
बांग्लादेश पुन्हा एकदा वैचारिक आगीमध्ये होरपळतोय. रस्त्यावर चिथावणीखोर घोषणा, मिडिया संस्थांवर हल्ले आणि लोकशाही आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सर्व तिकडे सुरु आहे. उस्मान हादीच्या मृत्यूनंतर अचानक हिंसाचाराचा उद्रेक झालाय. त्यामुळे बांग्लादेशात हे सर्व घडतय असं नाहीय. हा कट्टरपंथीयांच्या विचारपूर्वक केलेल्या प्लानिंगचा भाग आहे. नव्या हिंसाचारामागे भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या हादीचे विचार असल्याचं सांगितलं जातय. आता हादी या जगामध्ये नाहीय. अवामी लागीच्या एका नेत्याने व्हिडिओ जारी करुन खुलासा केला आहे. यात एका दंगलखोराने मी उस्माम हादीच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय याची कबुली दिली आहे. त्याने दाखवलेल्या मार्गावरुन चालतोय. हिंदू मुलगा दीपू दासची हत्या असो किंवा मिडिया संस्थांवर हल्ले, या दोन्ही घटनांवरुन उस्मान हादीच्या मृत्यूनंतरही त्याचे विचार अजूनही किती धोकादायक आहेत, ते स्पष्ट झालय. बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पक्षाचे नेते मोहम्मद अली अराफात यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक...