AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुमच्या हातात PF चे पैसे मिळणार, मार्च 2026 पासून ‘ही’ सेवा मिळणार

EPFO मार्च 2026 पर्यंत आपल्या लाखो सदस्यांसाठी PF खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ करणार आहे. आता ATM आणि UPI द्वारे त्वरित निधी काढणे शक्य होईल.

तुमच्या हातात PF चे पैसे मिळणार, मार्च 2026 पासून ‘ही’ सेवा मिळणार
PF MoneyImage Credit source: TV9 Bharatvarsh
| Edited By: Sanjay patil | Updated on: Dec 19, 2025 | 3:34 AM
Share

आता तुम्हाला तुमचे पैसे मिनिटात काढता येईल. या नव्या बदलानंतर तुम्हाला PF सदस्य आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पैसे काढू शकणार आहे. PF काढण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरणे, मालकाकडून अनेकदा मंजुरी घेणे आणि सरकारी PF कार्यालयात जावे लागते. या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी या नव्या सेवेचा फायदा होऊ शकतो.

EPFO मार्च 2026 पर्यंत आपल्या लाखो सदस्यांसाठी EP खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ करणार आहे. आता ATM आणि UPI यद्वारे त्वरित निधी काढणे शक्य होईल, ज्यामुळे लांबलचक कागदपत्रे आणि नियोक्त्याच्या मंजुरीची आवश्यकता दूर होईल.

EPFO लाखो सदस्यांना मोठा दिलासा देणार आहे. EP खात्यातून पैसे काढण्याची प्रक्रिया आता अधिक सोपी होणार आहे. मार्च 2026 पर्यंत सदस्य लांबलचक कागदपत्रे न भरता आणि ऑनलाइन फॉर्म भरण्याच्या त्रासाशिवाय थेट त्यांच्या पीएफ खात्यातून पैसे काढू शकतील, असा विश्वास आहे.

त्वरित निधीची सुविधा

या बदलानंतर, EPF सदस्य आपत्कालीन परिस्थितीत त्वरित पैसे काढू शकतील. सध्या PF काढण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरणे, मालकाकडून अनेकदा मंजुरी घेणे आणि EPFO कार्यालयात जावे लागते. मात्र आता ATM आणि UPI च्या माध्यमातून ही प्रक्रिया अधिक वेगवान आणि सुलभ होणार आहे. केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, सदस्यांना त्यांच्या PF खात्यातून पैसे काढणे सोयीस्कर वाटेल आणि लांबलचक प्रक्रिया टाळता येईल.

डिजिटल मार्गाने पैसे काढणे सोपे होणार

EPFO मधून पैसे काढणे ATM किंवा UPI द्वारे बँकेतून पैसे काढण्याइतकेच सोपे करणे हे सरकारचे उद्दीष्ट आहे. नवीन प्रणाली लागू झाल्यानंतर सदस्यांना EPFO कार्यालय किंवा नियोक्त्यावर अवलंबून राहावे लागणार नाही. यामुळे दाव्यांचा निपटारा जलद होईल आणि वेळेची बचत होईल.

याशिवाय, ऑक्टोबर 2025 मध्ये केलेल्या सुधारणांच्या अंतर्गत,PF काढण्याच्या पूर्वीच्या 13 विविध श्रेणी सोप्या चौकटीत विलीन करण्यात आल्या आहेत. यामुळे नियम समजणे सोपे होईल आणि वेळेवर पैसे मिळण्यास मदत होईल.

EPF चे दावे लवकर आणि सहजपणे निकाली काढण्यावर केंद्र सरकारचे लक्ष आहे. एटीएम आणि UPI सुविधेच्या आगमनामुळे अर्ज प्रक्रिया केवळ सोपी होणार नाही, तर PF काढण्याचा अतिरिक्त त्रासही दूर होईल. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना त्वरित निधी उपलब्ध होईल आणि EPFO प्रणाली अधिक डिजिटल आणि युजर्स अनुकूल होईल.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा