Food | साखरेऐवजी या नैसर्गिक गोड पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा, आरोग्याला अनेक फायदे होतील!

| Updated on: Apr 21, 2022 | 11:54 AM

आपल्याकडे हेल्दी, चवदार आणि चमकदार खाद्यपदार्थांपेक्षाही गोड पदार्थ (Sweets) लोकांना जास्त खायला आवडतात. जेवणाची चव वाढवण्यासाठी बहुतेक पदार्थांमध्ये साखरेचा वापर केला जातो. मात्र, अतिप्रमाणात जेवणामध्ये साखरेचा वापर केल्याने वजन झपाट्याने वाढण्यास सुरूवात होते. शिवाय साखरेचे अतिसेवन आपल्या आरोग्यास हानी पोहोचवते.

Food | साखरेऐवजी या नैसर्गिक गोड पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा, आरोग्याला अनेक फायदे होतील!
या गोड पदार्थांचा आहारात समावेश करा.
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : आपल्याकडे हेल्दी, चवदार आणि चमकदार खाद्यपदार्थांपेक्षाही गोड पदार्थ (Sweets) लोकांना जास्त खायला आवडतात. जेवणाची चव वाढवण्यासाठी बहुतेक पदार्थांमध्ये साखरेचा वापर केला जातो. मात्र, अतिप्रमाणात जेवणामध्ये साखरेचा वापर केल्याने वजन झपाट्याने वाढण्यास सुरूवात होते. शिवाय साखरेचे अतिसेवन आपल्या आरोग्यास हानी पोहोचवते. साखरेच्या अतिसेवनामुळे मधुमेहाची (Diabetes) समस्या निर्माण होते. त्यामुळेच साखरेचे मर्यादित प्रमाणात सेवन करणे आवश्यक आहे. जर आपल्याला गोड पदार्थ खाऊनही निरोगी राहिचे असेल तर आपण आपल्या आहारामध्ये नैसर्गिक साखरेचा (Natural sugar) समावेश करायला हवा. त्यांचे मर्यादित प्रमाणात सेवन केल्याने तुमच्या आरोग्याला हानी पोहोचणार नाही. चला तर मग याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

गूळ

गूळ हा एक नैसर्गिक गोड असतो. तो उसापासून बनवला जातो. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात,. ते पचनसंस्था तंदुरुस्त ठेवते. शरीर डिटॉक्स करण्यासही मदत करते. गुळाच्या सेवनाने शरीराचे तापमानही नियंत्रित राहते. यामुळेच तुम्ही साखरेऐवजी गूळाचा आहारामध्ये समावेश करा. विशेष म्हणजे गुळाच्या मदततीने आपण घरच्या-घरी एकदम टेस्टी पदार्थ घरी तयार करू शकतो.

नारळ

नारळापासून साखर तयार केली जाते. जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही या साखरेचे सेवन करू शकता. यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि फ्रक्टोज भरपूर प्रमाणात असते. हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तुम्ही ते चहा किंवा कॉफीमध्ये वापरू शकता. नारळापासून साखर नेमकी कशी तयार करायची या संदर्भात अनेक व्हिडीओ आपल्याला इंटरनेटवर बघायला मिळतील.

खजूर

तुम्ही साखरेच्या जागी खजूर वापरू शकता. हा साखरेचा आरोग्यदायी पर्याय आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर मानला जातो. तुम्ही त्याचा सरबत स्वरूपातही वापर करू शकता. विशेष म्हणजे खजूर आपल्या आरोग्यासाठीही खूप जास्त फायदेशीर आहे. खजूरचे सेवन केल्याने शरीरातील ऊर्जा वाढण्यासही मदत होते. यामुळे खजूरचा आहारात समावेश करा.

मध

मध हे एक नैसर्गिक गोड पदार्थ देखील आहे. त्यात भरपूर पोषक असतात. तुम्ही साखरेऐवजी मध वापरू शकता. यामुळे शरीराला कोणतेही नुकसान होत नाही. मात्र, आजकाल बाजारामध्ये ओरिजनल मध मिळत नाही. काही कंपन्या मधाच्या नावावर काहीही विकत आहेत. यामुळे मध खरेदी करताना विशेष काळजी घ्या.

संबंधित बातम्या : 
Health | उन्हाळ्याच्या हंगामामध्ये किती ग्लास पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर, वाचा सविस्तरपणे!

Energy drink | उन्हाळ्यात दिवसभर उत्साही राहायचे असेल तर हे खास एनर्जी ड्रिंक्स प्या!