भारतातील असं एक गाव जिथे बायको आपल्या पतीला काठीने बदड बदड बडवते, कारण ऐकून बसेल धक्का
भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात, देशात विविध भाषा बोलल्या जातात. देशात असंख्य प्रथा परंपरा पाळल्या जातात, त्यातील काही प्रथा या खूपच वेगळ्या आहेत. अशाच एका प्रथेची माहिती जाणून घेऊयात.

भारतामध्ये विविध जाती धर्माचे लोक राहतात, देशात विविध भाषा बोलल्या जातात. देशात असंख्य प्रथा परंपरा पाळल्या जातात. असं म्हटलं जातं की इथे प्रत्येक कोसावर पाणी बदलतं आणि प्रत्येक दहा कोसावर भाषा बदलते, भारतामध्ये खेडे गावांची संख्या देखील प्रचंड आहे, प्रत्येक गावाच्या आपल्या वेगवेगळ्या प्रथा आहेत, या प्रथा आजच्या कळात देखील तेवढ्याच उत्साहात हे लोक पाळताना दिसतात प्रत्येक प्रथेमागे काही ना काही कारण आणि दंत कथा असल्याचं आपल्याला दिसून येतं. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल भारतामध्ये अशी देखील एक प्रथा आहे, जिथे पत्नी आपल्या पत्नीला लाकडाच्या काठीने मारतात, ही प्रथा मध्य प्रदेश राज्याच्या देवास गावात मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या प्रथेनुसार महिला देवीच्या पूजेनंतर आपल्या पतीची लाकडाच्या काठीने जोरदार धुलाई करतात, मात्र स्थानिक लोक मोठ्या श्रद्धेनं या प्रथेचं पालन करतात, हा देवीचा आशीर्वाद मानला जातो.
ही प्रथा मध्य प्रदेशच्या देवासमध्ये गणगौर उत्सावादरम्यान पाळली जाते, हा सर्व परिसर आदिवासी बहुल संख्या असलेला आहे. येथील महिला आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणून व्रत करतात, त्यानंतर गणगौर देवीची पूजा केली जाते, या उत्सावादरम्यान गुड तोडण्याची एक प्रथा आहे. गुड तोडणं म्हणजे ज्यामध्ये एका उंच काठीला किंवा लाकडला नारळ बांधलं जातं, हे नारळ आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न पुरुष करतात, हे नारळ ताब्यात घेत असताना महिला पुरुषांना अडवण्याचा प्रयत्न करतात, या गावातील महिला या काळात आपल्या पतींवर लाकडाच्या काठीने हल्ला देखील करतात, पुरुष आपल्या पत्नीच्या काठीच्या मारापासून वाचण्यासाठी हातात ढाल घेऊन हा खेळ खेळतात.
दरम्यान या सर्व खेळात अनेकदा पुरुषांना गंभीर दुखापत देखील होते, मात्र ही दुखापत देवीचा आशीर्वाद मानली जाते. जो व्यक्ती या खेळात जखमी होतो, त्याच्या आयुष्यात आनंद आणि सुख शांती येते, घरात समृद्धी येते असं मानलं जातं. दरवर्षी ही प्रथा पाळली जाते.
