AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : ‘गुमशुदा की तलाश’, देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हरवलेत.. – राऊतांची खोचक टीका

संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहा संसदेतून बेपत्ता असल्याचा आरोप करत 'गुमशुदा की तलाश' जाहिरातीची खिल्ली उडवली. दोन आठवड्यांपासून ते संसदेत अनुपस्थित असल्याने राऊतांनी त्यांच्या पदावरील अधिकारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पुणे व दिल्लीतील निदर्शनांचा उल्लेख करत, लोकांना सामोरे जाण्याचे आवाहन केले. मतांच्या चोरीचा आरोप करत त्यांनी लोकप्रतिनिधींना धारेवर धरले.

Sanjay Raut : 'गुमशुदा की तलाश', देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हरवलेत.. - राऊतांची खोचक टीका
संजय राऊतांचा मोदी- शहांना टोलाImage Credit source: TV9
| Updated on: Aug 03, 2026 | 10:21 AM
Share

संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या अनुपस्थितीवरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. 2 आठवड्यांपासून पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांचं संसदेमध्ये दर्शन नाही. मग एवढे कोट्यावधी पैसे खर्च करून नवी संसद का उभारली ?  संसद इन्स्टाग्रामवरच चालवा ना असा टोला लगावत संजय राऊत यांनी सरकारवर निशाणा साधला. जे प्रधानमंत्री देशातल्या संसदेला सामोरे जायला घाबरतात, त्याना पदावर राहण्याचा अधिकार आहे का ? असा थेट सवाल विचार राऊतांनी टीकास्त्र सोडलं.

काय म्हणाले राऊत ? 

आज आम्ही सगळ्यांनी ठरवलंय जाहिरात द्यायची ‘गुमशुदा की तलाश’..हरवले आहेत, देशाचे पंतप्रधान आणि देशाचे गृहमंत्री. 2 आठवडे झाले संसदेमध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाचे गृहमंत्री अमित शाह, यांचं खासदारांना दर्शन झालेलं नाही. मग संसद कशाकरता चालवताय? इन्स्टाग्रामवरच चालवा ना संसद, ट्विटरवर चालवा. नवीन संसद कशाकरता उभी केली? मोदींनी 20 हजार कोटी रुपये खर्च करून ? याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल. जर तुम्ही संसदेत यायला घाबरत असाल, मग नव्या संसदेचं निर्माण केलं कशाकरता, फक्त तुमची पाटी लावण्यासाठी ? जे प्रधानमंत्री देशातल्या संसदेला सामोरे जायला टरकतात, त्यांना देशाच्या पंतप्रधानपदी राहण्याचा अधिकार आहे का ?  असा प्रश्न राऊत यांनी विचारला.

जे गृहमंत्री मोठमोठ्या बाता मारतात, धमक्या देता ईडी-सीबीआयच्या. ते गृहमंत्री देशाच्या संसदेच्या सभागृहात यायला घाबरतात, त्यांना देशाच्या गृहमंत्रीपदावर राहण्याचा अधिकार खरोखर आहे का ? याचं आत्मचिंतन आता भाजपच्या खासदारांनी आणि इतर पुढाऱ्यांनी करायला पाहिजे, असं राऊत म्हणाले.

अमित शहांवर साधला निशाणा 

आज आम्ही त्यांना पुन्हा बोलावण्याचा प्रयत्न करू आणि अमित शहांचा राजीनामा मागण्याचा आमचा उपक्रम, ती मागणी चालूच राहील. हे महाशय परवा पुण्यात होते, रात्रीच्या काळोखात पुण्यात गेले. तिथे त्यांच्याविरोधात निदर्शनं झाली, आज दिल्लीत त्याच्या विरोधात निदर्शनं सुरू आहेत. जनतेला सामोरं जा ना.. जनतेल तुम्ही सामोरं का जात नाही. तुम्हाला जर लोकांनी खरोखर निवडून दिलं असेल, तर तुम्ही लोकांसमोर जायला पाहिजे. आणि जर तुम्ही चोऱ्यामाऱ्या  करून, लफंगेगिरी करून , व्होटचोरी करून, दहशतीच्या मार्गाने निवडून आले असाल तर ती दहशत तुम्हाला छळत्ये, एवढंच मी सांगेन, अशी टीका राऊत यांनी केली.

Follow Us
मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातवरील मोठी अपडेट समोर
Mumbai Water Cut Update | मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातवरील मोठी अपडेट समोर
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते...
विकसीत महाराष्ट्राच्या दिशेने एक पाऊल पुढे; CM फडणवीसांच्या हस्ते नागपूरमध्ये AI लॅबचे भव्य उद्घाटन
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं...
मोठी बातमी! महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायद्याला प्रकाश आंबेडकरांचं आव्हान, थेट कोर्टात...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट...
अभिजीत दीपके भेटीवरून भाजपच्या बड्या नेत्यांची नाराजी; थेट म्हणाले, शिंदेंनी त्यांच्या नेत्यांना...
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या
विकास कामांसाठी... देवेंद्र फडणवीस खरंच दिल्लीला जाणार? भाजपच्या बड्या पुढाऱ्याने अखेर सांगितलंच
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता
नाना पटोले यांचे धुतले दुधाने पाय, विरोधकांकडून टीका होताच कार्यकर्ता म्हणाला..
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील...
अखेर तेच घडलं! राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का? बीडमधील पवारांच्या नेत्याचा भाजपला पाठिंबा?
संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
Pune | संकष्ट चतुर्थीनिमित्त दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची मोठी गर्दी
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा
CJP च्या मोठ्या हालचाली, संभाजीनगरात 15 ते 20 प्रमुख सदस्य... पुन्हा देशभराचं लक्ष वेधणार?
थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत...
Eknath Shinde | थेट एकनाथ शिंदेंशी पंगा! पुन्हा भाजप नेत्याचं सुचक विधान, महायुतीत खडाजंगी