महिलांनी फक्त सहावीपर्यंतच शिका, ‘या’ देशातील सरकारचा फतवा…; विद्यापीठात जाणाऱ्या महिलांना चाबकाने फोडून काढले…

| Updated on: Nov 02, 2022 | 2:45 PM

अफगाणिस्तानातील विद्यापीठात हिजाबशिवाय मुलींना प्रवेश नाही असाच फतवा काढण्यात आला, त्याविऱोधात आवाज उठविला म्हणून विद्यार्थिनींना आता चाबकाने फोडून काढले आहे.

महिलांनी फक्त सहावीपर्यंतच शिका, या देशातील सरकारचा फतवा...; विद्यापीठात जाणाऱ्या महिलांना चाबकाने फोडून काढले...
Follow us on

नवी दिल्लीः नागरिकांना खोटी स्वप्नं दाखवून सत्तेत आलेल्या तालिबानी संघटनेने आता आपला असली चेहरा दाखवायला सुरुवात केली आहे. सत्तेत येण्याआधी महिला शिक्षणाचा ढिंडोरा पिटणाऱ्या तालिबानींकडून आपल्या न्याय हक्कांसाठी लढणाऱ्या विद्यार्थिंनीवरच आता हल्ला केला जात आहे. अफगाणिस्तानातील असाच एक धक्कादायक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये एका विद्यापीठातील विद्यार्थिनीनी आपल्या हक्कांसाठी आवाज उठविला म्हणून त्या विद्यार्थिनींना चाबकाचे फटकारे मारताना दिसून येत आहे.

 

विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींनी बुरका घातला नाही म्हणून त्यांना विद्यापीठाचे गेट बंद करुन त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे या विद्यार्थिनींनी हा प्रकाराबद्दल आवाज उठविला.

हा सर्व प्रकार उत्तर पूर्व अफगाणिस्तानातील बदख्शान विद्यापीठात घडला असून सोशल मीडियावर या विरोधात प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

विद्यार्थिनीनी विद्यापीठ प्रवेशदार बंद केल्याने त्यासमोर आंदोलन करत होत्या. त्यावेळी तालिबान सरकारमधील सदाचार मंत्रालयाकडून विद्यार्थिनींना चाबकाचे फटकारे मारण्यात आले आहेत.

आवाज उठविणाऱ्या विद्यार्थिनी चाबकाला घाबरून मागे गेल्या नंतरही त्यांच्यावर चाबकाचे फटकारे मारण्यात येत आहे.

मागील वर्षी अफगाणिस्तानात तालिबान सरकार सत्तेत आल्यानंतर तालिबान्यांकडून हुकूमशाही पद्धतीने नागरिकांवर अन्याय केला जात आहे.

तालिबानी सत्तेत आल्यापासून महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणे, त्यांच्या आवाज दाबणे, स्वातंत्र्याचे सगळे अधिकार काढून घेणे, त्यांनी काय बोलावे, त्यांनी काय कपडे कोणते वापरावे, त्यांनी नोकरी कोणत्या ठिकाणी करावी, त्यांनी कुठे शिकावे या सगळ्या गोष्टींचा निर्णय तालिबानीच घेत आहेत. सहावीच्या वर्गानंतर शाळेत जाण्यावर त्यांच्याकडून बंदीही घातली जात आहे.

अफगाणिस्तानातील महिलांना सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे वापरावे त्यासाठी तालिबान मंत्रालयाकडून नियम करण्यात येत आहे.

तेथील महिलांना नकाब किंवा बुरका घातल्याशिवाय सार्वजनिक ठिकाणी त्यांना प्रवेशही दिला जात नाही. तालिबान सरकारच्या या निर्णयाविरोधात आणि शिक्षणाच्या हक्कासाठी येथील महिला आणि विद्यार्थिनींनी आवाज उठवल्यानंतर त्यांच्यावर चाबकाचे फटकारे मारण्यात आले.