Healthy Breakfast: नाश्त्यात काय खाणार, ओट्स की फ्लेक्स; माहिती करून घ्या काय आहे हेल्दी?

 फिट राहण्यासाठी हेल्दी नाश्ता करणे आवश्यक आहे. आज तुम्हाला आम्ही नाश्त्यात ओट्स की कॉर्न फ्लेक्स खायचं हे सांगणार आहोत.

Healthy Breakfast: नाश्त्यात काय खाणार, ओट्स की फ्लेक्स; माहिती करून घ्या काय आहे हेल्दी?
ओट्स आणि कॉर्न फ्लेक्स
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 12:53 PM

असं म्हटलं जातं की, फिट राहण्यासाठी नाश्ता नेहमी हेवी आणि हेल्दी असला पाहिजे. येवढंच नाही, तर नाश्ता करणे कधी टाळू नये. नाश्ता टाळल्यास वजन वाढते. अशात आता हेल्दी नाश्त्यात काही आप्शन आहेत. यामुळंच भारतीय ब्रेकफास्‍टमध्ये ओट्स आणि कॉर्न फ्लेक्‍सने आपली जागा बनविली आहे. फिट राहू इच्छिणारा व्यक्ती नाश्त्यात ओट्स आणि कॉर्न फ्लेक्स पसंत करतात.

कुणात किती पोषक तत्त्व

कॉर्न फ्लेक्‍स : हे मक्यापासून तयार केले जाते. 100 g कॉर्न फ्लेक्समध्ये 0.4 g फॅट, 84 g कार्ब्स, 7.5 g प्रोटीन, 1.2 g फायबर, 2 % कॅल्शियम आणि 378 टोटल कॅलरीज राहतात.

ओट्स : 100 g ओट्समध्ये 10.8 g फॅट, 26.4 g प्रोटीन, 16.5 g फायबर, 103 g कार्ब्स, 8 % कॅल्शियम आणि 607 टोटल कॅलरीज राहतात.

कॉर्नफ्लेक्‍स खाण्याचे फायदे

कॉर्नफ्लेक्समध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी असते. त्यामुळं हार्टसाठी ते खूप हेल्‍दी असते. जर तुम्ही दुधात कॉर्न फ्लेक्स घेत असाल तर शरीराला भरपूर प्रोटीन मिळते. जे लोक वजन कमी करत आहेत त्यांना हा एक चांगला ऑप्शन आहे. कारण कमी कॅलरीज असल्यानं वजन कमी करण्यास फायदा होतो.

ओट्स खाण्याचे फायदे

नाश्त्यात ओट्स तुम्ही खात असाल, तर लवकर भूक लागत नाही. ओट्ससुद्धा वजन कमी करण्यासाठी मदत करतो. ओट्स फायबरयुक्‍त असतो. यामुळं चयापचय चांगले होते. हे कमी ग्लायसेमिक इंडेक्स फूडमध्ये सहभागी आहे ज्यात कमी कोलेस्‍ट्रॉलमुळं रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि ह्रदयालाही फायदा होतो.

ओट्स और कॉर्न फ्लेक्सपैकी काय चांगले

जर तुम्ही वजन कमी करत असाल तर कॉर्न फ्लेक्समध्ये कॅलरीजची मात्रा कमी असल्यानं फायदेशीर आहे. पण, जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल, तर ओट्सचा आहारात समावेश करावा. ओट्समध्ये थोड़ा गुळ मिक्स करून खाल्ल्यास टेस्टी असते. ओट्सला तुम्ही ओटमील, मसाला ओट्स, ओट्स चिल्‍ला आणि ओट्स स्‍मुदी स्टाइलसह खाऊ शकता.

Skin Care : हिवाळ्यात त्वचा निरोगी ठेवण्यासाठी ‘या’ घरगुती पेयांचा आहारात समावेश करा!

Cucumber For Skin : सुंदर आणि निरोगी त्वचेसाठी काकडीचे हे फायदे जाणून घ्या!