AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ब्ल्यूटुथचे असे नाव, प्रवाशांची उडाली भीतीने गाळण, हवेमधून विमानाला पुन्हा माघारी आणले

स्पेनला उड्डाण घेतलेल्या विमानात एक आगळ्याच प्रकारच्या आणीबाणीला समोर जावे लागले. जेव्हा एका प्रवाशाच्या डिव्हाईसवर 'BOMB' नावाचे ब्ल्युटुथ नेटवर्क एका प्रवाशाने पाहिले..

ब्ल्यूटुथचे असे नाव, प्रवाशांची उडाली भीतीने गाळण, हवेमधून विमानाला पुन्हा माघारी आणले
flight
| Updated on: Jun 01, 2026 | 9:08 PM
Share

स्पेनला जात असणारी युनाएटेड एअरलाईन्सची एक फ्लाईट हवेतून अर्ध्या रस्त्यातूनच माघारी फिरवण्यात आली आहे. एका विमान प्रवाशाच्या ब्ल्युटूथ डिव्हाईसचे नाव पाहून विमानात खळबळ उडाली आणि इमर्जन्सीत हे विमान अर्ध्या रस्त्यातून माघारी घेण्यात आले आहे. बातमीनुसार युनाएटेड एअरलाईन्सच्या फ्लाईट क्रमांक – UA236 ला 30 मेच्या सायंकाळी न्यू जर्सीच्या नेवार्क लिबर्टी इंटरनॅशनल एअरपोर्टहून स्पेनच्या पाल्मा डे मलोरकासाठी रवाना झाले होते. तेव्हा ही घटना घडली, तेव्हा या बोइंग- 767 विमानात सुमारे 190 प्रवासी आणि 12 क्रु सदस्य बसले होते.

ब्लूटूथ नेटवर्कचे नाव ‘BOMB’

या विमानातील प्रवाशाने कथितपणे आपल्या डिव्हाईसवर ब्लुटुथ नेटवर्क तपासले तेव्हा त्याला ‘BOMB’असे नाव झळकले आणि विमानात घबराट पसरली. पिपलच्या बातमीनुसार विमानात बसलेला एक प्रवासी जॉर्डन मूर याने टिकटॉकवर अनुभव शेअर करत सांगितले की ही स्थिती तेव्हा निर्माण झाली जेव्हा एका सह प्रवाशाला मोबाईलच्या सर्चमध्ये संशयित ब्ल्यू टुथ नावाला पाहिले, प्रवाशांना असे कनेक्शन बंद करण्यास सांगण्यात आले असतानाही हा प्रकार घडला.

उड्डाणादरम्यान सक्रीय होते ब्ल्युटुथ डिव्हाईस

प्रवासी जॉर्डन मूर यांनी लिहिले की या संशयित नेटवर्कचा थांगपत्ता उड्डाण भरताना लागला आणि त्याने लागलीच फ्लाईट स्टाफला याची कल्पना दिली. त्यांनी सांगितले की क्रु सदस्यांद्वारा या प्रवाशाला ब्ल्यू टुथ डिव्हाईस बंद करण्यास सांगूनही तो सिग्नल सक्रीय राहिला. त्यांनी सांगितले की या प्रकरणाला अधिकाऱ्यांनी वरिष्ठ स्तरावर पोहचले होते, ज्यानंतर सुरक्षेची बाब म्हणून विमानाला पुन्हा मागे नेण्याचा निर्णय घेतला.

लँडिंगनंतर विमानाची तपासणी, पुन्हा उड्डाण

विमानाला पुन्हा माघारी बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी विमानाची सखोल तपासणी केली. विमान न्यू जर्सीच्या विमानतळावर रिटर्न आल्यानंतर प्रवाशांना विमानातून उतरवण्यात आले. सुरक्षा टीमने विमानाची झडती घेतली. यावेळी केबिन आणि कार्गो एरियाचा देखील समावेश होता. प्रवाशांना विमानात चढण्याची परवानगी देण्याच्या आधी सुरक्षा एजन्सीद्वारा त्याची पुन्हा स्क्रीनिंग करण्यात आली. थोड्या वेळानंतर पुन्हा विमानाला उड्डाणाची परवानगी देण्यात आली.

Follow Us
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच
ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा
Chhagan Bhujbal | ओबीसी आरक्षण संपता कामा नये! छगन भुजबळांचा महायुतीला घरचा आहेर; मराठा आरक्षणावरून सरकारला थेट सवाल
हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह...
Dharashiv | नळदुर्ग किल्ल्यावर हृदयद्रावक घटना! राष्ट्रीय कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी तीन मुलांसह जीवन संपवलं; चौघांवर गुन्हा
बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद
Uddhav Thackeray | बीडमध्ये उद्धव ठाकरेंची मोठी खेळी! 396 बूथप्रमुखांशी थेट संवाद; प्रत्येकासाठी 10 लाखांची पॉलिसी जाहीर
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल