कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी अपयशी आणि हतबल; राष्ट्रवादीचा हल्ला बोल

कोरोना परिस्थिती हाताळण्यात यंत्रणा नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरले आहेत. (Modi govt has failed, nawab malik slams bjp over corona crisis)

कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी अपयशी आणि हतबल; राष्ट्रवादीचा हल्ला बोल
नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेस

मुंबई: कोरोना परिस्थिती हाताळण्यात यंत्रणा नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी अपयशी ठरले आहेत. अशी टीका काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली होती. त्यानंतर आज राष्ट्रवादीने मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी अपयशी ठरले असून हतबलही झाले आहेत, अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे. (Modi govt has failed, nawab malik slams bjp over corona crisis)

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही टीका केली आहे. आजच्या घडीला देशामध्ये दरदिवशी 4 लाख कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत आहेत. ही कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहेच शिवाय हतबलही झाल्याचे चित्र पाहायला मिळत असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं. सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाने कोरोना परिस्थितीसंदर्भात आदेश देऊन केंद्रसरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. मात्र केंद्रसरकार यामध्ये हतबल झाल्याचे दिसून येत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

साडेचार लाख लोक लसीकरणाविना

राज्यांना ऑक्सिजन साठा निश्चित केल्यानंतरही दिला जात नसल्याची सत्य परिस्थिती आहे. दोन दिवसापासून कर्नाटकच्या प्लांटमधून येणारा 50 टँकचा कोटा राज्याला मिळेनासा झाला आहे. रेमडेसिवीरचा साठा देऊनही वेळेत वितरीत करता येत नाहीय, असे ते म्हणाले. लसीकरणाचा कार्यक्रम ठप्प झाला आहे. पहिला डोस घेतलेले साडेचार लाख लोक आहेत. ते दुसरा डोस घेण्यास पात्र असताना डोस देता येत नाही. शिवाय राज्यसरकारने ठरवलेल्या कार्यक्रमासाठी कंपन्यांकडून लस नाही, असंही त्यांनी सांगितलं.

केंद्र सरकारला काम करता येत नाही

मोदी सरकार फक्त भाषणे आणि घोषणा करणे व वेळकाढूपणा करणे ही भूमिका घेत आहे. आम्हाला ऑक्सिजन मिळत नाही, रेमडीसीवीर वेळेत पुरवठा होत नाही, आता साडेचार लाख लोकांना दुसरा डोस देता येत नाही. जाणूनबुजून केंद्रसरकार अन्याय करतेय की, केंद्रसरकारला काम करता येत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान लवकरात लवकर लस द्या, 50 टन ऑक्सिजन कोटा पडून आहे. शिवाय रेमडेसिवीरचा साठा तात्काळ द्या, अशी मागणी त्यांनी केली आहे. (Modi govt has failed, nawab malik slams bjp over corona crisis)

 

संबंधित बातम्या:

कोविड सेंटरवर शिवसेना-भाजपच्या महिला नेत्यांची धक्काबुक्की; आमदार लव्हेकर, पटेल यांच्यात बाचाबाची

Maharashtra Coronavirus LIVE Update : वांगणीतील कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉ. उमाशंकर गुप्ता यांच्याविरोधात गुन्हा दाखल

आधी Cowin अ‍ॅपबाबत मुख्यमंत्र्यांचं पत्र, मग पंतप्रधान मोदींचा थेट उद्धव ठाकरेंना फोन

(Modi govt has failed, nawab malik slams bjp over corona crisis)