AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोर्टाच्या दणक्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी केली जगाची झोप उडवणाऱ्या आदेशावर सही, सर्वच देशांवर आता..

मागील काही दिवसांपासून संपूर्ण जग टॅरिफसोबत झुंज देताना दिसले. अनेक देशांवर मोठा टॅरिफ अमेरिकेकडून लावण्यात आला. आता डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा दणका कोर्टाने दिला. ज्यामुळे सर्व देशावरील उच्च टॅरिफचे संकट टळताना दिसत आहे.

कोर्टाच्या दणक्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी केली जगाची झोप उडवणाऱ्या आदेशावर सही, सर्वच देशांवर आता..
Donald Trump Tariff
| Updated on: Feb 21, 2026 | 9:09 AM
Share

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून अनेक देशांवर मोठे निर्बंध लादताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना हवे ते केले नाही किंवा त्यांचे म्हणणे ऐकले नाही की, लगेचच मोठा टॅरिफ लावला जात आहे. भारत रशियाकडून तेल खरेदी करत असल्याने अमेरिकेचा जळफळाट उठला होता. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवावी याकरिता दबाव होता. पण भारताने अमेरिकेचे म्हणणे ऐकले नसल्याने भारतावर थेट 50 टक्के टॅरिफ लावण्यात आला. आता तो टॅरिफ कमी करून 18 टक्क्यांवर आणला. मात्र, यामागेही मोठे षडयंत्र आहे. भारतासोबत व्यापारी करार पूर्ण करण्यासाठी भारतीय मार्केटमध्ये प्रवेश मिळवण्याकरिता अमेरिकेने टॅरिफ कमी केला. डोनाल्ड ट्रम्प फक्त भारतच नाही तर अनेक देशांना टॅरिफच्या माध्यमातून धमकावताना दिसत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांना अमेरिकेच्या कोर्टाने दणका दिला असून हा टॅरिफ बेकायदेशीर असल्याचे म्हटले. इतका टॅरिफ लावू शकत नसल्याचेही त्यांनी म्हटले.

अमेरिकेच्या कोर्टाने फटकारल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अत्यंत मोठा निर्णय घेतला असून सुरूवातीला त्यांनी कोर्टाच्या निर्णयावर नाराजी दर्शवली आणि थेट एक पाऊल मागे घेत आता जगातील सर्वच देशांवर अतिरिक्त 10 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. म्हणजेच काय तर आता डोनाल्ड ट्रम्प उच्च टॅरिफ लावू शकतात, कोर्टाने फटकारल्यानंतरही. अमेरिकेत होणाऱ्या आयातीवर आता अतिरिक्त 10 टक्के टॅरिफ असणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ओव्हल ऑफिसमधून एका नवीन कार्यकारी आदेशावर सही देखील केली. या आदेशानुसार, आता जगातील सर्वच देशांतून अमेरिकेत होणाऱ्या आयातीवर 10 टक्के अतिरिक्त टॅरिफ लागू केला जाईल. चीन, ब्राझील आणि भारतावर मोठा टॅरिफ अमेरिकेने लावला होता.

यावर बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, मला अभिमान वाटतो की, मी सर्व देशांवर अतिरिक्त 10 टक्के जागतिक कर लावण्याबाबत करार केला. हे धोरण लगेचच लागू होणार आहे. म्हणजेच काय तर आता भारताला अतिरिक्त 10 टक्के टॅरिफ भरावा लागणार आहे. भारतावरील टॅरिफ आता 28 टक्के झाला.

Follow Us
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे
मेथीची भाजी डब्यात आणली म्हणून 50 रुपयांचा दंड; तपोवन विद्यालयावर मनसे आक्रमक
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील पॅटर्न
केंद्रीय सचिवाकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक, महाराष्ट्रातील हा पॅटर्न देशभर राबवणार
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक
बदलापूर जलमय! मुसळधार पावसाने रस्ते पाण्याखाली, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात...
Ajit Pawar : अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचं गूढ उलगडणार? अपघात की घातपात याचा अहवाल महिनाभरातच; AAIBचं आश्वासन
मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात...
Mumbai Bank Election : मुंबई बँकेसाठी भाजप-शिंदेसेना आमनेसामने! दरेकरांच्या बालेकिल्ल्यात शिंदेंची एन्ट्री; सहकार क्षेत्रात रंगणार चुरस
भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, अन्...
Bhandara : भाजपच्या बैठकीनंतर जेवणावरून कार्यकर्ते भिडले! कॉलर पकडली, धक्काबुक्की अन् थेट... VIDEO चर्चेत
आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
Sanjay Raut on Shivsena : आमचं चिन्ह चोरलंय, चोरलेला मुद्देमाल आधी...संजय राऊत थेटच बोलले
5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
Farmer Loan : 5.5 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफी यादीत मोठा घोळ! नावं, खाते क्रमांक अन्...
मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका!
Nashik : मातंग समाजाचा आरक्षणासाठी एल्गार, तर कांदा दराने शेतकऱ्यांना झटका! नाशिकमध्ये दोन मोठे प्रश्न ऐरणीवर
दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना, VIDEO व्हायरल
Nanded : दुष्काळ निवारण बैठकीत आमदार नारायण कुचे जेवण करताना दिसले, VIDEO व्हायरल; बैठकीच्या गांभीर्यावर प्रश्नचिन्ह