VIDEO : प्राणी संग्रहालयाला भीषण आग, 30 हून अधिक प्राण्यांचा होरपळून मृत्यू

या घटनेमुळे जगभरातील प्राणी मित्रांनी आणि पर्यावरण प्रमींनी (Animal death in fire germany) दु:ख व्यक्त केलं आहे.

VIDEO : प्राणी संग्रहालयाला भीषण आग, 30 हून अधिक प्राण्यांचा होरपळून मृत्यू

बर्लीन (जर्मनी) : नवीन वर्षाच्या काही तासानंतर जर्मनीतील एका प्राणी संग्रहालयात भीषण आग लागल्यामुळे 30 पेक्षा अधिक प्राण्यांचा (Animal death in fire germany) मृत्यू झाला. अनेक दशकातील सर्वात धक्कादायक अशी ही घटना देशात घडली असल्याचे स्थानिक मीडियाने म्हटलं आहे. या घटनेमुळे जगभरातील प्राणी मित्रांनी आणि पर्यावरण प्रेमींनी (Animal death in fire germany) दु:ख व्यक्त केलं आहे.

जर्मनीच्या पश्चिम स्थित क्रेफेल्ड शहरात ही आग लागली. आकाश कंदीलमुळे ही आग लागल्याचे बोललं जात आहे. या आकाश कंदीलमुळे सर्वात पहिली आग ही माकडांच्या घरावलर लागली. त्यामुळे आग पसरत पसरत प्राणी संग्रहालयात पसरली. पोलीस या घटनेची अधिक चौकशी करत आहे, अशी माहिती स्थानिक मीडियाने दिली आहे.

मृत झालेल्या प्राण्यांमध्ये गोरिल्ला, गोल्डन लायन तमरिन यासह माकडांच्या इतर जाती, वटवाघूळ आणि इतर पक्षांचा समावेश आहे. दोन चिंपाजी आगीतून वाचले आहेत. त्यांना जवळच्या प्राणी संग्रहालयात सोडले आहे.

जर्मनीच्या प्राणी संग्रहालयात 200 जातींचे वेगवेळे प्राणी आहेत. यामध्ये एकूण 1 हजार प्राणी आणि पक्षी होते, असं बोललं जात आहे.

दरम्यान, नुकतेच काही महिन्यांपूर्वीच ब्राझीलमधील अमेझॉन जंगलात आग लागली होती. या आगीतही तब्बल 2.7 मिलिअन प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले होते. या घटनेमुळे संपूर्ण जग भरातून पर्यावरण प्रेमींनी खंत व्यक्त केली होती.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *