AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मध्यरात्री पाकिस्तानच्या सीमेवर भयंकर हालचाली, थेट मोठा हल्ला, तब्बल 7 ठिकांना टार्गेट करत..

मागील काही वर्षांपासून पाकिस्तान सतत काढ्या करताना दिसत आहे. त्यामध्येच आता मध्यरात्री पाकिस्तानकडून अत्यंत मोठा हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. या हल्ल्याने खळबळ उडाली. यामुळे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवरील तणाव अधिक वाढला.

मोठी बातमी! मध्यरात्री पाकिस्तानच्या सीमेवर भयंकर हालचाली, थेट मोठा हल्ला, तब्बल 7 ठिकांना टार्गेट करत..
Attack
| Updated on: Feb 22, 2026 | 8:08 AM
Share

मागील काही दिवस पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील संबंध तणावात बघायला मिळाली. थेट हल्ले करण्यात आली. अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तान सैन्याला सको की पळो करून अफगाणिस्तानने सोडले. चक्क सैन्य चाैक्यांना टार्गेट करून अफगाणिस्तानने हल्ला केला. अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव बघून काही देश पुढे आले आणि दोन्ही देशांना शांततेचे आव्हान केले. मात्र, यादरम्यान पाकिस्तानने पुन्हा हल्ला केल्याने युद्ध पेटण्याचे संकेत होते. साैदी अरेबियाने दोन्ही देशात मध्यस्थी केली. आता पुन्हा एकदा पाकिस्तान आणि अफगाणिस्तान सीमेवर मोठा तणाव बघायला मिळत आहे. पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानवर थेट हल्ला केला. ऐन रमजानच्या महिन्यात पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. पाकिस्तानने पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये लष्करी हल्ला सुरू केल्याने खळबळ उडाली.

डॉन न्यूजच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या माहिती मंत्रालयाने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केले. सीमेपलीकडे असलेल्या सात दहशतवादी छावण्या आणि लपण्याच्या ठिकाणांना टार्गेट करून हल्ला केल्याचे त्यांनी यामध्ये म्हटले. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) आणि इस्लामिक स्टेट-खोरासान (आयएसकेपी) शी संबंधित दहशतवाद्यांना लपण्याची ठिकाणे होती.

पाकिस्तानने दावा केला की, त्यांच्यावर प्रबळ अशी काही पुरावे आहेत, त्याच्या माध्यमातून हे स्पष्ट होते की, हे अफगाणिस्तानमध्ये बसलेल्या लोकांकडून या दहशतवाद्यांना मदत केली जात होती. पाकिस्तानने म्हटले, गुप्तचर माहिती मिळाल्यानंतर आम्ही ठरावीक ठिकाणी हल्ला केला. यावर आता तालिबानने स्पष्ट शब्दात म्हटले की, योग्यवेळी आम्ही या हल्ल्याला उत्तर देऊ.

बलुच कार्यकर्ते मीर यार बलोच यांनी या हल्ल्यावर जोरदार टीका केली. त्यांनी पोस्ट शेअर करत म्हटले की, पाकिस्तानच्या भित्र्या सैन्याने पुन्हा एकदा अफगाणिस्तानच्या हवाई हद्दीचे उल्लंघन केले. पक्तिका प्रांतातील बारमल जिल्ह्यात ड्रोन आणि हवाई हल्ले केले आहेत. F-16  ने मदरशासह 7 ठिकाणी क्षेपणास्त्रे हल्ले करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार जागी लोक या हल्ल्यात गंभीर जखमी झाली तर एकाचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा