AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! रशियाचा अमेरिकेला मोठा झटका, डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, मोठी खळबळ

अमेरिका इराणवर हल्ला करण्याच्या तयारीमध्ये आहे, मात्र दुसरीकडे रशियानं अमेरिकेचं टेन्शन वाढवलं आहे. रशियाला चीनची देखील साथ मिळाली आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी! रशियाचा अमेरिकेला मोठा झटका, डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली, मोठी खळबळ
Donald TrumpImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 20, 2026 | 4:51 PM
Share

अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आता शिगेला पोहोचला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट इराणला धमकी दिली आहे, इराणकडे आपल्या अणु ऊर्जा धोरणावर डील करण्यासाठी 10 ते 15 दिवस आहेत. मला वाटतं हा खूप मोठा वेळ आहे, डेड लाईन संपल्यानंतर इराणसोबत खूप वाईट गोष्टी घडतील अशी धमकी ट्रम्प यांच्याकडून देण्यात आली आहे, तर दुसरीकडे अमेरिकेनं आपल्या दोन विमानवाहू युद्धनौका यूएसएस अब्राहम लिंकन आणि यूएसएस जेरार्ड आर. फोर्ड मध्य पूर्वेत तैनात केल्या आहेत. त्यामुळे तणाव वाढला आहे. इराणमध्ये देखील सैन्य हालचालींना सुरुवात झाली आहे. इराणच्या मदतीला आता चीन आणि रशिया धावून आले आहेत. एका वृत्तवाहीनाला बोलताना रशियाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी थेट अमेरिकेला इशारा दिला आहे, इराणवर हल्ला केला तर त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, इरावर हल्ला म्हणजे आगीशी खेळ आहे, असं रशियानं म्हटलं आहे. तर दुसरीकडे रशियाच्या या भूमिकेला चीनने देखील समर्थन दिलं आहे.

दरम्यान अमेरिका आणि इराणमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं असतानाच दुसरीकडे आता इराणने रशियासोबत मिळून युद्ध अभ्यासाला सुरुवात केली आहे. दोन्ही देशांचे सैन्य संयुक्त युद्ध सरावासाठी ओमानच्या खाडीमध्ये आणि हिंद महासागरात उतरले आहेत. रशियासोबतचा इराणचा हा संयुक्त युद्धसराव खूप महत्त्वाचा मानला जात आहे. कारण अमेरिकेकडून इराणला सातत्याने धमकावलं जात आहे. मात्र दुसरीकडे अमेरिकेच्या धमक्यांचा इराणवर कोणताही परिणाम होताना दिसून येत नाही, उलट आता इराणने रशियासोबत मिळून युद्ध सरावाला सुरुवात केली आहे, हा अमेरिकेसाठी मोठा इशारा मानला जात आहे.

शिन्हुआने इराणी लष्कराच्या वेबसाइटचा अहवाला देत म्हटलं आहे की, या सरावामध्ये इराणचे अल्वंद विनाशकारी जहाज, मिसाईल लाँच करणाऱ्या युद्धनौका, फायटर जेट, लँडिंग क्राफ्ट या सर्वांचा सहभाग आहे, तर दुसरीकडे रशियाची लढाऊ ऑपरेशन टीम या युद्ध सरावात सहभागी झाली आहे. दरम्यान दुसरीकडे काही वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या रिपोर्टनुसार या आठवड्याच्या शेवटी अमेरिका इराणवर हल्ला करण्याच्या तयारीमध्ये आहे, अमेरिकेनं मध्यपूर्वेत आपलं सैन्यबळ मोठ्या प्रमाणात वाढवलं आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी युद्धाला सुरुवात होऊ शकते अशी परिस्थिती आहे. मात्र दुसरीकडे इराणला रशिया आणि चीनची साथ मिळाल्यामुळे ट्रम्प यांचं टेन्शन वाढलं आहे.

Follow Us
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील...
नाना पाटेकरांच्या निधनाची बातमी ऐकताच... मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्याची भावनिक प्रतिक्रिया
ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
Nana Patekar | ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन; वयाच्या 75 व्या वर्षी घेतला अखेर
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार...
MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज तोडगा? दोन मंत्री पुण्यात येणार, रोहित पवारांची मोठी माहिती
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू