AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Water Cut Update | मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातवरील मोठी अपडेट समोर

Mumbai Water Cut Update | मुंबईकरांना दिलासा! पाणीकपातवरील मोठी अपडेट समोर

| Updated on: Aug 03, 2026 | 9:57 AM
Share

राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलाशयांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून, मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांतील पाणीसाठा जवळपास 89 टक्क्यांपर्यंत पोहोचला असून, यामुळे सध्या लागू असलेली 10 टक्के पाणीकपात लवकरच मागे घेतली जाण्याची शक्यता आहे. याबाबत मुंबई महानगरपालिकेकडून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

यंदा जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैच्या अखेरीस राज्यभर दमदार पाऊस झाला. या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, धरणे आणि जलाशयांतील पाणीसाठ्यातही लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रातही गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असल्याने जलसाठा वेगाने वाढत आहे.

सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख जलाशयांमध्ये आवश्यक क्षमतेच्या जवळपास 89 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मोडक सागर आणि विहार तलाव पूर्ण क्षमतेने भरले असून, तानसा आणि तुळशी तलावही जवळपास तुडुंब भरले आहेत. या सातही जलाशयांतून मुंबईला दररोज सुमारे 4,100 दशलक्ष लिटर (MLD) पाणीपुरवठा केला जातो.

उन्हाळ्यात पाणीसाठा सुरक्षित ठेवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने 10 टक्के पाणीकपात लागू केली होती. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांतील मुसळधार पावसामुळे जलाशयांतील पाणी झपाट्याने वाढल्याने पाणीपुरवठ्यातही वाढ करण्यात आली आहे. सध्याचा पाणीसाठा आणि आगामी पावसाचा अंदाज लक्षात घेता पाणीकपात रद्द करण्याबाबत पालिका प्रशासन सकारात्मक असल्याचे समजते.

दरम्यान, सातही तलावांतील समाधानकारक पाणीसाठ्यामुळे लवकरच मुंबईतील 10 टक्के पाणीकपात रद्द करण्याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता असून, त्यानंतर मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Published on: Aug 03, 2026 09:57 AM

Follow Us