AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काजू-बदामवरून राजकारण तापलं; हिंगोलीत कृषीमंत्री भरणेंना शेतकऱ्यांचा घेराव, टीकेनंतर काय म्हणाले?

काजू-बदामवरून राजकारण तापलं आहे. यावरून हिंगोलीत कृषीमंत्री भरणेंना शेतकऱ्यांचा घेराव घालण्यात आलं. यानंतर भरणेंंनी या घटनेवर पहिली प्रतिक्रिया दिली.

काजू-बदामवरून राजकारण तापलं; हिंगोलीत कृषीमंत्री भरणेंना शेतकऱ्यांचा घेराव, टीकेनंतर काय म्हणाले?
bharane newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 19, 2026 | 7:24 PM
Share

राज्यात शेतकरी दुष्काळजन्य परिस्थितीमुळे अडचणीत सापडला आहे. दुष्काळामुळे हातातोंडाशी आलेलं पीक जळून गेलं आहे. यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेडमधील आयोजित बैठकीत मंत्री आणि आमदारांसमोर काजू, बादाम ठेवण्यात आले होते. यावरून राज्यभरात संतापाची लाट पसरली आहे. या बैठकरीच्या व्हिडिओवर कृषीमंत्री दत्ता भरणे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली.

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज शनिवारी वसमत तालुक्यातील टाकळगाव शेत शिवारात नुकसानग्रस्त सोयाबीनची पाहणी केली. शेतीच्या बांधावर गेल्याशिवाय परिस्थितीचे गांभीर्य कळत नाही, असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. यावेळी काजू-बादामाच्या व्हायरल व्हिडिओवर भरणे म्हणाले, ‘आमच्यासमोर काजू-बदामची प्लेट आली नव्हती. बैठक चार तास चालल्यामुळे टीममधील एखाद्या प्रतिनिधीला साखर असल्यामुळे कुणी घेतलं असेल’. शेतकऱ्यांच्या समस्येवर भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करणे ही आपली जबाबदारी आहे. हा प्रश्न माझ्या दृष्टीने नवा आहे. तुमच्या भावना समजून घेतो. या प्रकरणी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कानावर भावना घालतो. तुमच्या भावना तीव्र आहेत’.

‘हे सरकार नुकासानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत. एनडीआरएफची मदत घेऊच. शासन, विम कंपन्या, कर्जमाफी करणाऱ्या योजना असतील, जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मदत करू. शेतीची पाहणी करण्यासाठी आढावा बैठक घेतली होती. आज या बैठकीत अनेक आमदार, खासदारांनी मते मांडली. सर्व खासदारांनी शेतकरी कसा अडचणीत आहे, त्याबद्दल सांगितले. मी आश्वासित करतो की, पीक जळालं आहे. हातचं पीक गेलं. पिकावर अनेक स्वप्न रंगवली होती. परंतु निश्चितपणे स्वप्न भंग झालं आहे. या अडचणीच्या काळात जितकी मदत करता येईल, यासाठी मुख्यमंत्र्‍यांनी निर्णय घेतले आहेत. आम्ही पण शेतकऱ्यांसोबत आहोत. आपण निसर्गच्या पुढे नाही. हे मानवनिर्मित संकट आहे. नैसर्गिक संकट आहे. त्याला सामोरे जावं लागेल. राज्य सरकार म्हणून जितकी मदत शक्य आहे, तितकी मदत करू. परंतु शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही’.

सोशल मीडियावर दुष्काळासंदर्भात ही यादी फिरत आहे. त्यात वसमत तालुका वगळ्याचे सांगितले जात आहे. यावर कृषीमंत्री भरणे म्हणाले, ही दिशाभूल करणारं वृत्त आहे. ही फेक बातमी आहे. अशी कोणतीही यादी काढली नाही. हे खोटं वृत्त कोण पसरवत आहे, याची चौकशी केली जाईल’. तर हिंगोलीत चारा टंचाई निर्माण झाली आहे. यावर भरणे म्हणाले, भविष्यात पशुधनाला चारा कमी पडणार नाही. आमच्या पिण्याच्या पाण्याबाबत अडचण येणार नाही. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना नियोजन करण्यास सांगितलं आहे’.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी