Pregnancy mistakes : गरोदरपणात सर्वच महिलांकडून होतात ‘या’ चुका, तुम्ही अजिबात करू नका!

| Updated on: Jul 09, 2022 | 3:43 PM

गर्भधारणा ही अशी वेळ असते जेव्हा महिलांनी स्वतःची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. या दरम्यान महिलांच्या शरीरात अनेक बदल घडतात. यासोबतच महिला गरोदरपणात अशा अनेक चुका करतात. ज्या त्यांच्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

Pregnancy mistakes : गरोदरपणात सर्वच महिलांकडून होतात ‘या’ चुका, तुम्ही अजिबात करू नका!
pregnancy
Follow us on

गरोदरपणात स्त्रीच्या शरीरात अनेक बदल घडतात. हार्मोन्समधील बदलांसोबतच (changes in hormones) वजन आणि स्तनाचा आकार वाढतो. या काळात महिलांच्या शरीरात अनेक गोष्टी एकाच वेळी घडत असतात. म्हणून गरोदरपणात खूप काळजी घेणे आवश्यक असते. बाळाच्या सुदृढतेवर (On the health of the baby) कुठलाही परिणाम होवू नये याची विशेष काळजी घेतली पाहिजे. गरोदरपणात आपले शरीर आपल्याकडून अनेक गोष्टींची मागणी करते. पण, कधी-कधी त्या गोष्टी सोडून आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असते. बऱ्याच स्त्रियांसाठी हे करणे खूप कठीण आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही गर्भधारणेदरम्यान (During pregnancy) काय करावे आणि काय करू नये याबाबत तुम्हाला माहिती असणे गरजेचे असते. जर तुम्ही देखील लवकरच आई होणार असाल तर, जाणून घ्या, गर्भधारणेदरम्यान, महिलांनी कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत.

जेवणाच्या वेळा पाळा

गरोदरपणात भूक न लागणे सामान्य बाब आहे. तसेच गर्भावस्थेत जसजसा वेळ जातो तसतसे तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी खायला हव्यात. या काळात अनेक महिलांना भूक लागत नाही. त्यामुळे त्या काहीही खात नाहीत. आम्ही तुम्हाला सांगतो की, असे करणे तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक ठरू शकते. हीच वेळ आहे जेव्हा तुम्हाला चांगले आणि निरोगी अन्न खाणे आवश्यक आहे. जेणेकरून तुमच्या बाळाला आवश्यक पोषक तत्त्वे मिळू शकतील.

वजन वाढणे सामान्य

वाढत्या वजनामुळे चिंता वाटू लागते. मात्र, गरोदरपणात वजन वाढणे हे सामान्य आहे, याचे कारण म्हणजे गरोदरपणात जास्त भूक लागते. या दरम्यान, हार्मोन्सची पातळी देखील सतत बदलते. अशा परिस्थितीत, आपण यासाठी जास्त काळजी करू नये कारण याचा आपल्या आणि मुलाच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या काळात तुम्ही तुमचे मन शांत ठेऊन सकस आहारावर लक्ष केंद्रीत करा.

हे सुद्धा वाचा

स्वत:च्या इच्छेने औषधे घेऊ नका

गरोदरपणात महिलांना स्नायू दुखणे, सूज येणे, जठर वेदना (गॅस्ट्रोइंटेस्टाइनल) यांसारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. पण याचा अर्थ असा नाही की त्यासाठी तुम्ही स्वतः च्या मनाने कोणतेही औषध घेऊ शकता. जर, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत असेल. तर, यासाठी तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

शारीरिक हालचाली करण्यास घाबरू नका

गरोदरपणात महिलांना शारीरिक हालचाली करणे खूप कठीण जाते. त्याच वेळी, बऱ्याच लोकांचा असा समज आहे की, या काळात महिलांनी जास्त शारीरिक हालचाली करू नयेत. पण, काळात हलका व्यायाम अन् शारीरिक हालचाल तुमच्या आणि मुलाच्या आरोग्यासाठी चांगली असते. या दरम्यान तुम्ही स्वतःला सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

या गोष्टी लक्षात ठेवा

या सर्व चुकांव्यतिरिक्त, अशा काही चुका आहेत ज्या महिलांनी गर्भधारणेदरम्यान टाळल्या पाहिजेत. या काळात तुम्ही अल्कोहोल, सिगारेट किंवा कॅफिनचे सेवन अजिबात करू नये. तसेच या काळात प्रक्रिया केलेल्या आणि अति गोड पदार्थांचे सेवन मुळीच करू नका.