AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्याला पाकिस्तानमध्ये घुसून घातली गोळी

भारतासाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाच्या अतिशय महत्त्वाच्या व्यक्तीला पाकिस्तानमध्येच गोळी घालण्यात आली आहे. त्याला नेमकं कसं पकडलं जाणून घ्या...

मोठी बातमी! लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्याला पाकिस्तानमध्ये घुसून घातली गोळी
अमीर हमजाImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Apr 16, 2026 | 1:25 PM
Share

पाकिस्तानातील लाहोर येथून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. दहशतवादी संघटना लश्कर-ए-तैयबा (LeT)च्या संस्थापक सदस्यांपैकी एक असलेल्या अमीर हमजा याच्यावर हल्ला झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी एका न्यूज चॅनेलच्या कार्यालयाबाहेर त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात अमीर हमजा गंभीररित्या जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचे सांगण्यात येत आहे.

सूत्रांच्या मते, हल्लेखोरांनी अचानक गोळीबार सुरू केला, त्यामुळे परिसरात मोठी खळबळ माजली. हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणा या प्रकरणाची चौकशी करण्यात व्यस्त आहेत. पाकिस्तानमध्ये घुसून लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यावर गोळीबार झाल्यामुळे जगभरात चर्चा सुरु आहे.

अमीर हमजा कोण आहे?

अमीर हमजा हा लश्कर-ए-तैयबा संघटनेच्या सुरुवातीच्या आणि महत्त्वाच्या चेहऱ्यांपैकी एक होता. त्याने कुख्यात आतंकवादी हाफिज सईद याच्यासोबत मिळून या संघटनेची स्थापना केली होती. तो केवळ संघटनेचा वैचारिक प्रचार प्रमुख नव्हता, तर फंडिंग, नवीन सदस्यांची भरती आणि आतंकवादी नेटवर्क मजबूत करण्यातही त्याची महत्त्वाची भूमिका होती.

रिपोर्ट्सनुसार, तो अफगाण मुजाहिदीनचा देखील भाग राहिला आहे. भडकाऊ भाषण आणि कट्टरपंथी लेखन यासाठी तो प्रसिद्ध होता. तो लश्करची मासिक पत्रिका ‘मजल्लह अल-दावा’ चा संपादकही होता. वर्ष २००२ मध्ये त्याने ‘काफिला दावत और शहादत’ या नावाचे पुस्तक लिहिली होते, ज्यात दहशतवादी विचारसरणीला प्रोत्साहन दिले गेले होते.

अमेरिकेने घोषित केले होते दहशतवादी

अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने लश्कर-ए-तैयबा या संघटनेची दहशतवादी संघटना म्हणून घोषणा केली असून, अमीर हमजाला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिबंधित दहशतवाद्यांच्या यादीत समाविष्ट केले आहे. वर्ष 2018 मध्ये पाकिस्तानमध्ये लश्करशी संबंधित संघटनांवर कारवाई झाल्यानंतर त्याने स्वतःला वेगळे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र नंतर त्याने ‘जैश-ए-मनकाफा’ नावाने एक नवीन संघटना स्थापन केली, जी कथितरित्या जम्मू-काश्मीरसह अनेक भागांमध्ये सक्रिय होती. रिपोर्ट्सनुसार, अमीर हमजाचे नाव भारतातील अनेक दहशतवादी हल्ले आणि कट-कारस्थानांशी जोडले गेले आहे. तो दीर्घकाळ दहशतवादीच्या नेटवर्कचा महत्त्वाचा हिस्सा राहिला होता.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?