AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बदला 100 टक्के घेणार… पाकिस्तानची उडाली झोप, मोठी खळबळ, थेट…

पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर तणाव आहे. रात्रीच्या वेळी मोठा हल्ला पाकिस्तानकडून करण्यात आला. त्यामध्येच आता अफगाणिस्तानकडूनही अत्यंत मोठा इशारा देण्यात आलाय.

बदला 100 टक्के घेणार... पाकिस्तानची उडाली झोप, मोठी खळबळ, थेट...
Pakistan
| Updated on: Feb 22, 2026 | 12:49 PM
Share

मागील काही दिवसांपासून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढताना दिसत आहे. साैदी अरेबियाने मध्यस्थी करून युद्धाच्या स्थितीत शांतता घडवून आणली होती. मात्र, आता पुन्हा एकदा तणावाची स्थिती बघायला मिळत आहे. पाकिस्तानकडून मोठा हल्ला अफगाणिस्तानवर करण्यात आला. ज्यामध्ये 18 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाल्याचे कळत आहे. यामध्ये लहान मुलांसह महिलांचा समावेश आहे. पाकिस्तानने हा हल्ला नेमका का केला हे देखील सांगितले. मात्र, अफगाणिस्तानने स्पष्ट केले की, योग्य वेळी या हल्ल्याचा बदला आम्ही घेऊ. पुन्हा एकदा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव वाढला आहे. सीमेपलीकडे पाकिस्तानकडून सात ठिकाणी हल्ला करण्यात आला. या हल्ल्याची खळबळ उडवून देणारी व्हिडीओही व्हायरल होत आहेत. पाकिस्तान मागील काही दिवसांपासून अफगाणिस्तानबाबत आक्रमक भूमिका घेत आहे. या हल्ल्याला अफगाणिस्तान उत्तर देणार हे स्पष्ट आहे.

अफगाणिस्तानच्या तालिबान प्रशासनाने रविवारी सांगितले की, पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांचे मूल्यांकन सध्या त्यांच्याकडून केले जात आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही या हल्ल्याचा बदला घेणार आहोत.  अफगाणिस्तानातील तालिबान सरकारचे प्रवक्ते जबीउल्लाह मुजाहिद यांनी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यानंतर एक निवेदन प्रसिद्द केले. त्यांनी म्हटले की, पाकिस्तानी सैन्याने पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या हद्दीत मोठी घुसखोरी केली आहे.

काल रात्री नांगरहार आणि पक्तिका प्रांतांमध्ये पाकिस्तानने आमच्या नागरिकांवर बॉम्बहल्ले केली. महिला आणि मुलांसह अनेकजण मारली गेली आहेत. पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील 19 जण मारली गेल्याची माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबान अधिकारी सध्या नुकसान नेमके किती झाले, याचा तपास सध्या करत आहेत.

पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले आणि अफगाणिस्तानला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार आहे, असे तालिबान सरकारने म्हटले. यासोबतच आम्ही योग्यवेळी उत्तर देऊ असे तालिबानने म्हटल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. कुठेतरी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणाव कमी झाल्याचे बघायला मिळाले होते. मात्र, आता पुन्हा तणा वाढणार हे स्पष्ट आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा