AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताला जे पाहिजे तेच झाले, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिले झुकते माप, थेट अतिरिक्त..

डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफने अनेक देशांचा जीव जेरीस आणला. मात्र, हे टॅरिफचे संकट काही कमी होण्याचे नाव घेत नाही. डोनाल्ड ट्रम्प यांना टॅरिफच्या मुद्द्यात अमेरिकेच्या कोर्टाने फटकारले. मात्र, त्यानंतरही डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्कादायक निर्णय घेतला.

भारताला जे पाहिजे तेच झाले, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला दिले झुकते माप, थेट अतिरिक्त..
Donald Trump Tariffs
| Updated on: Feb 21, 2026 | 11:52 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोर्टाने अत्यंत मोठा झटका दिला. कोर्टाच्या निर्णयावर डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून नाराजी जाहीर करण्यात आली. फक्त नाराजीच नाही तर डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट या निर्णयाला दाद न देता संतापून जगातील सर्वच देशांवर 10 टक्के टॅरिफ वाढवण्याचा निर्णय घेतला. कोर्टाच्या निर्णयानंतर डोनाल्ड ट्रम्प अशाप्रकारचा निर्णय घेतील असा विचारही साधा कोणी केला नव्हता. डोनाल्ड ट्रम्प यांनी कोर्टाच्या निकालादरम्यानच सांगितले होते की, माझ्याकडे प्लॅन बी देखील उपलब्ध आहे. कोर्टाने फटकारल्यानंतर अवघ्या काही वेळातच सर्वच देशांवर 10 टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याचा निर्णय डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला. 200 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून अनेक देशांना दिली जात होती. डोनाल्ड ट्रम्प यांची ही टॅरिफ निती योग्य नसल्याने कोर्टाने सांगितले. कोर्टाने कायद्यावर बोट ठेवले.

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्णय देताना आंतरराष्ट्रीय आपत्कालीन आर्थिक शक्ती कायदा (IEEPA) अंतर्गत त्यांनी लादलेला शुल्क रद्द करून डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का दिला. त्यानंतर अनेक देशांनी सुटकेचा निश्वास घेतला. पण त्यानंतर काही तासच डोनाल्ड ट्रम्प यांनी धक्कादायक निर्णय घेत संपूर्ण जगातील देशांवर टॅरिफ लावला. थोडक्यात काय तर आता अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर 10 टक्के टॅरिफ लावेल.

भारत आणि अमेरिकेत सध्याच्या घडीला व्यापार करार सुरू आहेत. व्यापार करार तसे पूर्ण झाली आहेत. फक्त तांत्रिक बाबींवर काम सुरू आहे. येणाऱ्या आठवड्यात करार देखील पूर्ण होतील. भारतावरील 50 टक्के टॅरिफ काढून अमेरिकेने भारतावर 18 टक्के टॅरिफ लावला. आता केलेल्या घोषणेनुसार, भारतावर अतिरिक्त 10 टक्के टॅरिफ लागणार का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतावर आता जारी केलेला अतिरिक्त 10 टक्के टॅरिफ लावणार नाही. मूळ जो टॅरिफ आहे 18 टक्के तोच कायम राहणार आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफच्या घोषणेनंतर अनेक देशांची झोप उडाल्याचे बघायला मिळत आहे. सर्वांवरच टांगती तलवार कायम आहे.

Follow Us
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद,
दिल्लीत मोठ्या घडामोडी! आज ‘लहरा दो तिरंगा’ रॅली; सेंट्रल पार्क बंद, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र.....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदे....
मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या व्यवस्था....
Tuljabhavani Temple : मटका व्यावसायिकाला VIP दर्शन घडवलं; तुळजाभवानी मंदिराच्या धार्मिक व्यवस्थापकावर थेट....
कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता
Kunal Kamra : कुणाल कामरा याच्या त्या पोस्टनंतर पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता