पैशाची हाव! जन्मदात्याकडून मुलीची फेसबुकवर बोली

नवी दिल्ली : मुलीच्या लग्नासाठी फेसबुकवरुनच बोली लावल्याची खळबळजनक घटना दक्षिण सुडानमध्य घडली आहे. ही बोली दुसऱ्या-तिसऱ्या कुणी नव्हे, तर चक्क मुलीच्या वडिलांनीच लावली. या बोलीमध्ये फेसबुकवरुन पाच जणांनी सहभाग घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. ही मुलगी 17 वर्षांची आहे. मानवाधिकार कार्यकर्त्यांनी मुलीची बोली लावणाऱ्या वडिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. ‘द इनक्युसिटर’ या संकेतस्थळाने यासंदर्भातील …

, पैशाची हाव! जन्मदात्याकडून मुलीची फेसबुकवर बोली

नवी दिल्ली : मुलीच्या लग्नासाठी फेसबुकवरुनच बोली लावल्याची खळबळजनक घटना दक्षिण सुडानमध्य घडली आहे. ही बोली दुसऱ्या-तिसऱ्या कुणी नव्हे, तर चक्क मुलीच्या वडिलांनीच लावली. या बोलीमध्ये फेसबुकवरुन पाच जणांनी सहभाग घेतल्याचीही माहिती समोर आली आहे. ही मुलगी 17 वर्षांची आहे.

मानवाधिकार कार्यकर्त्यांनी मुलीची बोली लावणाऱ्या वडिलांविरोधात तक्रार दाखल केली आहे. ‘द इनक्युसिटर’ या संकेतस्थळाने यासंदर्भातील वृत्त प्रकाशित केले आहे.

ज्या व्यक्तीने फेसबुकवरुन मुलीची बोली जिंकली, तो पेशाने वकील आहे. त्याचे याआधी आठ लग्न झाले होते. बोली जिंकणाऱ्याने आरोपी वडिलांना 500 गाई, दोन लक्झरी कार, दोन बाईक, एक बोट, मोबाईल आणि 10 हजार डॉलर इतकी रक्कम दिली व मुलीची खरेदी केली.

फिलिप्समधील अनयामंग एनगोंग नावाच्या मानवधिकार वकिलाने 17 वर्षीय मुलीची फेसबुकवरुन होणारी ही बोली रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र यात तो अयशस्वी झाला.

“एखाद्या मुलीची बोली लावणं, हे कायद्याचं उल्लंघन आहे. याबाबत अधिक तपास करत मुलीच्या वडिलावर कठोर कारवाई केली जाईल,” अशी माहिती दक्षिण सुडानच्या मानवधिकार संघटनेने दिली आहे.”

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *