AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात दुर्दैवी रविवार, राज्यात 4 हादरवणारे अपघात, लातूर, नवी मुंबईत आक्रोश!

महाराष्ट्रात आज जार शहरात चार वेगवेगळे भयंकर अपघात झाले आहेत. या अपघातात काही ठिकाणी लोकांचा मृत्यू झाला आहे. तर काही ठिकाणी लोक गंभीर जखमी झाले आहेत. नवी मुंबईत एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे.

सर्वात दुर्दैवी रविवार, राज्यात 4 हादरवणारे अपघात, लातूर, नवी मुंबईत आक्रोश!
accident newsImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 15, 2026 | 5:02 PM
Share

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेकजण फिरायला जातात. कुठेतरी दूर फिरायला जायचं म्हणजे लोक आपाल्या वाहनांनी प्रवास करतात. परंतु आता फिरायला किंवा काही कामानिमित्त घराबाहेर पडलेल्या काही प्रवाशांसाठी हा खूपच दुर्दैवी ठरला आहे. कारण रविवारी म्हणजेच 15 मार्च रोजी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी भीषण अपघात झाले आहेत. लातूर, नाशिक, सिंधुदर्ग, नवी मुंबई अशा ठिकाणी भयानक अपघात झाले असूनकाही लोकांचा दुर्दैवी मृत्यू मृत्यू झाला आहे.

लातूरमध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू

लातूर–तुळजापूर महामार्गावरील करजखेडा चौकातील ब्रिजवर आज भीषण अपघात घडला. बोलेरो, वॅग्नर आणि होंडा सिटी या तीन चारचाकी वाहनांची एकाच वेळी जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक नागरिक घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर काही काळ लातूर–तुळजापूर महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. या आधीही या भागात महामार्गावर वेग आणि निष्काळजी वाहनचालकांमुळे गंभीर अपघात घडल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

नाशिकमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू

नाशिक जिल्ह्यातील येवला येथील येवला-कोटमगाव रोडवर मोटरसायकलने सायकलस्वारास मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सुभाष काळन या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. सदर अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. दरम्यान, दुचाकीस्वारदेखील या अपघातात जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून अपघाताची संपूर्ण घटना त्यात कैद झाली आहे.

सिंधुदुर्गमध्ये भरधाव कारचा अपघात

सिंधुदुर्गमधील मुंबई-गोवा महामार्गावरील कुडाळ वेताळ बांबर्डे पुलावर आज संध्याकाळी 7.20 च्या सुमारास भरधाव कारचा अपघात झाला. या अपघातात कारचे (एम एच 09 जी झेड 5986) मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही गंभीर जखमी झाले नाही. महामार्गावरील वेताळ बांबर्डे आणि पणदूर सीमेवरील पुलाची एक बाजू अरुंद असल्याने अपघाताचे केंद्र बनले आहे. मागील आठवड्यात याच ठिकाणी कारचा अपघात घडला होता.

नवी मुंबईत तरुणीला नेले फरफटत

नवी मुंबईतील बेलापूर सेक्टर 8 परिसरात भरधाव स्कॉर्पिओने फुटपाथवर चालणाऱ्या तरुणीला चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑरेंज कॉर्नर परिसरात घडलेल्या या भीषण अपघातात स्कॉर्पिओने तरुणीला जवळपास 100 मीटरपर्यंत फरफटत नेले. त्यानंतर दुचाकी, रिक्षा आणि पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांना धडक देत ही गाडी थांबली. या अपघातात तरुणी गंभीर जखमी झाली असून स्थानिकांच्या मदतीने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून सीबीडी बेलापूर पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.

Follow Us
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...
गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
Chhagan Bhujbal : गंगापूर रोडवरील 50 झाडांची कत्तल भोवली; भुजबळांनी दिले महत्वाचे आदेश
गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
Kalachowki : गणेशोत्सवात महागणपती मंडपात काळीज पिळवटून टाकणारी घटना
हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
Mumbai Cha Raja : हार चढवला, पण फुलांचा नाही; मुंबईच्या राजाला चक्क 101..VIDEO व्हायरल
दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, म्हणाले...
Sanjay Raut | मातोश्रीवर येऊन प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न घाणेरडा; दिशा सालियन प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रीया, पुढे म्हणाले...
भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण
BMW Car Accident | भरधाव BMWचा अक्षरशः चक्काचूर! मुंबईच्या कोस्टल रोडवर चालकाचं नियंत्रण सुटलं अन् BMW थेट खाली कोसळली