कोरोनावरील आणखी एका औषधाला मंजुरी, DRDO नं बनवलेलं औषध ऑक्सिजनची आवश्यकता कमी करणार

डीआरडीओ  (DRDO)बनवलेल्या 2 डेक्सोय डी ग्लुकोज 2-deoxy-D-glucose (2-DG) च्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळाली आहे.

कोरोनावरील आणखी एका औषधाला मंजुरी, DRDO नं बनवलेलं औषध ऑक्सिजनची आवश्यकता कमी करणार
DRDO 2 D 2 DG
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 3:46 PM

नवी दिल्ली: भारत सरकारच्या औषध नियामक संस्थेने डीआरडीओ  (DRDO)बनवलेल्या 2 डेक्सोय डी ग्लुकोज 2-deoxy-D-glucose (2-DG) च्या आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. भारतातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. डीआरडीओने 2 डेक्सोय डी ग्लुकोजचं उत्पादन मोठ्या प्रमाणात करता येईल, असंही म्हटलं आहे. डीआरडीओनं याविषयी प्रसिद्धीपत्रक जारी केलं आहे. (The Drugs Controller General of India has given permission for the emergency use of drug 2-deoxy-D-glucose (2-DG) developed by DRDO)

2 डेक्सोय डी ग्लुकोज ही पर्यायी उपचारपद्धती

कोरोनाबाधित रुग्णांवर केल्या जाणाऱ्या उपचारपद्धती ऐवजी 2 डेक्सोय डी ग्लुकोजचा वापर पर्यायी उपचार पद्धती म्हणून केला जाईल. या औषधाची निर्मिती डीआरडीओच्या आयएमएस आणि डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज यांनी एकत्रितपणे केली आहे. या औषधाच्या चाचण्या केल्या गेल्या तेव्हा याचा डोस घेतलेल्या रुग्णांमध्ये याची सकारात्मक लक्षण दिसून आली आहेत. रुग्णांचा बरा होण्याचा वेग चांगला असून ऑक्सिजनवरील अवलंबित्व कमी होतं, असंही डीआरडीओकडून सांगण्यात आलं आहे.

रुग्ण बरे होण्यासाठी लागणार वेळ कमी

डीआरडीओनं जारी केलेल्या माहितीनुसार 2 डेक्सोय डी ग्लुकोजच्या रुग्णांना दिलं गेलं ते रुग्ण वेगानं रिकव्हर होतात. त्याचा बरा होण्याचा वेग नियमितपणे केल्या जाणाऱ्या उपचार पद्धतीपेक्षा चांगला असल्याचा दावा कऱण्यात आला आहे. नियमित उपचार पद्धतीनं रुग्ण बरा होण्यासाठी लागणारा वेळ आणि 2 डेक्सोय डी ग्लुकोज दिलेले रुग्ण बरे होण्याचा वेळ यांच्यामध्ये जवळपास 2.5 दिवसांचा फरक आढळून आल्याचं डीआरडीओकडून सांगण्यात आलेय.

2 डेक्सोय डी ग्लुकोज कसं घ्यायचं?

डीआडीओनं विकसित केलेलं हे औषध पावडर स्वरुपात मिळतं. हे पाण्यामध्ये टाकून घ्यावं लागते. हे औषध संसर्ग झालेल्या पेशींमधील विषाणूंचा संसर्ग कमी करण्यासोबत संसर्ग रोखण्याचं काम करत. त्यासोबतचं रुग्णाच्या शरीरातील उर्जा वाढवण्याचंही काम करते.

2 डेक्सोय डी ग्लुकोजच्या संशोधनाची सुरुवात कधी?

भारतात कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यानंतरच्या पहिल्या लाटेमध्ये INMAS-DRDO च्या शास्त्रज्ञांनी याविषयी संशोधन करण्यास सुरुवात केली. कामामध्ये त्यांना हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्यलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजीचं सहकार्य लाभलं. संशोधनात त्यांना 2 डेक्सोय डी ग्लुकोज कोरोना विषाणू विरोधात प्रभावी असल्याचं आढळून आलं आहे. त्याशिवाय हे औषध विषाणूंची वाढ रोखण्याच कामही करतं. प्रयोगशाळेतील परिणामांच्या आधारवर मे 2020 मध्ये कोरोना रुग्णांवर क्लिनिकल ट्रायल घेण्यासाठी डीसीजीआयनं परवानगी दिली होती. क्लिनिकल ट्रायलच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेत मे ते ऑक्टोबर 2020 या काळात हे औषध सुरक्षित असल्याचं स्पष्ट झालं. त्यासोबतचं रुग्ण बरे होण्यामध्ये या औषधाची सकारात्मक परिणामकारकता दिसून आली होती. दुसऱ्या टप्प्यातील काही चाचण्या 6 रुग्णालयांमध्ये घेण्यात आल्या. त्याशिवाय यानंतर रुग्णालयांची सख्या वाढवण्यात आली. देशातील 11 हॉस्पिटलमध्ये 110 रुग्णांवर चाचणी करण्यात आल्याचं, डीआरडीओनं सांगितलं.

संबंधित बातम्या:

Drugs Case : सुशांत सिंग प्रकरणी एनसीबीला आणखी एक यश, महत्त्वाचा आरोपी अटकेत

कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी अपयशी आणि हतबल; राष्ट्रवादीचा हल्ला बोल

(The Drugs Controller General of India has given permission for the emergency use of drug 2-deoxy-D-glucose (2-DG) developed by DRDO)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.