Dubai Attack : दुबईत अडकले पुण्याचे ८४ विद्यार्थी, इराणच्या हवाई हल्ल्याने वाढली चिंता

इराणवर अमेरिका आणि इस्राईलने संयुक्तरित्या हल्लाबोल केल्यानंतर आता इराणने देखील प्रत्युत्तर दिल्याने दुबईत अनेक भारतीय अडकल्याचे वृत्त आहे. पुणे येथील एका इन्स्टिट्युटचे ८४ विद्यार्थी दुबईत अडकले असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

Dubai Attack : दुबईत अडकले पुण्याचे ८४ विद्यार्थी, इराणच्या हवाई हल्ल्याने वाढली चिंता
Dubai Attack
| Updated on: Mar 01, 2026 | 4:38 PM

इस्राईल आणि इराण युद्धादरम्यान एक मोठी बातमी पुढे आली आहे. महाराष्ट्रातील पुणे येथील एका इन्स्टिट्यूटमधील एमबीएचे ८४ विद्यार्थी दुबईत अडकले आहे. असे म्हटले जात आहे की दुबईची एअरस्पेस बंद पडल्याने या विद्यार्थ्यांच्या सुटकेचा मार्ग बंद झाला आहे. सध्या विद्यार्थ्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाशी बोलणी चालू केली आहेत.

पुणे येथील इंदिरा स्कूल ऑफ बिझनस स्टडीज (ISBS) संस्थेचे विद्यार्थी पाच दिवसांच्या अभ्यास दौऱ्यासाठी दुबईत गेले होते. अधिकाऱ्यांनी या संदर्भात अधिक माहिती देताना सांगितले की ४० विद्यार्थी शनिवारी पुण्यात परतणार होते. तर उर्वरित ४४ विद्यार्थी रविवारी विमान पकडणार होते. मात्र, पश्चिम आशियातील संघर्षामुळे हवाई क्षेत्र बंद करण्यात आल्याने हे विद्यार्थी अडकून पडले आहेत. या शिक्षण संस्थेचे डीन जनार्दन पवार यांनी सांगितले की सर्व विद्यार्थी सुखरुप आहेत यात ४२ मुले आणि ४२ मुली आहेत. त्यांना एका हॉटेलात नेण्यात येत आहे. परराष्ट्र मंत्रालयाशी या विद्यार्थ्यांना मायदेशात परत आणण्याविषयी बोलणी सुरु आहे.

विद्यार्थी आणि स्टाफ सदस्य सुरक्षित

इंदिरा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटची अध्यक्ष तारिता शंकर यांनी सांगितले की एमबीएमचे विद्यार्थी आणि स्टाफ अभ्यास दौऱ्यासाठी दुबईत गेले होते. परंतू दुबई एअरस्पेस बंद झाल्याने ते तेथे अडकले जाते. त्यांनी सांगितले की विद्यार्थी आणि स्टाफ सदस्य सुरक्षित आहेत, आम्ही त्यांच्या संपर्कात आहेत. आम्ही परराष्ट्र मंत्रालय आणि नागर विमान मंत्रालय यांच्याशी संपर्क करत आहोत आणि त्यांना लवकरच मायदेशात परत आणले जाणार आहेत.

युद्धा दरम्यान प.आशियातील उड्डाणे बाधित

इराणचे सर्वोच्च नेते आयातुल्ला अली खामेनी यांचा इस्राईल आणि अमेरिकेच्या संयुक्त हल्ल्यात शनिवारी मृत्यू झाला आहे. इराणच्या सरकारी मीडियाशी रविवारी सकाळी यास दुजारो दिला आहे. या घटनाक्रमानंतर पश्चिम आशियातील उड्डाणे बाधित झाली आणि संयुक्त अरब अमिरातची वाणिज्यिक राजधानी दुबईवर हवाई हल्ले होत असल्याचे वृत्त आहे.

Follow Us