Sputnik V लसीची कमतरता संपणार, ‘ही’ कंपनी भारतातच करणार उत्पादन

| Updated on: May 24, 2021 | 7:00 PM

स्पुतनिक वी लसीची निर्मिती पॅनेशिया बायोटक ही कंपनी करणार आहे. (Panacea Biotech Sputnik V)

Sputnik V लसीची कमतरता संपणार, ही कंपनी भारतातच करणार उत्पादन
स्पुतिक वी लस
Follow us on

नवी दिल्ली: केंद्र सरकारनं भारतातील लसीकरणाचा वेग वाढावा म्हणून रशियाच्या स्पुतनिक वी या लसीला परवानगी दिली आहे. स्पुतनिक लसीच्या लसीकरणाला भारतात सुरुवात देखील झाली आहे. भारतातील डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज स्पुतनिक वी लसीचं वितरण करत आहे. भारतात स्पुतनिक वी लसीचं उत्पादन सुरु करण्यात येणार असल्याचं रशिया डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंड आणि भारतातील औषध निर्माता कंपनी पॅनेशिया बायोटेकनं संयुक्तरित्या जाहीर केलं आहे. (Panacea Biotech launch production of Sputnik V vaccine in India jointly with RDIF )

भारतात बनलेली स्पुतनिक वी चाचणीसाठी रशियाला

भारतीय औषध निर्माती कंपनी पॅनेशिया बायोटेकनं बनवलेली स्पुतनिक वी लसीची पहिली खेप चाचणीसाठी रशियाला रवाना करण्यात आली आहे. रशियात त्या लसीच्या गुणवत्तेची चाचणी करण्यात येणार आहे. स्पुतनिक वी लसीची निर्मिती हिमाचल प्रदेशातील एका कंपनीमध्ये करण्यात आळी आहे. गुणवत्ता चाचणी यशस्वी ठरल्यास उत्पादन सुरु करण्यात येणार आहे.

भारतात 10 कोटी डोस तयार होणार

रशियाची आरडीआयएफ आणि पॅनेशिया बायोटेक यांच्यासोबत एप्रिलमध्येच स्पुतनिक वी लसीचं उत्पादन करण्याबाबत चर्चा झाली होती. पॅनेशिया बायोटेक यावर्षाच्या अखेरपर्यंत 10 कोटी लसीचे डोस उपलब्ध होणार आहेत. आरआयडीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिमित्रीव यांनी पॅनेशिया बायोटेकच्या साथीनं कोरोना प्रतिबंधक लसींचं उत्पादन या महामारीशी लढण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावेल, असं म्हटलं. भारत सरकारच्या कोरोना महामारी रोखण्याबाबतच्या प्रयत्नांना यामुळे बळ मिळेल, असही त्यांनी सांगितले. पुढील काळात स्पुतनिक वी इतर देशांना निर्यात देखील केली जाईल, असंही त्यांनी म्हटलं

पॅनेशिया बायोटेकेचे राजेश जैन यांनी स्पुतनिक वी लसीचं उत्पादन सुरु होणं ही महत्वाची गोष्ट आहे. आरडीआयएफसोबत देशातील परिस्थिती सामान्य होण्यासाठी आम्ही कार्यरत राहणार आहोत. स्पुतनिक वी लसीच्या उत्पादनामुळे पुढील काळात जगातील परिस्थिती सामान्य होण्यासही मदत होईल, असंही ते म्हणाले.

शिल्पा मेडिकेअर Sputnik V बनवणार

औषध निर्माता कंपनी शिल्पा मेडिकेअरनं Sputnik V लस बनवण्यासाठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज सोबत करार केला आहे. शिल्पा बायोलॉजिकल प्राइवेट लिमिटेड (एसबीपीएल) ने डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज सोबत तीन वर्षांच्या कालावधीसाठी करार केला आहे. शिल्पा मेडिकअर क कर्नाटकातील धारवाडमध्ये स्पुतनिक वी लसीचे डोस बनवणार आहे. भारतात आतापर्यंत कोविशील्ड, कोवॅक्सिन आणि स्पुतनिक वी लसीला परवानगी देण्यात आली आहे.

संबंधित बातम्या:

Sputnik V लस मुंबई-पुण्यात कधी दिली जाणार? लस कुठे आणि किती रुपयांना मिळणार?

Sputnik V लसीकरणाचा ॲक्शन प्लॅन ठरला, डॉ. रेड्डीज आणि अपोलो हॉस्पिटलमध्ये सामंजस्य करार

(Panacea Biotech launch production of Sputnik V vaccine in India jointly with RDIF )