ताप असताना आंघोळ करणे फायदेशीर आहे की हानिकारक? डॉक्टर काय सांगतात?

ताप आल्यावर आंघोळ करणे फायदेशीर आहे की हानिकारक याबाबत मतभेद आहेत. पण तापाची तीव्रता आणि व्यक्तीची स्थिती देखील यावेळी महत्त्वाची असते. त्यामुळे ताप असताना अंघोळ करणे हे उपयुक्त आहे का नाही हे जाणून घेऊयात.

ताप असताना आंघोळ करणे फायदेशीर आहे की हानिकारक? डॉक्टर काय सांगतात?
Is bathing in a fever helpful or harmful
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 10, 2025 | 4:39 PM
हवामान बदललं की व्हायरल फिव्हरची समस्या वाढते. जेव्हा आपल्या शरीरात कोणत्याही प्रकारचा संसर्ग होतो तेव्हा शरीराचे तापमान वाढते. जेणेकरून बॅक्टेरिया किंवा विषाणू नष्ट होऊ शकतात. जेव्हा ताप येतो तेव्हा त्यांचे शरीर गरम होते आणि ही उष्णता दूर करण्यासाठी बरेच लोक थंड पाण्याने आंघोळ करतात. अनेकदा प्रश्न पडतो की तापात आंघोळ करावी का? यावर लोकांचे वेगवेगळी मतं आहेत. काही लोक म्हणतात की तापात आंघोळ केल्याने स्थिती बिघडू शकते, तर अनेकांचा असा विश्वास आहे की त्यामुळे शरीराला आराम मिळतो. याबद्दल डॉक्टरांचं मत काय आहे ते जाणून घेऊयात.
तापापासून आराम मिळण्यासाठी…
तज्ज्ञांच्या मते जेव्हा ताप येतो तेव्हा शरीराचे तापमान सामान्यपेक्षा जास्त होते. शरीराचे सामान्य तापमान 98.6°F म्हणजेच 37°C असते. जेव्हा ते 100°F किंवा त्याहून अधिक वाढते तेव्हा व्यक्तीला अशक्तपणा, थंडी वाजून येणे, डोकेदुखी आणि घाम येणे यासारख्या समस्यांना तोंड द्यावे लागते. तापापासून आराम मिळण्यासाठी औषध दिले जाते. यामुळे शरीराचे तापमान हळूहळू सामान्य होते.
ताप असताना आंघोळ करणे…
तज्ज्ञांच्या मते, ताप असताना आंघोळ करणे हानिकारक नाही, परंतु ते व्यक्तीच्या स्थितीवर अवलंबून असते. तापात कोमट पाण्याने आंघोळ करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीरावर साचलेला घाम आणि बॅक्टेरिया निघून जातात, त्वचा स्वच्छ राहते आणि व्यक्तीला ताजेतवाने वाटते. जर व्यक्ती खूप कमकुवत नसेल आणि तापमान खूप जास्त नसेल तर आंघोळ करणे सुरक्षित मानले जाते. तथापि, जर ताप खूप जास्त असेल आणि व्यक्तीला थंडी वाजत असेल तर त्या स्थितीत आंघोळ करणे टाळावे. अशा परिस्थितीत, स्पंज बाथ हा एक चांगला पर्याय असू शकतो. त्यामुळे शरीर स्वच्छ राहते आणि तापमान देखील नियंत्रित राहते.
तापाच्या तीव्रतेवर आणि व्यक्तीची परिस्थिती कशी यावर हा उपाय अवलंबून 
तज्ज्ञांच्या मते, जर तुम्ही तापाच्या वेळी आंघोळ करण्याच्या स्थितीत नसाल, तर तुम्ही कोमट पाण्यात भिजवलेल्या मऊ टॉवेलने शरीर पुसू शकता. याला स्पंज बाथ म्हणतात. हे विशेषतः मुले, वृद्ध आणि खूप तापाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरते. ते शरीराला थंड करते आणि अस्वस्थता कमी करते. एकंदरीत, असे म्हणता येईल की तापाच्या वेळी आंघोळ केल्याने आजारावर फारसा फरक पडत नाही. ते तापाच्या तीव्रतेवर आणि व्यक्तीची परिस्थिती कशी आहे यावर अवलंबून असते.