AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अ‍ॅडमिट होण्यासाठी कोरोना रिपोर्टची गरज नाही; वाचा रुग्णालयात भरती होण्याचे सर्व नवे नियम!

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. (Positive Covid test report not mandatory for hospitalisation: Govt revises policy)

अ‍ॅडमिट होण्यासाठी कोरोना रिपोर्टची गरज नाही; वाचा रुग्णालयात भरती होण्याचे सर्व नवे नियम!
कोरोना चाचणी प्रातिनिधीक फोटो
| Updated on: May 08, 2021 | 4:34 PM
Share

नवी दिल्ली: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोरोना रुग्णांना रुग्णालयात भरती करण्याच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. या नव्या नियमानुसार रुग्णालयात भरती होण्यासाठी आता कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट दाखवण्याची गरज नाही. संशयित व्यक्तिलाही रुग्णालयात भरती करता येणार आहे. तसेच कोरोनाच्या प्रत्येक व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्याची गरज नाही. रुग्णांच्या लक्षणांनुसार त्याला वॉर्ड सीसीसी, डीसीएससी आणि डीएससीमध्ये भरती करण्यात येणार आहे. (Positive Covid test report not mandatory for hospitalisation: Govt revises policy)

नव्या नियमांनुसार रुग्ण कोणत्याही शहरात राहणारा असला तरी कोणत्याही रुग्णाला कोणत्याही कारणाने सेवा देण्यास नकार देता येणार नाही. यात ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचाही समावेश आहे. कोणत्याही रुग्णाला कोणत्याही रुग्णालयात केवळ वैध ओळखपत्रं नाही म्हणून प्रवेश नाकारता येणार नाही. आवश्यकतेनुसार त्याला रुग्णालयात प्रवेश दिला जाईल, असं नव्या नियमावलीत स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे.

4 हजार रुग्णांचा मृत्यू

देशात एका दिवसात कोरोनाच्या 4,187 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील मृतांची संख्या 2,38,270 वर गेली आहे. तर देशात एका दिवसात 4,01,078 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णांची संख्या 2,18,92,676 झाली आहे.

काय आहेत नियम

>> रुग्णालयात दाखल होण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह असल्याच्या रिपोर्टची गरज नाही >> संशयित व्यक्तीही रुग्णालयात अ‍ॅडमिट होऊ शकतो >> कोणत्याही शहरातील कोणत्याही रुग्णाला ओळखपत्रं नाही म्हणून रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यापासून रोखता येणार नाही >> कोणत्याही रुग्णाला ऑक्सिजन आणि औषधे देण्यापासून वंचित ठेवता येणार नाही, मग तो कुठल्याही शहरात राहणारा असो >> रुग्णाची लक्षणे आणि गरज पाहूनच रुग्णालयात दाखल केलं जाईल >> रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्याची गरज नसतानाही रुग्णांनी बेड अडवून ठेवले तर नाही ना, हे पाहणं बंधनकारक आहे >> येत्या तीन दिवसात सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य विभागाने याची अंमलबजावणी करण्याचे निर्देशही आरोग्य विभागाने दिले आहेत (Positive Covid test report not mandatory for hospitalisation: Govt revises policy)

संबंधित बातम्या:

कोरोनावरील आणखी एका औषधाला मंजुरी, DRDO नं बनवलेलं औषध ऑक्सिजनची आवश्यकता कमी करणार

Maharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामूळे अनाथ झालेल्या मुलांचा कनेरी मठ व्यवस्थापन सांभाळ करणार

LIVE | लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करणाऱ्या शहापूरमधील दुकानदारांवर धडक कारवाई

(Positive Covid test report not mandatory for hospitalisation: Govt revises policy)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...