AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सांभाळा; संसर्ग रोखण्यासाठी घ्या मुलांची काळजी

आपला मुलगा वा मुलगी सार्वजनिक ठिकाणी विनामास्क जाणार नाही, याची खबरदारी प्रत्येक पालकाने घेतली पाहिजे, असे आवाहन सरकारी यंत्रणा आणि आरोग्य क्षेत्रातील जाणकारांकडून केले जात आहे. (Take care of the little ones in the third wave of the corona; Take care of children to prevent infection)

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सांभाळा; संसर्ग रोखण्यासाठी घ्या मुलांची काळजी
घरगुती उपाय करून कोरोनाची लक्षणे दूर करा
| Edited By: | Updated on: May 08, 2021 | 7:34 AM
Share

नवी दिल्ली : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भयंकर कहर सुरू आहे. दैनंदिन रुग्ण संख्या तीन लाखांहून चार लाखांवर पोहोचली आहे. कोरोनाबळींचा आकडाही धडकी भरवू लागला आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही लाट थांबताच तिसऱ्या लाटेच्या संकटाला देशाला सामोरे जावे लागणार आहे. पहिल्या लाटेत वृद्धांना अधिक लक्ष्य करणारा कोरोना विषाणू सध्या तरुणांनाही टार्गेट करू लागला आहे. वयाची चाळीशी न गाठलेले तरुण-तरुणी कोरोना संसर्गामुळे प्राण गमवावू लागले आहेत. त्यात आता तिसऱ्या लाटेत लहान मुलांमध्ये कोरोना संसर्ग अधिक फैलावणार असल्याची भिती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. त्या अनुषंगाने सरकारला योग्य ती तयारी करण्याचे आदेश एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्याचवेळी पालकांना स्वत:लाही आपल्या मुलांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. आपला मुलगा वा मुलगी सार्वजनिक ठिकाणी विनामास्क जाणार नाही, याची खबरदारी प्रत्येक पालकाने घेतली पाहिजे, असे आवाहन सरकारी यंत्रणा आणि आरोग्य क्षेत्रातील जाणकारांकडून केले जात आहे. (Take care of the little ones in the third wave of the corona; Take care of children to prevent infection)

वैद्यकीय तज्ज्ञांचे म्हणणे काय?

सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार के. विजय राघवन यांच्यासह आणखी काही तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसर्या लाटेबाबत सावधानतेचा इशारा दिला आहे. तिसरी लाट कधी येणार, याबाबत लोकांमध्ये अजूनही बरेच प्रश्न आहे. त्याला अनुसरून तज्ज्ञांनी स्पष्टीकरण दिले आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, या महिन्यात दुसऱ्या लाटेचा प्रचंड कहर दिसेल. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होत जाईल. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये ज्याप्रकारे काही महिन्यांचे अंतर होते, तशाच प्रकारे दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेमध्येही तीन ते चार महिन्यांचे अंतर असेल.

तिसऱ्या लाटेत मुलांमध्ये संसर्गाचा अधिक धोका?

पहिल्या लाटेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे 60 वर्षे वयापुढील तसेच विविध व्याधींनी त्रस्त असणारे लोक होते. दुसऱ्या लाटेत सर्वात जास्त धोका तरुण मंडळींना आहे. तशाच पद्धतीने तिसऱ्या लाटेत लहान मुले कोरोना विषाणूच्या निशाण्यावर येण्याची भिती आहे. लहान मुलांचे लसीकरण हादेखील एक चिंतेचा विषय आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

मुलांची अशाप्रकारे घ्या काळजी

जर तुमच्या घरात लहान मुले असतील, तर तुम्ही आतापासूनच तयारी सुरू करायला पाहिजे. मुलांना मास्क लावण्याची सवय लावा. याशिवाय मुलांना घराबाहेर खेळायला पाठवू नका तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून रोखा. बाहेरचे खाद्यपदार्थही देऊ नका. त्याचबरोबर पौष्टिक आहार खायला द्या. कोरोनाच्या दोन लाटांदरम्यानही मुलांमध्ये संसर्गाचा तितकासा परिणाम झाला नाही. यावरून मुलांमध्ये मजबूत इम्युनिटी सिस्टम असल्याचे सिद्ध झाले आहे. मात्र ही इम्युनिटी सिस्टम सांभाळणे आवश्यक आहे. मुलांची तब्येत बिघडली वा त्यांच्यामध्ये कोरोनाची संशयित लक्षणे दिसली तर तत्काळ कोरोनाची चाचणी करून घ्या. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवा, ताप आल्यास विशेष सावधानगिरी बाळगण्याची गरज आहे. (Take care of the little ones in the third wave of the corona; Take care of children to prevent infection)

इतर बातम्या

धक्कादायक! कोरोनानं वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची सामूहिक आत्महत्या

‘कोविशिल्ड’च्या 50 लाख डोसची ब्रिटनवारी रद्द; लसीचा भारतातच वापर करणार

त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
त्याला मुंबई कधी उपाशी ठेवत नाही; शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक
कल्याण-डोंबिवलीत जागावाटपावरून महायुतीत तणाव; तातडीची बैठक.
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला
बारामतीकरांनी बरेच चिमटे काढले; अजितदादांचा मंचावरून उपरोधिक टोला.
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
गौतम अदानी माझे मोठे भाऊ! सुप्रिया सुळेंचं वक्तव्य.
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक
शरद पवार माझे मार्गदर्शक; गौतम अदानींकडून पवारांचं कौतुक.
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे
युत्या होतात तुटतात; मुंबई कुणी हिसकावू शकले नाही - उद्धव ठाकरे.
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास
आमचं स्वप्न पूर्ण होणार! शिरसाटांनी व्यक्त केला विश्वास.
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!
वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसमध्ये 62 जागांवर शिक्कामोर्तब!.
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा
काका पुतण्या एकाच मंचावर! शरद पवार-अजित पवारांमध्ये चर्चा.
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!
अदानींच्या हस्ते शरद पवार AI सेंटरचे उद्घाटन!.