AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलांसाठी घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा ओट्स केळ्याचे पॅनकेक्स, चवीसोबतच मिळेल भरपूर पोषण

ओट्स आणि केळी दोन्ही पोषक तत्वांनी परिपूर्ण आहेत. त्यांच्यापासून बनवलेले पॅनकेक्स मुलांसाठी एक चविष्ट आणि आरोग्यदायी नाश्ता ठरू शकतात. चला ओट्स आणि केळी वापरून चविष्ट व पौष्टिक पॅनकेक्स बनवण्याची एक सोपी रेसिपी जाणून घेऊयात.

मुलांसाठी घरी अगदी सोप्या पद्धतीने बनवा ओट्स केळ्याचे पॅनकेक्स, चवीसोबतच मिळेल भरपूर पोषण
| Edited By: | Updated on: Jul 14, 2026 | 4:55 PM
Share

आजच्या काळात आपण आपल्या मुलांसाठी संतुलित आणि पौष्टिक आहार देण्याकडे जास्त लक्ष देत असतो. कारण मुलांच्या शरीराला योग्य पोषणा मिळालेले तर त्यांच्या शारीरिक विकासाला तर मदत होतेच, शिवाय दिवसभर सक्रिय राहण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जाही मिळते. म्हणूनच आपल्यापैकी अनेक पालक हे अनेकदा अशा पदार्थांच्या शोधात असतात जे चविष्ट आणि पौष्टिक दोन्ही असतात आणि जे त्यांच्या मुलांना सहज आवडतील.

त्यातच रोजच्या नाश्त्यात आपण ओट्स आणि केळी दोन्ही सेवन करत असतो. कारण ते दोन्ही पोषक तत्वांनी समृद्ध आहेत. ओट्समध्ये फायबर, प्रथिने, लोह , मॅग्नेशियम आणि बी जीवनसत्त्वे असतात, तर केळी पोटॅशियम, व्हिटॅमिन बी6, व्हिटॅमिन सी, फायबर आणि नैसर्गिक कर्बोदकांचा चांगला स्रोत आहेत. चला तर मग आजच्या लेखात आपण मुलांसाठी आरोग्यदायी ओट-केळीचे पॅनकेक्स कसे बनवायचे, ते अधिक पौष्टिक बनवण्यासाठी काय करता येईल आणि ते तयार करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, हे जाणून घेऊयात.

मुलांसाठी ओट्स-केळ्याचे पॅनकेक्स कसे बनवायचे?

ओट-केळीचे पॅनकेक्स बनवण्यासाठी, प्रथम मिक्सरमध्ये ओट्सची बारीक पुड बनवा. या मिश्रणात पिकलेली केळी मॅश करा. नंतर थोडे दूध, चिमूटभर दालचिनी पूड आणि बारीक चिरलेले बदाम, अक्रोड व मनुका टाकून घट्ट मिश्रण तयार करा. आवडीनुसार चवीसाठी थोडे मधही यात मिक्स करू शकता.

नॉन-स्टिक पॅनला हलके तूप लावून, दोन्ही बाजूंनी सोनेरी तपकिरी होईपर्यंत हे पॅनकेक्स बेक करा. हे पॅनकेक्स फायबर, प्रथिने, आरोग्यदायी चरबी, पोटॅशियम, लोह आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे व खनिजे यांचा चांगला स्रोत आहेत. ते मुलांसाठी पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता म्हणून दिले जाऊ शकतात.

ओट्स-केळ्याचे पॅनकेक्स अधिक पौष्टिक बनवण्यासाठी त्यात काय मिक्स करावे?

ओट-केळीचे पॅनकेक्स अधिक पौष्टिक बनवण्यासाठी त्यात बारीक चिरलेले काजू, पिस्ते, चिया सीड्स किंवा भोपळ्याच्या बिया टाका. याव्यतिरिक्त, दही, दूध किंवा चीज पावडर मिक्स केल्याने प्रथिनांचे प्रमाण वाढू शकते.

चव आणि पोषणमूल्ये वाढवण्यासाठी सफरचंद, स्ट्रॉबेरी किंवा ब्लूबेरी यांसारखी फळे देखील टाकता येतात. तुमच्या मुलाच्या वयानुसार योग्य घटक निवडण्याचे लक्षात ठेवा आणि कोणताही नवीन पदार्थ देण्यापुर्वी ॲलर्जीची शक्यता विचारात घ्या.

बाळांसाठी ओट्स-केळ्याचे पॅनकेक्स बनवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात?

पॅनकेक बनवण्यासाठी नेहमी ताजे, चांगल्या प्रतीचे ओट्स, केळी आणि इतर साहित्य वापरा. अगदी काही वर्षांची लहान मुलं जर पॅनकेक्स खाणार असतील तर यामध्ये सुकामेवा बारीक चिरून किंवा वाटून द्या. पॅनकेक्स नेहमी ताजेच तयार करून द्या आणि आपल्या मुलाचे वय व पौष्टिक गरजा लक्षात घेऊन साहित्य निवडा.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

Follow Us
सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतु नव्हता, वडेट्टीवारांची दिलगीरी
सुप्रिया सुळेंवर आरोप करण्याचा हेतु नव्हता, विजय वडेट्टीवारांची दिलगीरी
सतेज पाटील आणि भाजप समर्थक शिवाजी पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
सतेज पाटील आणि भाजप समर्थक आमदार शिवाजी पाटलांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी...
आरोपी सुनील गाडवे हा रोहित पवारांचा उजवा हात; एमपीएससी पेपरफुटी प्रकरणी बड्या नेत्याचा मोठा दावा
जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक
Nepal Flood : जिथे हिमनदी फुटली, महाप्रलय आला; तिथे पोहोचलं चीनचं हेलिकॉप्टर, थरारक VIDEO
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; भीषण अपघात...
दोन जणांनी गमावला जीव, विमानाचा तर अगदी चुरा झाला; कानपूरमध्ये विमानाचा भीषण अपघात
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारताची तयारी...
मोदींचा युवा खेळाडूंना खास संदेश; 2036 ऑलिम्पिकसाठी भारत मोठ्या तयारीत, आता...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट...
धारशिवमध्ये बंड करणाऱ्या नगरसेवकाच्या घराबाहेर जोरदार बॅनरबाजी; थेट लिहिलं, एक खोका...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट...
सोशल मीडियाच्या अतिवापराबाबत अमेरिकेचा मोठा निर्णय, आता थेट... नवा नियम काय?
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी...
भरत गोगावले पालकमंत्री झाल्यानंतरही रायगडमध्ये तटकरे आणि दळवी यांच्यात राजकीय संघर्ष
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?
नेपाळच्या महाप्रलयाला चीन जबाबदार का?