AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Middle East Crisis : इराणसाठी मुस्लीम देश पुढे का येत नाहीत? US – इस्राईलकडून का मार खातो इराण ? मध्य पूर्वेतील संघर्ष नेमका काय ?

इराण- अमेरिका आणि इस्राईल युद्धाला सुरुवात झाली आहे, मात्र इराणने मुस्लीम देशांवरच हल्ला केला आहे आणि तेथील अमेरिकेच्या तळांना टार्गेट केले आहे.

Middle East Crisis : इराणसाठी मुस्लीम देश पुढे का येत नाहीत? US - इस्राईलकडून का मार खातो इराण ? मध्य पूर्वेतील संघर्ष नेमका काय ?
Middle East Crisis
| Updated on: Mar 01, 2026 | 11:50 AM
Share

इराणवर इस्राईल आणि अमेरिकेने हल्ला केला आहे. मात्र, इराणने देखील त्याच्या शेजारील मुस्लीम देशातील अमेरिकेच्या तळांवर हल्ला करुन प्रत्युत्तर दिले आहे. यामुळे आता प्रश्न निर्माण होतो की इराण सारख्या मुस्लीम देशाला वाचवण्यासाठी मध्य पूर्वेतील १६ मुस्लीम देश पुढाकार का घेत नाहीत. मध्य पूर्वेत सौदी, तुर्की, जॉर्डन, बहारीन, लेबनॉन सह 16 मुस्लीम देश आहेत. मात्र इराणला वाचवण्यासाठी कोणताही देश पुढाकार घेत नसल्याचे चित्र का आहे. या मागे नेमके काय कारण आहे हे जाणून घेऊयात….

मध्य पूर्वेत अनेक बलवान मुस्लीम देश आहेत. सौदी अरब, तुर्की हे सुन्नी मुस्लीम देश आहेत तर इराण हा स्वत:ला शिया मुसलमानांचा खलिफा समजतो. याशिवाय इराक, सिरीया, लेबनॉन, जॉर्डन, पॅलेस्टाईन, कुवैत, कतार, अझरबैझान, बहारीन, संयुक्त अरब अमिरात, ओमान, येमन, इजिप्त आणि लिबीया आहेत. यातील बहुतांशी देश सुन्नी बहुल आहेत. इराक, बहारीन, येमन, लेबनॉन शिया आणि सुन्नी मिश्रित आहेत. एपीच्या रिपोर्टनुसार हे देश इस्राईल-इराण युद्धाचा विरोध तर करतात. मात्र, उघडपणे इराणचा सोबत उभे नाहीत. याला कारण म्हणजे यांच्यात परस्पंर प्रतिस्पर्धा देखील आहे. कारण मध्य पूर्वेत सर्व मुस्लीम देश हे परस्परात अडकलेले आहेत. यातील अनेक देश प्रॉक्सी वॉर झेलत आहे तर काही देशांतर्गत बंडखोरीने ( सिव्हील वॉर ) ग्रासलेले आहेत.

मध्य पूर्वेतील सर्वात मोठा शिया आणि सुन्नी पंथ वाद इराण आणि सौदी अरबमध्ये आहे. सुन्नींची संख्या जास्त असलेला सौदी हा इस्लामचे जन्म स्थळ आहे. हे इस्लामसाठीचे सर्वात पवित्र स्थळांपैकी एक आहे. सौदीत जगातील सर्वात मोठा तेल निर्यात करणारा आणि संपन्न देशापैकी एक आहे. सौदी अरबला भीती आहे की शियांची संख्या जास्त असलेला इराण मध्य पूर्वेचे नेतृत्व करेल याची भीती सौदीला आहे. त्यामुळे सौदीचा नेहमी इराणला विरोध असतो. मुसलमान यांच्या शिया आणि सुन्नी असे दोन प्रमुख पंथ आहेत. इतरही पंथ आहेत. परंतू या दोन पंथात मुस्लीम जगताची विभागणी झालेली आहे. पैगंबर मोहम्मद यांच्या मृत्यूनंतर मुसलमानांचे कोणी नेतृत्व करायचे यावरुन वाद झाला आहे. जगाच्या मुस्लीम लोकसंख्येत सुन्नी पंथीयांची संख्या सर्वाधिक असून ८५ ते ९० टक्के आहे.

शियांची संख्या मात्र केवळ १० टक्के

शियांचा दावा आहे की मुसलमानांचे नेतृत्व करण्याचा अधिकार पैगंबर मोहम्मद यांचा जावई अली यांना आहे. मुस्लीमांचा खलिफा कोण होणार यावरुन झालेल्या संघर्षात अली यांची हत्या झाली. त्यांची मुले हुसैन आणि हसन यांनी खलिफा होण्यासाठी संघर्ष केले. हुसैन यांचा मृत्यू युद्धात झाला तर हसन यांना विष देऊन मारल्याचे म्हटले जाते. शियांची संख्या मात्र मुसलमानांच्या एकूण संख्ये पैकी केवळ १० टक्के असून त्यांची संख्या १२ ते १७ कोटी आहे. इराण, इराक, बहारीन, अझरबैझान आणि येमनमध्ये शियांची बहुसंख्या आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, भारत, कुवैत, लेबनॉन, तुर्की, कतार, सिरीया, सौदी अरब आणि युनायडेट अरब ऑफ अमिरात यांची संख्या जास्त आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...