AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विमानतळावर स्क्रिनिंग, जिनोम सिक्वेन्सिंग… ओमिक्रॉन रोखण्यासाठी ‘या’ गोष्टींवर भर देण्यास सुरू

ओमिक्रॉन व्हायरसने रविवारपर्यंत अनेक देशांमध्ये हातयपाय पसरले आहेत. नेदरलँड, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही हा जीवघेणा व्हायरस पोहोचला आहे.

विमानतळावर स्क्रिनिंग, जिनोम सिक्वेन्सिंग... ओमिक्रॉन रोखण्यासाठी 'या' गोष्टींवर भर देण्यास सुरू
Omicron Variant
| Edited By: | Updated on: Nov 29, 2021 | 4:21 PM
Share

नवी दिल्ली: ओमिक्रॉन व्हायरसने रविवारपर्यंत अनेक देशांमध्ये हातयपाय पसरले आहेत. नेदरलँड, डेन्मार्क आणि ऑस्ट्रेलियातही हा जीवघेणा व्हायरस पोहोचला आहे. हा व्हायरस कोरोना व्हायरसपेक्षाही अधिक घातक आणि वेगाने पसरणारा असल्याने त्याला रोखण्यासाठी अनेक देशात कडक निर्बंध घालायला सुरुवात झाली आहे. ओमिक्रॉन रोखण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण उपायही सांगितले जात आहेत. त्यात विमानतळावर स्क्रिनिंग करण्यापासून ते जिनोम स्किवेन्सिंगपर्यंतच्या पर्यायांचा समावेश आहे.

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनेही तातडीने पावलं उचलायला सुरुवात केली आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद ठेवावी की ठेवू नये यावर केंद्र सरकार विचार करत आहे. तसेच ज्या देशांमध्ये या नव्या विषाणूचा फैलाव झाला आहे. त्या देशांची यादीही केंद्र सरकारने जारी केली आहे. त्या दक्षिण आफ्रिका, चीन, बोस्तवाना, यूके, ब्राझिल, इस्रायल, बांग्लादेश, मॉरिशस, न्यूझीलंड, जिम्बाब्वे, सिंगापूर आणि हाँगकाँगचाही समावेश आहे.

ओमिक्रॉन रोखण्यासाठी…

>> ओमिक्रॉन रोखण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना महत्त्वाचे आदेश दिले आहेत. कोरोनाच्या टेस्ट वाढवणे, आरोग्य सेवा मजबूत करणे, जिनोम सिक्वेन्सिंग वाढवण्याचे केंद्राने राज्यांना निर्देश दिले आहेत. ओमिक्रॉनच्या धोक्याबाबत जागतिक स्तरावर परीक्षण झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू करण्याबाबतच्या तारखेबाबत सरकार निर्णय घेणार आहे. शुक्रवारी केंद्र सरकारने 15 डिसेंबरपासून वाणिज्यिक आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.

>> सरकारने परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची टेस्टिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या देशात नव्या विषाणूचा फैलाव झाला आहे. त्या देशातून येणाऱ्या प्रवाशांवर अधिक लक्ष दिलं जाणार आहे. विमानतळ आणि बंदरांवर टेस्टिंगचे नियम अधिक कडक करण्यात आले आहेत.

>> राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना नव्या व्हेरिएंटचा फैलाव होऊ नये म्हणून टेस्टिंग, हॉटस्पॉटची पाहणी, लसीकरण आणि आरोग्य सुविधा मजबूत करण्याच्या सूचना केल्याचं केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितलं. परदेशातून आलेल्या प्रवाशांची स्क्रिनिंग करा आणि त्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन करा. तसेच ज्या ठिकाणी नुकतेच कोरोनाचे रुग्ण आढळून आले होते. त्या हॉटस्पॉटवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना राज्यांना करण्यात आल्या आहेत.

>> रिस्की देशातून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट बंधनकारक करण्यात आली आहे. तसेच रिस्की देशातून आलेल्या प्रवाशांसह इतर देशांतून आलेल्या प्रवाशांना विमानतळाबाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल. मात्र, त्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन ठेवण्यात येईल. त्यातील पाच टक्के लोकांची विमानतळावर रँडम तपासनी केली जाईल.

>> हरियणाताही नव्या व्हायरंटचा फैलाव होऊ नये म्हणून आतापासूनच कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी याबाबतच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत. तामिळनाडूतही जिल्हाधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे. तसेच लसीकरणाचा वेग वाढवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

>> दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रं लिहून प्रभावित देशातून येणारी उड्डाणे थांबवण्याची विनंती केली आहे.

>> देशात ओमिक्रॉनचा फैलाव होऊ नये म्हणून कोणत्याही परिस्थितीत उपाययोजना करण्याची गरज आहे. त्याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय विमानसेवा तात्काळ बंद करण्यात यावी, असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या:

संजय राऊतांना फार गांभीर्याने घेऊ नका, ते एकदा तरी शेतकऱ्यांवर बोलले का?, फडणवीसांचा खोचक सवाल

Photo : शार्दुल ठाकुरचा गर्लफ्रेन्ड मितालीसोबत साखरपुडा, लवकरच लग्नच्या बेडीतही अडकणार

VIDEO: एसटी कामगारांच्या संपात का गेले नाही?; वाचा, देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

Follow Us
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या...
आता काय ट्र्म्प येऊन मनमाड रस्त्यांचं काम करणार का? भाजपच्या मिश्किल वक्तव्यावर बड्या नेत्याचा बोचरा सवाल!
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते...
भाजपचा शिवसेनेला मोठा धक्का; युतीमध्येच विश्वासू नेते... शिवसेना शिंदे गटात खळबळ, काय घडलं?
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; चक्क...
नाशिक कुंभमेळ्याच्या आयोजना दरम्यान मोठा ट्विस्ट; पंतप्रधान, मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोसह चक्क...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच नगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा...
डॉनाल्ड ट्रम्पमुळेच अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम रखडलं; त्याच्या सारखा वेडा... भाजप नेत्याचं विधान तुफान चर्चेत
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश राज ठाकरेंच्या भेटीला
घराच्या जाहिरातीवरून टीकेचा धनी ठरलेला भावेश कावरे तातडीने राज ठाकरेंच्या भेटीला, या बैठकीत...
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही बंड करणार?
आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीच आमदाराने.... ठाकरेंचे आमदारही पक्षाला पाठ फिरवणार? व्हिडीओ समोर येताच मोठी खळबळ
प्रणिती शिंदेंच्या कार्यक्रमात वंदे मातरम् प्रकरणी नव्या वादाची शक्यता
प्रणिती शिंदे यांच्या सोलापूरमधील कार्यक्रमात वंदे मातरम् अपूर्ण गायल्याने नवा वाद
राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट...
Sanjay Raut | राहुल गांधींना लोकसभा सचिवालयाची नोटीस, संजय राऊत संतापलेच; थेट म्हणाले...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातू...
प्रकृती अस्वस्थ असानाही मनोज जरांगेचा मोठा निर्णय! रुग्णालयातून तात्पुरता डिस्चार्ज घेऊन थेट...
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याने
एकच खळबळ! TMC कार्यालयातच... ममता बॅनर्जी विश्वासू नेत्याचा संशयास्पद मृत्यु, नेमकं काय घडलं?