सीडीआर, टॉवर लोकेशन अन् पोस्टमार्टम रिपोर्ट, दिशा सालियन प्रकरणात दोषी कोण… निलेश राणेंची प्रतिक्रिया चर्चेत
Nilesh Rane On Disha Salian Case : शिंदेसेनेचे आमदार निलेश राणे यांनी दिशा सालियान प्रकरणावर भाष्य केलं आहे. दिशा सालियन प्रकरणात राणे कुटुंबीयांनीच सर्वात प्रथम आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. टीव्ही९ मराठीशी बोलताना त्यांनी नेमकं काय म्हटलंय?

दिशा सालियान प्रकरणावर बोलताना निलेश राणे म्हणाले की, “सीबीआयने मालवणी पोलिस स्टेशनमधून सीडीआर, टॉवर लोकेशन रिपोर्ट मागितले आहेत. पोस्टमार्टम रिपोर्ट मागितले आहेत. आता सीबीआयने एफआयार लॉन्च केला आहे. आता ते त्यांचा तपास करतील. कोण आरोपी असावेत कोण नसावेत. एफआयआरमध्ये कोणाचं नाव आलेलं नाही हेही नंतरच कळणार आहे. पण आता यामध्ये जे कोणी असतील, ज्यांनी गुन्हा केलाय त्यांना सगळ्यांना कायद्याच्या चौकटीत आणलं पाहिजे, पण ते कोण असावेत हे मी आता सांगू शकत नाही. तपासानंतरच ते समोर येईल”, टीव्ही९ मराठीशी बोलताना त्यांनी या सगळ्याप्रकरणी त्यांचे मत मांडले आहे.
आधी केलेल्या आरोपांचे काही पुरावे सीबीआयकला सोपवणार का असं विचारल्यावर निलेश राणेंनी सांगितलं की, “निलेश ओझा यांनी कोर्टाला काही पुरावे दिले आहेत. प्रकरणातले काही तथ्य जुळून येत नाहीत. यामध्ये आता युक्तिवाद होईल. त्यानंतर सगळं समोर येईल. सालियानचे वकिल निलेश ओझांनी जमवलेले पुरावे या प्रकरणामध्ये महत्त्वाचे ठरणार आहेत. न्यायलयाने सीबीआयला आदेश दिले आहेत की ही केस पुन्हा ओपन व्हावी. त्यामुळे पुराव्यांच्या आधारे आता पुढे याप्रकरणात कारवाई होईल, असं राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, आज दिशा सालियन प्रकरणात दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. सतीश सालियान वकील निलेश ओझा यांच्यासह मातोश्रीवर पोहोचले. आदित्य ठाकरेंविरोधात 500 कोटी रुपयांची मानहानीची नोटीस देण्यात आली. कलानगरच्या प्रवेशद्वारावर आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी ही नोटीस स्वीकारली. नोटीसमध्ये सात दिवसांत जाहीर माफी मागण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा 500 कोटींचा दावा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी मातोश्रीबाहेर शिवसैनिकांची मोठी गर्दी झाली आणि काही काळ तणावाचे वातावरण होते. सतीश सालियान यांनी वकिलांना धमकी दिल्याचा आरोप केला. दरम्यान, आदित्य ठाकरेंच्या बाजूनेही प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. आदित्य ठाकरेंसाठी त्यांचे भाऊ आमदार वरुण देसाईही धावून आले. आदित्य यांच्यावरील आरोप हे तथ्यहीन असल्याचे मी गेली अनेक वर्ष सांगतो आहे, असं त्यांनी सांगितलं आहे.
