AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतीय अभिनेत्याच्या घराजवळ धाड धाड Missile! भयावह Video Viral, लेक तर घाबरुन…

अमेरिका-इस्रायल-इराण संघर्षाची झळ दुबईपर्यंत पाहायला मिळत आहे. दुबईत भारतीय सेलिब्रिटी अडकले असल्याची माहिती समोर येत आहे. एका अभिनेत्याने तेथील व्हिडीओ शेअर केला आहे.

भारतीय अभिनेत्याच्या घराजवळ धाड धाड Missile! भयावह Video Viral, लेक तर घाबरुन...
Dubai AttackImage Credit source: Social Media
| Updated on: Mar 01, 2026 | 1:29 PM
Share

अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे मध्य पूर्वेतील तणाव कमालीचा वाढला असून, त्याची झळ आता दुबईपर्यंत पोहोचली आहे. या परिस्थितीचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवरही दिसून येत आहे. दुबईत असलेल्या तेलुगू अभिनेता विष्णू मंचू यांनी आपल्या घराजवळील आकाशात मिसाइल्स दिसत असल्याचा भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या हल्ल्याच्या आवाजाने त्यांचे संपूर्ण घर हादरले असून, त्यांची लहान मुलगी आयरा खूप घाबरली असल्याचे त्यांनी सांगितले.

काय आहे तो व्हिडीओ?

विष्णू मंचू कुटुंबाला भेटण्यासाठी दुबईला गेले होते. त्यांनी X (पूर्वीचे ट्विटर) वर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये आकाशात मिसाइल्स उडताना आणि इंटरसेप्ट होताना दिसत आहेत. “मी दुबईत कुटुंबाला भेटायला आलो आहे. आकाशात मिसाइल्स स्पष्ट दिसत आहेत. मोठ्या स्फोटांनी आमचे घर हादरले आणि लहान आयरा घाबरली,” असे त्यांनी लिहिले. त्यांनी पुढे म्हटले की, “कोणत्याही मुलावर अशी वेळ येऊ नये की त्याला छतावरून युद्धाचा आवाज ऐकत मोठे व्हावे लागेल.” तसेच, नागरिकांचे रक्षण केल्याबद्दल यूएई संरक्षण दलाचे आभार मानले आणि शांततेसाठी प्रार्थना केली. “हर हर महादेव,” असेही ते म्हणाले.

आणखी एक अभिनेत्री अडकली

दुसरीकडे, दुबई विमानतळावर अनेक भारतीय प्रवासी अडकले आहेत. बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान (Sonal Chauhan) ही शूटिंगसाठी दुबईला गेली होती, पण आता ती विमानतळावरच अडकली आहे. सर्व उड्डाणे रद्द झाल्याने भारतात परतण्याचा मार्ग बंद झाला आहे. तिने इंस्टाग्राम स्टोरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारकडे मदत मागितली आहे. “इथे तणावपूर्ण परिस्थिती आहे. कोणतीही विमाने उडत नाहीत. भारतात परत येण्याचा स्पष्ट मार्ग नाही. भारत सरकारने आम्हाला इथून बाहेर काढावे,” अशी विनंती तिने केली आहे.

या संघर्षामुळे दुबईसह संपूर्ण गल्फ प्रदेशातील हवाई वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. लाखो प्रवासी, पर्यटक आणि व्यवसायिक अडकले असून, भारतीय दूतावास आणि सरकारकडून मदतीसाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक भारतीय सेलिब्रिटी आणि सामान्य नागरिक यात अडकले असल्याने ही परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. या घटनांमुळे मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती किती व्यापक आणि धोकादायक झाली आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...