चिकन, मटणाला टक्कर देणारी ‘ही’ डाळ! वजनापासून डायबिटीजपर्यंत सर्वच कंट्रोलमध्ये

मसूर डाळ चिकन आणि मटनापेक्षाही अधिक पौष्टिक मानली जाते. प्रोटीनचा उत्तम स्रोत असलेली ही डाळ शाकाहारी लोकांसाठी वरदान आहे. वजन कमी करणे, मधुमेह नियंत्रणात ठेवणे, हाडे मजबूत करणे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी ती अत्यंत गुणकारी आहे. 

चिकन, मटणाला टक्कर देणारी ही डाळ! वजनापासून डायबिटीजपर्यंत सर्वच कंट्रोलमध्ये
Masoor Dal
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 16, 2026 | 10:43 PM

तुम्ही व्हेजेटेरियन आहात आणि पुरेपूर प्रोटीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहात, तर तुमच्यासाठी एक डाळ अत्यंत कामाला येऊ शकते. या डाळीतून चांगलं प्रोटीन मिळतं. म्हणजे ही डाळ प्रोटीनचा एक चांगला सोर्स मानली जाते. चिकन आणि मटनापेक्षाही ही डाळ हेल्दी आणि पॉवरफूल मानली जाते. ही डाळ दुसरी तिसरी कोणती नसून अर्थातच मसूरची डाळ आहे. मसूरची डाळ आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानली जाते. मसूरच्या डाळीला लाल मसूरही म्हटलं जातं. मसूरच्या डाळीत आयरन, प्रोटीन, फायबर, मिनरल आणि कार्बोहायड्रेट सारखे पोषक तत्त्व असतात. आरोग्यासाठी ही पोषक तत्त्व अत्यंत महत्त्वाची असतात. आधी या डाळीची रेसिपी आणि नंतर तिचे फायदे जाणून घेऊ.

अशी बनवा मसूरची डाळ

मसूरची डाळ बनवताना सर्वात आधी ही डाळ चांगली धूवून काढा. त्यानंतर कुकरमध्ये पाण्यासोबत शिजवा. त्यात मीठ आणि अद्रक टाका. चांगली शिजल्यावर पॅनमध्ये तेल गरम करा. त्यात जीरे आणि तेजपत्ता टाका. त्याचा तडतड आवाज झाल्यावर त्यात कापलेला टमाटर टाका. त्यानंतर तेल वेगळं होईपर्यंत ते फ्राय करा. नंतर यात आवश्यक तेवढी हिरवी मिरची, गरम मसाला, धने पावडर आणि लाल मिरची मिक्स करा. या मिश्रणात डाळ टाका आणि शिजवा. मंद आचेवर 10 मिनिटे डाळ शिजवा. त्यानंतर वरून चिरलेली कोथिंबीर टाका. तुमची डाळ तयार आहे.

Loading...

डाळ खाण्याचे फायदे

1. स्थूलपणा

मसूरच्या डाळीत फायबर आणि प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं. त्यात कॅलरी अत्यंत कमी असतात. त्यामुळे वजन कमी होतं. जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर मसूरची डाळ डाएटमध्ये सामील करा.

2. डायबिटीज

मसूर डाळीत फायबरचे गुण असतात. त्याचा डायबिटीज रुग्णांना फायदाच होतो. तुम्ही डायबिटीजचे रुग्ण असाल तर तुम्ही मसूर डाळीचं सेवन करू शकता.

3. हाडे मजबूत

मसूरच्या डाळीत कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचं प्रमाण अधिक असतं. त्यामुळे हाडे मजबूत होतात.

4. स्किन

मसूरच्या डाळीत पॉवरफूल अँटिऑक्सिडंट असतात. ते स्किनच्या टिशूंना फ्रि रेडिकल्सपासून वाचवतात. मसूर डाळ खाल्ल्याने स्किन हेल्दी राहते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us