विमान प्रवास करत होती तरुणी, अचानक ऐकण्याची शक्ती गेली, काय झाले नेमके

आज जी व्यक्ती हसत खेळत जीवन जगत आहे त्या व्यक्तीबाबत उद्या नेमके काय होईल हे सांगता येत नाही. असाच एक भयानक अनुभव एका तरुणीला आला. ही तरुणी विमानाने प्रवास करत होती. तेव्हा अचानक तिची ऐकण्याची शक्ती तिने हरवली...

विमान प्रवास करत होती तरुणी, अचानक ऐकण्याची शक्ती गेली, काय झाले नेमके
Nicole
| Updated on: Aug 29, 2025 | 8:19 PM

अमेरिकेच्या बोस्टन येथे रहाणाऱ्या या २८ वर्षीय तरुणी निकोल कटलर हीची करुण कहाणी हेलावणारी आहे. निकोल हीला माहितीच नव्हते की गेल्या १५ वर्षांपासून तिच्या डोक्यात ट्युमर वाढत आहे. एकदा विमान प्रवास करताना तिला याचा पत्ता लागला. तेव्हा विमान प्रवासात तिच्या कानाला अचानक दडे बसले आणि तिने ऐकण्याची क्षमता गमावली. हा अनुभव इतका धक्कादायक होता की तिने ऑडिओलॉजिस्टची अपॉइंटमेंट घेतली. त्यानंतर अनेक चाचण्या झाल्या.त्यानंतर तिच्या डोक्यात मोठा ट्युमर असल्याचे उघड झाले.

निकोल त्यावेळी २२ वर्षांची होती. आणि डॉक्टरांनी पहिल्याच निदानात सांगितले की स्थिती खूपच गंभीर आहे. जुलै २०२१ मध्ये तिचे १२ तास ऑपरेशन झाले. परंतू डॉक्टर केवळ ५० टक्के ट्युमर काढू शकले. कारण तो तिच्या चेहऱ्याच्या नसांच्या चारही बाजूने घेरलेला होता. या ऑपरेशननंतर अनेक महिने तिचा डाव्या बाजूला लकव्यासारखा सामना करावा लागला. तिला चालता येत नव्हते की डावा हात हलवता येत नव्हते. तिचा चेहराही सहा महिने सुन्न झाला. या कठीण काळात तिला फिजोथेरपी आणि स्पीच थेरपी आणि फेशियल थेरपी करावी लागली.

निकोल म्हणते मी जेव्हा पहिल्यांदा ट्युमर बद्दल ऐकले तेव्हा माझे शरीर संपूर्ण सुन्न झाले. ती म्हणाली हा माझ्या जीवनातील सर्वात भीतीदायक क्षण होता. निकोल हीला आधीपासून चक्कर येणे, तोल जाणे आणि कमी ऐकू येणे सारख्या अडचणी होत्या. त्याचे खरे कारणनंतर कळाले. मे २०२१ मध्ये ती दोन्ही कानांनी बहिरी झाली. साल २०२३ मध्ये तिची पुन्हा नियमित तपासणी झाली तेव्हा तिचा ट्युमर आणखी वाढल्याचे कळले. यावेळी तिला इमर्जन्सी रेडिएशन थेरपी दिली गेली. परंतू अपशय आले आणि ट्युमर वाढतच गेला.

फेब्रुवारी २०२४ मध्ये निकोल हिची दुसरी मोठी ब्रेन सर्जरी झाली.डॉक्टरांनी अजून ट्युमर काढला.परंतू त्यामुळे चेहरा आणि ऐकण्याच्या क्षमतेवर कायमचा परिणाम झाला. त्यानंतर ऑगस्ट २०२४ मध्ये तिला एक नर्व्ह ग्राफ्ट सर्जरी करावी लागली.तिचे हास्य परत आणण्यासाठी तिच्या डाव्या पायातून नसा काढून तिच्या चेहऱ्यावर प्रत्यारोपित केल्या गेल्या. या प्रक्रियेने तिला पुन्हा चालायला शिकावे लागले.परंतू तिने हार मानली नाही.

मॅरेथॉन धावून जीवनाचे नवीन ध्यैय देत आहे

निकोलचा ट्युमर एकॉस्टिक न्युरोमा आहे. जो एक प्रकारचा सौम्य (benign) ट्यूमर असतो. त्याने ऐकण्याची आणि तोल सांभाळण्याच्या नसांवर परिणाम होत असतो. डॉक्टरांनी तिला सल्ला दिला होता की जर ट्युमर पुन्हा वाढला तर तो संपूर्ण हटवावा लागेल. त्यानंतर निकोल सातत्याने एमआरआय स्कॅन करत राहीली आणि सध्या तिची तब्येत स्थिर आहे. या आजाराशी लढताना तिला नवीन ध्यैय सापडले आहे. तिने ठरवले की जगातील सर्व सहा मॅरेथॉन धावणार आहे आणि त्यातून ब्रेन ट्युमरबद्दल जागरुकता करणार आहे.

माझे हास्य परत आणू शकणार नाही

आतापर्यंत ती बोस्टन, लंदन, शिकागो आणि न्यूयॉर्क मॅराथॉन धावली आहे. सप्टेंबरमध्ये बर्लिन मॅरेथॉन धावायची तयारी करीत आहे. निकोल म्हणजे कदाचित मी माझे हास्य परत आणू शकणार नाही. परंतू मी हृदयातून हसायला शिकली आहे. प्रत्येक सर्जरी, प्रत्येक शर्यंत, आणि पाऊल मला पुन्हा उभे राहण्याची ताकद देत आहे. या प्रवासात माझे शारीरिक, भावनिक आणि मानसिक रुपाने खूप काही हिरावून घेतले आहे.परंतू त्या बरोबर नवा उद्देश्य आणि मजबूती देखील दिली आहे.