व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षचा अमेरिकेतून खळबळ करणारा व्हिडीओ पुढे, जगाची उडाली झोप, थेट हातकड्यासोबत…
व्हेनेझुएला आणि अमेरिकेतील संघर्ष टोकाला पोहोचला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प मागील काही दिवसांपासून व्हेनेझुएलाला धमकावताना दिसत होते. त्यांनी थेट आता त्यांनी थेट व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या देशात घुसून अटक केली.

अमेरिकेच्या एका कारवाईमुळे जगात खळबळ उडाली असून जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर आहे. अमेरिकेने व्हेनेझुएलावर घातक कारवाई केली. अगोदर मोठा हल्ला करण्यात आला आणि त्यानंतर थेट राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना त्यांच्या पत्नीसोबत अटक करण्यात आली. हैराण करणारे म्हणजे त्यांची ही अटक राष्ट्रपती भवनातून करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यात प्रचंड तणाव वाढला होता. त्यामध्येच अमेरिकेकडून जगात खळबळ उडवणारी कारवाई करण्यात आली. दुसरीकडे रशिया आणि युक्रेन युद्धात शांतता प्रस्तापित करणाऱ्या अमेरिकेने हे पाऊस उचलले. अमेरिकेसमोर व्हेनेझुएला हा एक छोटासा देश आहे. व्हेनेझुएलाविरोधात अमेरिका आपल्या शक्तींचा चुकीचा वापर करत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो आणि त्यांची पत्नी सिलिया फ्लोरेस यांना अटक करून थेट अमेरिकेत आणले. यादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निकोलस मादुरो यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. त्या फोटोमध्ये त्यांचे हात बांधल्याचे आणि त्यांच्या डोळ्याला पट्टी बांधल्याचे स्पष्ट दिसत होते. हैराण करणारे म्हणजे ट्रॅकसूटमध्येच मादुरो यांना अटक करण्यात आली.
मादुरो हे त्यांच्या बेडरूममध्ये असतानाच अमेरिकेने ही कारवाई केली आणि त्यांना अटक केली. व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो हे सध्या अमेरिकेच्या ताब्यात असून निकोलस मादुरो यांचा एक अत्यंत धक्कादायक असा व्हिडीओ पुढे आला. ज्यानंतर मादुरो यांच्यासोबत अमेरिकेत नक्की काय होतंय हे दिसत आहे. अमेरिकेच्या या कारवाईचा विरोध अनेक देशांनी केला.
Maduro perp walk. pic.twitter.com/e1Maaun5EK
— Paul Mauro (@PaulDMauro) January 4, 2026
मादुरो यांचा अमेरिकेतील व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे की, काही अमेरिकी सैनिक त्यांना धरून घेऊन जात आहेत. यावेळी त्यांच्या हातकड्या दिसत आहेत. त्यांना कुठेतरी घेऊन जात आहेत. मादुरो यांना अमेरिकेने कडक सुरक्षेत ठेवल्याचे कळतंय. मात्र, त्यांची पत्नी नेमकी कुठे आहे, याबद्दल काही माहिती अजून मिळू शकली नाहीये. आता व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे मोठी खळबळ उडाली आहे. मादुरो हे व्हिडीओमध्ये अमेरिकी सैनिकांना काहीतरी बोलताना स्पष्टपणे दिसत आहेत.
