Afghanistan Crisis : ‘तालिबानच्या प्रत्येक कृतीवर अमेरिकेची करडी नजर’, 31 ऑगस्टपर्यंत अफणगाणिस्तानातून अमेरिकेची पूर्णपणे माघार

| Updated on: Aug 25, 2021 | 12:41 PM

अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया काही दिवसातच ती पूर्ण होणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे. 14 ऑगस्टनंतर अमेरिकेने जवळपास 70,700 लोकांना अफगाणिस्तानमधून सुखरूप बाहेर काढले किंवा त्यांना बाहेर पडण्यास मदत केली आहे.

Afghanistan Crisis : तालिबानच्या प्रत्येक कृतीवर अमेरिकेची करडी नजर, 31 ऑगस्टपर्यंत अफणगाणिस्तानातून अमेरिकेची पूर्णपणे माघार
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन
Follow us on

मुंबई : अफगाणिस्तानात तालिबान्यांच्या कृतीवरून त्यांचे मूल्यांकन केले जाईल. अमेरिकेची त्यांच्यावर करडी नजर असेल, असे वक्तव्य मंगळवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केले. अफगाणिस्तानमधून अमेरिकी सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया अजूनही सुरु असून काही दिवसातच ती पूर्ण होणार आहे. 31 ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल. या पार्श्वभूमीवर बायडेन यांनी हे वक्तव्य केले. 14 ऑगस्टनंतर अमेरिकेने जवळपास 70,700 लोकांना अफगाणिस्तानमधून सुखरूप बाहेर काढले किंवा त्यांना बाहेर पडण्यास मदत केली आहे.

व्हाईट हाऊसमध्ये अमेरिकी राष्ट्राध्यक्ष म्हणाले, ” जी-7 देश, युरोपियन संघ, नाटो (उत्तर अटलांटीक करार संघटना) आणि संयुक्त राष्ट्र यांचा तालिबान्यांप्रति असलेला दृष्टीकोन आमच्याशी सहमत आहे. त्यांच्या कामांद्वारे आम्ही त्यांना जज करू आणि तालिबान्यांच्या वागणुकीला प्रत्युत्तर देण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या सर्व निर्णयांमध्ये आम्ही जवळून समन्वय राखू.” जी7 देशांमध्ये ब्रिटनसह कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि अमेरिकेचा समावेश आहे.

तालिबान्यांनी सहकार्य करावे-बायडेन 

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन म्हणाले की, ”31 ऑगस्टच्या डेडलाइननुसार, अफगाणिस्तानमधून लोकांना काढण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र तालिबान्यांच्या सहकार्यावरच ही प्रक्रिया अवलंबून आहे. तालिबान्यांनी बाहेर पडणाऱ्या लोकांना एअरपोर्टपर्यंत पोहोचण्याची परवानगी द्यावी तसेच आमच्या कारवाईत कोणताही अडथळा आणू नये, एवढीच अपेक्षा आहे.”

माघार प्रक्रियेतील विलंबाने स्थिती बिघडेल- बायडेन

अफगाणिस्तान मुद्द्यावर जी 7 देशांच्या नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर जो बायडेन यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की,”अफगाणिस्तानात अमेरिका जेवढे जास्त काळ राहील, तेवढी स्थिती आणखी बिघडू शकते. अमेरिका आणि जी-7 देशांनी अफगाणिस्तानाील सद्यस्थिती पाहता, देश सोडून जाणाऱ्या शरणार्थींची मदत आणि त्यांच्या समर्थनावर ‘परस्पर दायित्वा’वर या बैठकीत चर्चा केली. या प्रयत्नांमध्ये अमेरिकेचा पुढाकार असेल. तालिबान्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतल्यानंतरही अमेरिका काबूल एअरपोर्टवरून हजारो लोकांना बाहेर काढत आहे.

सुरक्षित बाहेर पडण्यास जी 7 देशांचे प्राधान्य

जी7 समूहाच्या नेत्यांनी मंगळवारी डिजिटल पद्धतीने घेतलेल्या आपत्कालीन बैठकीनंतर एक संयुक्त वक्तव्य जारी करत म्हटले की, अफगाणिस्तानातून विदेशी आणि अफगाण भागीदारांना सुरक्षित बाहेर काढण्यास प्राथमिकता देण्यात येत आहे. तसेच अफगाणमधील पक्षांचे मूल्यांकन त्यांच्या वक्तव्यांवरून नव्हे तर त्यांच्या वागणुकीवरून केले जाईल, असा इशाराही नेत्यांनी दिला.

तालिबान्यांचे सरकार अटी-शर्थींवर स्वीकारणार

जी 7 देश भविष्यात तालिबान्यांच्या नेतृत्वातील अफगाणिस्तान सरकारला मान्यता देण्यास तसेच त्यांच्याशी चर्चा करण्यास काही अटी आणि शर्थींवर तयार होईल, यावर सर्वांची सहमती झाली. हजारो अमेरिकी, युरोपियन आणि इतर देशांतील नागरिक तसेच सर्व धोक्यात असलेल्या अफगाणींना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी काबुल विमानतळावर अमेरिकी मोहिम आणखी व्यापक करण्यासाठी परवानगी न दिल्याने स्पष्टपणे नाराजी दर्शवली.

(America president Joe Biden says Taliban’s every actions would be evaluated Afghanistan crisis update)

संबंधित बातम्या

आधी वाऱ्यावर सोडलं आता तालिबानसोबत अमेरीकेची पडद्याआड चर्चा, टॉपचा अधिकारी काबूलमध्ये

‘ख्याली पुलाव’ बनवण्यात पाक नेते गुंतले, इम्रान यांचे निकटवर्तीय म्हणतात, ‘तालिबान काश्मीर जिंकून देणार’