चिकू खाताय जरा थांबा… ‘या’ लोकांनाही चुकूनही करू नका सेवन फायदा होण्याऐवजी होईल नुकसान

चिकू आपल्या शरीराला बऱ्याच आजारांपासून दूर ठेवतं. चिकूमध्ये असणारे कॅल्शियम व फॉस्फरस हे तुमच्या शरीरातील लोहाचं प्रमाण हे संतुलित ठेवण्याचे कार्य करते. पण काही लोकांना चिकूचे सेवन आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

चिकू खाताय जरा थांबा... या लोकांनाही चुकूनही करू नका सेवन फायदा होण्याऐवजी होईल नुकसान
चिक्कू
Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Feb 28, 2025 | 5:53 PM

आजकाल बाजारात गोड आणि रसाळ चिकू सहज मिळतात. तसेच आरोग्य चांगले राहण्यासाठी अनेकजण डाएटमध्ये फळांचे सेवन करत असतात. त्यातच चिकू या फळाचे सेवन करणे आरोग्यासाठी चांगले मानले जाते. चिकूमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जे बद्धकोष्ठता, जळजळ आणि सांधेदुखीपासून मुक्त होण्यास मदत करतात. फायबरने समृद्ध असलेले चिकू पचनासाठी एक उत्कृष्ट फळ आहे. मात्र जास्त प्रमाणात चिकू खाणे काही लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. चला जाणून घेऊया चिकू खाणे कोणी टाळावे?

चिकू खाण्याचे नुकसान, या लोकांनी चुकूनही खाऊ नका

मधुमेह – मधुमेह असलेल्या रुग्णांनी चिकू या फळाचे सेवन करू नये. कारण चिकू हे फळ खूप गोड असते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांना चिकू न खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात. मधुमेहांनी जर चिकूचे सेवन केले तर त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे चिकू खाणे या लोकांनी पूर्णपणे टाळावे.

ॲलर्जी – तुम्हाला जर ॲलर्जी असेल तर चिकूचे सेवन करणे टाळावे. काही लोकांना चिकूचे सेवन केल्याने ॲलर्जी होते कारण त्यात टॅनिन आणि लेटेक्स नावाची रसायने असतात ज्यामुळे शरीरात ॲलर्जी होऊ शकते. त्यामुळे चिकू न खाण्याचा सल्ला दिला जातो.

पचनाची समस्या – चिकूचे सेवन पोटाचे विकार कमी करण्यासाठी आणि पचनासाठी चांगले फळ आहे. यात फायबरचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे आतड्याचे आरोग्य सुधारते. परंतु जास्त चिकू खाल्ल्याने तुमच्या पाचन तंत्रावर दबाव येऊ शकतो, ज्यामुळे पचनाच्या अनेक समस्या वाढू शकतात.

वजन वाढणे – तुम्ही वजन कमी करण्यासाठी फळांचे सेवन करता आणि त्यात जर चिकूचा समावेश असेल तर चिकू खाणे थांबवा. कारण चिकू खाल्ल्याने तुमचे वजन वाढू शकते. चिकूचे मोठ्या प्रमाणात सेवन केल्याने वजन वाढण्यास मदत होते. विशेषत: जे चिकूपासून शेक बनवतात त्यांचे वजन वाढण्याचा धोका जास्त असतो.

तोंडाची चव बदलणे – काही वेळा चिकू खाल्ल्यानंतर चवीतही बदल जाणवतो. विशेषत: जर तुम्ही कच्चे चिकू खाल्ले तर यामुळे तोंडाची चव कडू होऊ शकते. चिकूमध्ये भरपूर प्रमाणात लेटेक्स आणि टॅनिन असतात ज्यामुळे तोंडाची चव कडू होऊ शकते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)