्यांमध्ये सुमारे 6 किलो वजन कमी करू शकते. वजन कमी करायचे असेल, तर खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल तसेच शारीरिक हालचालही त्यामध्ये महत्वाची ठरते. वजन कमी करण्यासाठी खाली नमूद केलेल्या पद्धतींचा अवलंब करावा.

1) ब्रेकफास्ट करणे टाळू नका –

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, ब्रेकफास्ट किंवा न्याहरीमुळे वजन कमी होण्यास मदत होत नाही. मात्र सकाळी हेल्दी ब्रेकफास्ट केल्याने तुम्हाला आवश्यक ती पोषक तत्वे मिळतात, ज्यामुळे भुकेवर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. जर तुम्ही सकाळी ब्रेकफास्ट केला नाही तर पोषक तत्वं मिळणार नाहीत व दिवसभर भूक लागत राहील.

2) नियमितपणे खावे –

डॉक्टरांच्या सांगण्यानुसार, दिवसभरात नियमितपणे खात राहिल्यास कॅलरी जलदरित्या बर्न होते आणि भूकही कमी लागते. बराच वेळ काही खाल्ले नाही तर भूक वाढते आणि तुम्ही जास्त प्रमाणात खाता. त्यामुळे तुमचे वजन वाढण्याची शक्यता असते.

हे सुद्धा वाचा

3) खूप फळं आणि भाज्या खाव्यात –

फळं आणि भाज्यांमध्ये फॅट्स, कॅलरीज आणि कार्ब्स कमी असतात. त्यामुळे त्यांचे पुरेशा प्रमाणात सेवन केले पाहिजे. नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या सांगण्यानुसार, वजन कमी करण्यासाठी फळं आणि भाज्यांचे सेवन केले पाहिजे.

4) ॲक्टिव्ह रहा –

तुम्हाला जर तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला ॲक्टिव्ह राहण्याची म्हणजेच हालचाल करत राहण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक वेळेस जिममध्ये जाऊन तासनतास व्यायाम करण्याची आणि घाम गाळण्याची गरज नाही. पण दिवसभरात हालचाल करत रहा. उदा- पायी जास्त चाला, लिफ्टऐवजी पायऱ्यांचा वापर करावा, रात्री थोडा वेळ चालावे, इ.

5) खूप पाणी प्या –

नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार, अनेक वेळा लोकांना तहान लागलेली असते, मात्र ते त्याला भूक समजतात आणि खायला सुरूवात करतात. अशावेळी तुम्हाला भूकेची जाणीव झाल्यास आधी पाणी प्यावे व त्यानंतरही भूक लागल्यास मग काही हेल्दी खावे. त्यामुळे शरीरात अधिकच्या कॅलरीज जाणार नाहीत.

6) छोट्या ताटलीत खावे –

नॅशनल हेल्थ सर्व्हिसच्या सांगण्यानुसार, जे लोक छोट्या ताटलीत खातात, त्यांची भूक लवकर मिटते. व त्यांना भूक कमी करण्यात मदत मिळते. त्यामुळे नेहमी छोट्या ताटलीत पदार्थ घ्या व हळूहळू खा. पोट भरल्याची जाणीव झाल्यावर खाणं बंद करा.

7) जंक फूड खाऊ नका –

जंक फूड खाण्याची इच्छा कोणालाही होऊ शकते. त्या क्रेव्हिंगपासून वाचायची इच्छा असेल तर उत्तम मार्ग म्हणजे जंक फूड खरेदीच करू नका. ते विकत घेतले नाही, तर खाण्याची इच्छा होणार नाही. वजन कमी करायचे असेल, तर जंक फूड खाणे टाळावे.

8) मद्यपान करू नये –

काही लोक डाएटिंग करत असतानाही मद्यपान करतात, जे चुकीचे आहे. कमी जेवण जेवून तुम्ही ज्या कॅलरीजचे कमी सेवन करता, त्या कॅलरीज मद्यपान केल्यामुळे वाढतात. वजन कमी करायचे असेल मद्यपान करणे थांबवावे. त्यामुळे शरीरात एक्स्ट्रॉ कॅलरीज जात नाहीत.

9) कोणतेही पदार्थ खाणे टाळू नका –

एखादा पदार्थ बिलकुल खायचा नाही असं तुम्ही ठरवलं तर तो खाण्याची तुम्हाला जास्त इच्छा होईल. त्यामुळे नेहमीच कॅलरी, न्युट्रिअंट्स, व्हिटॅमिन आणि मिनरल्स हे लक्षात घेऊन डाएट करावे. वजन कमी करत असताना तुम्ही कधी-कधी तुमच्या आवडीचे खाद्यपदार्थांचे सेवन करू शकता, पण कॅलरीजकडे लक्ष देऊनच, असे करावे.

10) फायबरयुक्त पदार्थ खावे –

फायबरयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने वजन कमी करण्यात मदत होते. यासाठी डाळी, ड्रायफ्रुट्स, फळं, भाज्या यांचे सेवन करावे. खरंतर फायबरमुळे पोट भरलेले राहते , ज्यामुळे तुम्ही कमी खाता. त्यामुळे अतिखाणं टळतं आणि वजन कमी करण्यात मदत होते.