AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवारांनी ‘तो’ प्रश्न विचारताच कार्यकर्त्याची तारांबळ; मग दादा म्हणाले, घोषणा द्या पण…

Ajit Pawar on Shirur Loksabha Election 2024 and Shivajirao Adhalrao Patil : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या सभा पार पडत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवारांची सभा पार पडली. यावेळी अजित पवारांनी कार्यकर्त्याला एक प्रश्न विचारला. वाचा सविस्तर....

अजित पवारांनी 'तो' प्रश्न विचारताच कार्यकर्त्याची तारांबळ; मग दादा म्हणाले, घोषणा द्या पण...
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: May 08, 2024 | 6:54 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हेल रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जातात. बैठकांमध्ये, जाहीर सभांमध्ये, कार्यकर्त्यांशी बोलताना ते आपलं मत ठामपणे मांडत असतात. शिरूर लोकसभा मतदारसंघात त्यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत अजित पवारांनी स्थानिक कार्यकर्त्याला एक प्रश्न विचारला. तेव्हा त्या कार्यकर्त्याची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. काल माढा आणि विशेषत: बारामतीत कमी प्रमाणात मतदान झालं. यावरही अजित पवारांनी भाष्य केलं.

अजित पवारांनी कार्यकर्त्याला कोणता प्रश्न विचारला?

आंबेगाव आणि शिरूर विधानसभेवर मोठी जबाबदारी आहे. या दोन्ही विधानसभेतून शिवाजी आढळरावांना एक लाखांहून अधिकच लीड मिळायला हवं, असं आवाहन अजित पवारांनी केलं. त्याचवेळी खालून एका उत्साही कार्यकर्त्याने शिवाजी आढळराव पाटलांचा… विजय असो, अशी घोषणा दिली. त्यावेळी क्षणाचा ही विचार न करता, अजित पवारांनी तुझा बूथ कोणता आहे रे? असा प्रश्न घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला विचारला. तेव्हा उपस्थितांमध्ये हशा पिकला.

तुझ्या मतदारसंघात किती मतदार आहेत? उत्तर आलं, 2700 मतदार आहेत. यावेळी अजित पवारांनी डोक्यावर हात मारला. लेका 2700चा बुथच नसतो. खोटं बोलतोय, मी अचानक प्रश्न विचारल्यानं तो गडबडलेला आहे. माझी तुम्हाला विनंती आहे. तुम्ही उत्साहाने घोषणा देता. पण लक्षात ठेवा, कालच्या मतदानात मतदानाचा टक्का खालावला आहे. हे भूषणावह नाही, असं म्हणत मतदानाच्या टक्केवारीकडे अजित पवारांनी लक्ष वेधलं.

अजित पवारांचं ते विधान चर्चेत

आचारसंहिता असली तरी पिण्याच्या पाण्याबाबत सर्वांनी सहकार्य ठेवायला हवं. मात्र आचारसंहिता भंग होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. अनेकजण माझ्याकडे येतात अन म्हणतात जिल्हा परिषद सदस्य आहे. आता प्रशासक आहे. तुम्ही कुठले सदस्य, तुम्ही तर सर्व सामान्य नागरिक आहात. पण ते म्हणतात, आता त्यांना वाईट वाटायला नको म्हणून मी म्हणतो म्हणतायेत तर म्हणू द्या. कुठं आपल्या बापाचं काय जायचं आहे, मी म्हणतो तुम्हाला शुभेच्छा आहेत, असं अजित पवार म्हणाले.

Follow Us
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या
अखेरचा पत्ता उघडणार! गोकुळ गितेसोबत उदय सामंत अन् गिरिश महाजनांच्या अंतिम चर्चेत नेमकं काय घडलं?
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं
एकच खळबळ! मशिदीच्या भिंतीआड भयंकर कांड; 7 वर्षाच्या.... नेमकं काय घडलं?
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा
तृणमूल काँग्रेसला धक्क्यावर धक्का; CIDची धाड, TMC खासदाराचा राजीनामा तर, आणखी नेते सोडणार पक्ष?
जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
Jalgaon | जळगावात महायुती विरुद्ध महायुती? रेश्मा काळेंचा बंडखोर पवित्रा कायम
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्र
मुंबई ते दिल्ली प्रवासाआधीच विमानात बिघाड होताच... प्रवासाबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं...भाजप
राज्य थरथरलं! अनेक वर्ष चालला काळा कारभार, अल्पवयीन मुलीवर दोघं... भाजप नगरसेविकेच्या भावाचं हादरवणारं कांड
गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता?
Gokul Gite Nashik | नाशिकच्या राजकारणात गेमचेंजर घडामोड; गोकुळ गीते यांचं बंड आता थंड होण्याची दाट शक्यता
पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा
Buldhana News | पाणी सोडलं नाही म्हणून थेट वस्तीवर हल्ला! बुलढाण्यात तुफान राडा, 15 जण जखमी
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई
मोठी बातमी! बड्या अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडलं; सापळा रचला अन् धडक कारवाई, चक्क 6 लाख...
पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत
Pandharpur | पंढरपुरात राजकीय भूकंप! तीर्थक्षेत्र आघाडीचे 9 नगरसेवक भाजपच्या तंबूत