भारतीय पर्यटकांची कोणत्या ठिकाणांना सर्वाधिक पसंती, जाणून घ्या ऑनलाईन ट्रेंड

भारतीय पर्यटक उन्हाळ्यात मुलांना सुट्टी लागली की फिरायला जाण्याचा प्लान करतात. या वर्षी भारतीय पर्यटकांनी कोणत्या ठिकाणांना सर्वाधिक पंसती दिली आहे. भारतीय पर्यटक कोणती तीर्थक्षेत्रे ऑनलाईन सर्च करत आहेत, अयोध्येला जाण्याचा प्लान किती लोकं करत आहेत जाणून घ्या.

भारतीय पर्यटकांची कोणत्या ठिकाणांना सर्वाधिक पसंती, जाणून घ्या ऑनलाईन ट्रेंड
Follow us
| Updated on: May 08, 2024 | 6:38 PM

Summer Vacation : उन्हाळ्यात शाळेंना सुट्ट्या लागल्या की, लोकं गावी किंवा मग इतर ठिकाणी आवर्जुन फिरायला जातात. भारतीय पर्यटक नेहमीच फिरण्यासाठी उत्सूक असतात. देशात असे काही खास ठिकाणे आहेत ज्याला भेट देण्याचा भारतीयांचा कल आहे. सध्या अयोध्या, लक्षद्वीप आणि नंदी हिल्स सारखी ठिकाणे ट्रेंडमध्ये आहेत. या उन्हाळ्यात भेट देण्यासाठी या ठिकाणी लोकं जात आहेत. गोव्याला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या देखील जास्त आहे. ऑनलाइन लोकं गोव्याबद्दल अधिक सर्च करत आहेत. सध्या ट्रेंड काय आहे याबाबत एका अहवालात प्रसिद्ध करण्यात आला आहे. मेकमायट्रिप या प्लॅटफॉर्मने बुधवारी उन्हाळी प्रवासाच्या ट्रेंडवर हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.

राजेश मागो, सह-संस्थापक आणि समूह मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO), MakeMyTrip चे सीईओ राजेश मागो यांनी सांगितले की, प्रवासाच्या हेतूने उन्हाळा हा वर्षातील सर्वात मोठा काळ असतो. या तीन महिन्यात लोकं फिरायला बाहेर पडतात. यावर्षी देखील या पर्यटन क्षेत्रात तेजी कायम आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत कोणत्या ठिकाणांना लोकांची पसंती आहे जाणून घेऊयात.

पुरी आणि वाराणसी तीर्थक्षेत्रे

MakeMyTrip ने म्हटले आहे की, मार्च-एप्रिल 2024 दरम्यान भारतीय पर्यटकांनी पुरी आणि वाराणसीला अधिक प्राध्यान्य दिले आहे. ट्रेंडनुसार उन्हाळ्यात लोकं ऑनलाइन या ठिकाणांबाबत माहिती घेताना दिसले. तर अयोध्येबद्दल ही लोकांनी माहिती गोळा केली.

आंतरराष्ट्रीय स्थळे कोणती

MakeMyTrip डेटानुसार, बाकू, अल्माटी आणि नागोया या ठिकाणांबाबत भारतीय पर्यटकांनी सर्च केले. लक्झेंबर्ग, लँगकावी आणि अंतल्या येथेही प्रवाशांची आवड वाढत आहे. 2023 च्या उन्हाळ्याच्या तुलनेत यावर्षी कौटुंबिक प्रवास विभागात 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर या काळात एकट्याने प्रवास करणाऱ्यांमध्ये 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

अयोध्येला राम मंदिराचे निर्माण झाल्यानंतर अयोध्येत जाणाऱ्यांची संख्या देखील वाढली आहे. याशिवाय लोकं लक्षद्वीपबाबत देखील सर्च करत आहेत. लक्षद्वीपला जाण्याचा प्लान देखील अनेक जण करत आहेत.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.