नव्या कोरोना व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव; आरोग्यमंत्र्यांचं जनतेला महत्वाचं आवाहन

Maharashtra Health Minister Tanaji Sawant on Corona Virus New Variant jn 1 : कोरोना वाढतोय... सरकारची तयारी किती?; आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची सविस्तर प्रतिक्रिया. आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला महत्वाचं आवाहन केलंय. नवा व्हेरिएंट किती घातक आहे? यावरही ते बोलले आहेत.

नव्या कोरोना व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव; आरोग्यमंत्र्यांचं जनतेला महत्वाचं आवाहन
Follow us
| Updated on: Dec 24, 2023 | 4:16 PM

भूषण पाटील, प्रतिनिधी-टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर | 24 डिसेंबर 2023 : नव्या कोरोनाच्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. JN 1 या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. अशात राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी राज्याच्या जनतेला महत्वाचं आवाहन केलं आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट सौम्य आहे. मात्र तरिही यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. नव्या व्हेरियंटच्या दृष्टीने तयारी या आधीच झाली आहे. केरळमध्ये जे तीन मृत्यू झाले. त्यात JN 1 पॉझिटिव्ह रूग्ण नव्हते. काल टास्क फोर्सची बाबत बैठक झाली. रमण गंगाखेडकर हे टास्क फोर्सचे प्रमुख असतील. त्यांच्यासोबत काल माझी बैठक झाली आहे, असं आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले.

जनतेला काय आवाहन?

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा महाराष्ट्रात शिरकाव झाला आहे. ‘जेएन1’ या कोरोना व्हेरिएंटचा एक रुग्ण सिंधुदुर्गमध्ये आढळला. त्यानंतर यंत्रणा अलर्टवर आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी जनतेला आवाहन केलं आहे. येत्या काळात गर्दीच्या ठिकाणी जाताना काळजी द्या. नागरिकांनी काळजी घेऊन गर्दीच्या कार्यक्रमाला जायला हवं. पण तिथं जाताना काळजी घ्या. राज्यातील सर्व सरकारी हॉस्पिटलमध्ये याबाबत मॉक ड्रिल घेतलं आहे, असं सावंत म्हणालेत.

यंत्रणा सज्ज- सावंत

कोणत्याही सरकारी दवाखान्यात साहित्य धुळखात पडून नाही. याची खात्री आम्ही केली आहे. पुन्हा कोरोनाचं संकट आलं तर यंत्रणा सज्ज आहे, असंही सावंत म्हणालेत. कोल्हापूरमध्ये कोविड काळात झालेल्या साहित्य खरेदी घोटाळ्याची मी पूर्ण माहिती घेतली नाही. या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. कोणी दोषी आढळलं तर करावाई नक्की होणार आहे, असंही तानजी सावंत म्हणालेत.

कोरोनाचा नवा व्हेरिएंट आला आहे. महाराष्ट्रातही याचा रूग्ण आढळला आहे. त्यामुळे मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येत आहे. सॅनिटायझर वापरण्याचं आवाहन केलं जात आहे. कोविड-19 ची लक्षणं या व्हेरिएंटमध्ये आहेत. कोरोनाच्या रूग्णांमध्ये सर्वात सामान्य लक्षणांमध्ये ताप, सर्दी, घसा खवखवणे, डोकेदुखी आणि सौम्य गॅस्ट्रोइंटेस्टाइनल लक्षणं यांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.